बांबू आधारित रोजगाराला प्रोत्साहन द्यावे : राज्यपाल

बांबू
बांबू

मुंबई: बांबू आधारित रोजगाराला प्रोत्साहन देण्यात यावे, त्या दृष्टीने राज्यात सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ आणि महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी येथे बांबूपासून वस्तूनिर्मितीची प्रशिक्षण केंद्र सुरू करावीत, अशा सूचना राज्यपाल सी. विद्यासागर राव यांनी दिल्या. राजभवनात झालेल्या बैठकीत ते बोलत होते. या वेळी वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्यासह या तीनही विद्यापीठांचे कुलगुरू, वन विभागाचे अधिकारी आणि इतर उपस्थित होते. बांबू आधारित उद्योगाचे प्रशिक्षण देण्यासाठी वरील तीनही विद्यापीठांमध्ये येत्या तीन महिन्यांत ही केंद्रे सुरू केली जावीत, असे सांगून राज्यपाल म्हणाले, की स्टार्टअप पॉलिसीअंतर्गत बांबू आधारित रोजगार संधीची मोठ्या प्रमाणात उपलब्धता होऊ शकते. पंतप्रधानांचेदेखील हेच स्वप्न आहे. त्यामुळे बांबूपासून तयार होणाऱ्या विविध उत्पादनांचा बाजारपेठेतील मागणी आधारित उपयोग कसा करता येऊ शकेल, याचा सविस्तर अभ्यास केला जावा. यासाठी बांबू संशोधन आणि प्रशिक्षण मंडळ, चिचपल्ली यांच्याशी चर्चा केली जावी. विद्यापीठांनी बांबू लागवडीत पुढाकार घ्यावा.  वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी बांबूमध्ये रोजगार संधी असल्याचे या वेळी सांगितले. या तीनही केंद्रे सुरू करण्यासाठी जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून निधी उपलब्ध करून दिला जाईल, असेही ते म्हणाले. बांबूचे मूल्यवर्धन करून बांबूपासून राखी, बांबूचे दागिने, बांबू घरे, बांबू बाथरूम, स्वयंपाक रातील छोट्या मोठ्या वस्तूंची निर्मिती, हस्तकौशल्याच्या वस्तू, बास्केट, चटई, बांबू पल्पपासून कागदनिर्मिती़ तसेच वस्त्रनिर्मिती, अपारंपरिक ऊर्जानिर्मिती यासारख्या अनेक गोष्टी तयार होतात. चंद्रपूर जिल्ह्यातील चिचपल्ली येथे बांबू प्रशिक्षण केंद्राच्या माध्यमातून या वस्तू तयार करण्याचे प्रशिक्षण दिले जात असल्याची माहितीही त्यांनी दिली. बैठकीत बांबू संशोधन आणि प्रशिक्षण केंद्र चिचपल्ली, संपूर्ण बांबू केंद्र-मेळघाट, बांबू विकास मंडळ यांनी सादरीकरण केले. पंजाब नॅशनल बँकेच्या वतीने शेतकऱ्यांसाठी देशभरात ११ प्रशिक्षण केंद्र आतापर्यंत सुरू करण्यात आली आहेत. त्याचेही या बैठकीत सादरीकरण करण्यात आले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com