agriculture news in Marathi, Governor says, work of jain Irrigation in agri sector is extra ordinary, Maharashtra | Agrowon

जैन इरिगेशचे कृषी क्षेत्रातील कार्य अद्वितीय : राज्यपाल
टीम अॅग्रोवन
शुक्रवार, 22 डिसेंबर 2017

जळगाव ः जैन इरिगेशनने कृषिक्षेत्रात केलेले कार्य अद्वितीय आहे. संस्थापक अध्यक्ष भवरलालजी जैन यांनी कल्पनातीत विश्वाची निर्मिती केली आहे. त्यांनी ही संस्था समस्त मानव जातीच्या कल्याणासाठी निर्माण केली आहे, असे गौरवोद्‍गार महाराष्ट्राचे राज्यपाल सी. विद्यासागर राव यांनी येथे केले.

जळगाव ः जैन इरिगेशनने कृषिक्षेत्रात केलेले कार्य अद्वितीय आहे. संस्थापक अध्यक्ष भवरलालजी जैन यांनी कल्पनातीत विश्वाची निर्मिती केली आहे. त्यांनी ही संस्था समस्त मानव जातीच्या कल्याणासाठी निर्माण केली आहे, असे गौरवोद्‍गार महाराष्ट्राचे राज्यपाल सी. विद्यासागर राव यांनी येथे केले.

जैन इरिगेशनच्या विविध प्रकल्पांना राज्यपाल सी. विद्यासागर राव यांनी बुधवारी (ता. २०) भेट दिली. या वेळी जैन परिवारातील ज्येष्ठ सदस्य सेवादास दलूभाऊ जैन, जैन उद्योग समूहाचे अध्यक्ष अशोक जैन, उपाध्यक्ष अनिल जैन, सहव्यवस्थापकीय संचालक अजित जैन, अतुल जैन, अभय जैन, अथांग जैन, विभागीय आयुक्त महेश झगडे, जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर, पोलिस अधीक्षक दत्तात्रेय कराळे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कौस्तुभ दिवेगावकर उपस्थित होते.

राज्यपाल सी. विद्यासागर राव यांनी भवरलाल जैन यांनी उभारलेल्या पहिल्या जलसंधारण प्रकल्प व त्यांच्या स्मृतिस्थळास भेट दिली. त्यानंतर जैन हिल्स येथील टिश्यूकल्चर उत्पादन केंद्रास भेट देऊन केळी, डाळिंब, पेरू, कांदा, बटाटा आदींबाबत माहिती घेतली.

उच्च कृषी जैवतंत्रज्ञानाची ओळख करून घेण्यासाठी त्यांनी बायोटेक्नॉलॉजी लॅब, तसेच कृषी विकास व संशोधन केंद्रात डाळिंब, अतिघन फळझाडे लागवडीचे प्रयोग, तसेच उच्च तंत्राने भाजीपाला लागवड प्रात्यक्षिक केंद्रास आणि आंबा, संत्रा, संशोधन व विकास केंद्रासही भेट दिली.

‘पाणी विद्यापीठ’ ज्या ठिकाणी उभारले जाणार आहे, त्या जागेचीही राज्यपाल यांनी पाहणी केली. त्याचप्रमाणे नजीकच्या काळात उभारण्यात येणाऱ्या भारतातील मोठ्या मसाला प्रक्रिया केंद्रास देखील भेट दिली. ‘१०० टक्के ओले आणि कोरड्या मसाल्याचे उत्पादन करण्यात येईल,’ अशी माहितीही राज्यपाल महोदयांना उपाध्यक्ष अनिल जैन यांनी दिली.

राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जीवनचरित्रावर आधारलेले जगातील पहिले ऑडिओ गाइडेड म्युझियम व संशोधन केंद्र ‘गांधीतीर्थ’ येथे राज्यपाल यांनी भेट दिली. तसेच, जैन इरिगेशनचे संस्थापक भवरलाल जैन यांच्या ८० व्या जयंतीनिमित्त राज्यपाल यांच्या हस्ते बेल या वृक्षाची लागवड, तसेच कृषिजल मासिकाच्या विशेषांकाचे प्रकाशन करण्यात आले.

इतर अॅग्रो विशेष
अन्नत्याग आंदोलनास प्रारंभ : अमर हबीब,...नवी दिल्ली : शेतकरी आत्महत्यांप्रती सहवेदना आणि...
मच्छीमारी व्यवसायाने आणली समृद्धीगणित विषयात पदवी असूनही बेरोजगार राहणं नशिबी आलं...
काबुली हरभऱ्याने उंचावले अर्थकारण चोपडा तालुक्‍यातील (जि. जळगाव) तापी व अनेर...
जत तालुक्यात द्राक्ष, डाळिंब बागा...सांगली : जत तालुक्यात पश्‍चिम भाग वगळता...
प्रकल्प व्यवस्थापकावर कारवाईचे आदेशपुणे : एकात्मिक पाणलोट व्यवस्थापन...
सहवेदना :आज अन्नत्याग आंदोलनयवतमाळ: शेतकरी साहेबराव करपे व कुटुंबीयांप्रति...
उन्हाची काहिली वाढलीपुणे: राज्यात गेल्या काही दिवसांपासून उन्हाची...
राजकीय उपद्रव्य मूल्य घटल्याने...मुंबई: मर्यादित जनाधार आणि राजकीय उपद्रव मूल्य...
सोलापूर जिल्ह्यातील सर्व गावांची...सोलापूर : सोलापूर जिल्ह्यातील सर्वच ११४५...
विदेश अभ्यास दौऱ्याच्या शेतकरी यादीत...पुणे : विदेश अभ्यास दौऱ्यासाठी निवड केलेल्या...
क्रांती कारखाना हुमणीचे भुंगेरे खरेदी...कुंडल, जि. सांगली : एकात्मिक हुमणी कीड नियंत्रण...
तेजस्विनीच्या साथीने बचतीतून...तेजस्विनी लोकसंचालित साधन केंद्राच्या...
परवानाधारक व्यापाऱ्यांनीच केळीची खरेदी...जळगाव : चोपडा बाजार समिती दरवर्षी १४...
गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर...पणजी : देशाचे माजी संरक्षणमंत्री व गोव्याचे...
आडातच नाही तर पोहऱ्यात येणार कोठून? दुष्काळ पडल्याने पाण्यासाठी बोअर घेण्याची अक्षरशा...
कृषी पर्यवेक्षकांना पदोन्नती मिळाली, पण...पुणे : राज्यातील कृषी पर्यवेक्षकांना शासनाने मंडळ...
दुष्काळी मराठवाड्यात मार्चमध्येच ‘केसर'...केज, जि. बीड ः फळांचा राजा आंबा बाजारात...
मिरची पीक अंतिम टप्प्यातनंदुरबार (प्रतिनिधी) ः खानदेशातील मिरचीचे आगार...
सुधारित जोडओळ पद्धतीमुळे कपाशीतून...सोगोडा (जि. बुलढाणा) येथील विजय पातळे या कपाशी...
परभणी ठरले देशात उष्णपुणे : राज्यात अनेक ठिकाणी तापमान ३७ अंशांच्या...