agriculture news in marathi, Govt accords permission for bio-ethanol vehicles to two auto-makers | Agrowon

दुचाकी वाहनातही इथेनॉलचा वापर
वृत्तसेवा
सोमवार, 7 मे 2018

हैदराबाद : इलेक्ट्रीक वाहनांसह इथेनॉल सारख्या पर्यायी दुचाकी, तीनचाकी वाहनांच्या उत्पादनांना प्रोत्साहन देण्यात येत असल्याची माहिती केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी येथे दिली. 

मंत्री गडकरी म्हणाले, दुचाकी वाहन निर्मिती गहू अाणि भातापासून बनविलेल्या १०० टक्के इथेनॉलवर करण्यासाठी मंत्रालयाने परवानगी दिली आहे. बजाज आणि टीव्हीएस कंपन्यांना आपल्या दुचाकी अाणि रिक्षा उत्पादने लवकरच बाजारात सादर करण्याची शक्यता अाहे. याकरिता कृषी संशोधन संस्थांनी जैवइंथन वर लक्ष केंद्रीत करायला हवे, जेणेकरून भारताची तेल आयात कमी होईल. 

हैदराबाद : इलेक्ट्रीक वाहनांसह इथेनॉल सारख्या पर्यायी दुचाकी, तीनचाकी वाहनांच्या उत्पादनांना प्रोत्साहन देण्यात येत असल्याची माहिती केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी येथे दिली. 

मंत्री गडकरी म्हणाले, दुचाकी वाहन निर्मिती गहू अाणि भातापासून बनविलेल्या १०० टक्के इथेनॉलवर करण्यासाठी मंत्रालयाने परवानगी दिली आहे. बजाज आणि टीव्हीएस कंपन्यांना आपल्या दुचाकी अाणि रिक्षा उत्पादने लवकरच बाजारात सादर करण्याची शक्यता अाहे. याकरिता कृषी संशोधन संस्थांनी जैवइंथन वर लक्ष केंद्रीत करायला हवे, जेणेकरून भारताची तेल आयात कमी होईल. 

गडकरी म्हणाले, की इथेनॉल उत्पादनास प्रोत्साहन देण्यासाठी केंद्र सरकार विविध योजनांवर काम करत आहे. गव्हाचे काड, भाताचे काड, बांबू आणि इतर पिकांपासून सहजगत्या इथेनॉल उत्पादनासाठी योजनांचा वापर होईल. बांबूला आम्ही पहिल्यांदाच झाड म्हणून मान्यता रद्द केली असल्याची मंत्री गडकरी यांनी सांगितले.

 हरियाना, पंजाब राज्यात भाताचे काड मोठ्या प्रमाणात जाळले जाते. यामुळे दिल्लीत प्रचंड प्रदूषण होते. मात्र, एक टन भाताच्या काडापासून २८० लिटर इथेनॉल निर्मिती होते. हे इथेनॉल केवळ अायातीला पर्यायच नाही, तर वाजवी खर्चात प्रदूषण मुक्त अाणि स्वच्छ इंथनही असते. 

इथेनॉलच्या माध्यमातून ऊर्जा आणि सामर्थ्य उत्पादन क्षेत्र म्हणून कृषी क्षेत्राला वळावे लागणार असल्याचे केंद्रीय मंत्री गडकरी म्हणाले. भारताला दरवर्षी ७ लाख कोटी रुपये कच्च्या खनिज तेलाच्या अायातीकरिता मोजावे लागतात. जर देशांतर्गत इथेनॉल निर्मिती करून यातील २ लाख कोटी वाचविता अाले, तर भारतीय कृषी क्षेत्र पूर्णत: बदललेले दिसेल. 

दरवर्षी आपण १ लाख कोटी रुपयांचे लाकूड आयात करतो. यात ४० हजार कोटींचा साग, ४ हजार कोटींची कच्ची उदबत्ती काड्या, ३५ हजार रुपयांचा कच्चा कागदाचा लगदा आणि ३५ हजार कोटी रुपयांची वृत्तपत्रांसाठी लागणारा कागद आयात करतो, अशी माहिती मंत्री गडकरी यांनी दिली.

इतर अॅग्रो विशेष
आरोग्यदायी ड्रॅगन फ्रूटशरीरातील कोलेस्ट्रॉल नियंत्रित ठेवण्यासाठी आणि...
वनस्पतीच्या ताण स्थितीतील संदेश यंत्रणा...वनस्पतीतील ताणाच्या स्थितीमध्ये कार्यरत होणाऱ्या...
आर्थिक, सामाजिक, कृषिसंपन्न राजुरीचा...आर्थिक, सामाजिक व सांस्कृतिकदृष्ट्या प्रगत व...
नाला खोलीकरणात गेलेे शेत; न्यायासाठी...अकोला ः उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी यंत्रणा...
पावणेतीन हजार कोटींची ‘वसुंधरा’त...पुणे : कृषिविस्तार व सल्ला देण्याचे काम सोडून...
कांदा संचालनालयाला राष्ट्रीय संस्थेचा...पुणे : राजगुरुनगर भागात असलेल्या कांदा, लसूण...
शेतकऱ्यांना मिळणार तालुकानिहाय हवामान...दिल्ली : देशातील सुमारे साडेनऊ कोटी शेतकऱ्यांना...
राज्यात उष्णतेची लाट येणारपुणे : सूर्य आग ओकायला लागल्याने विदर्भात उन्हाचा...
हमीभाव वाढीचा बागुलबुवा आणि वास्तवलोकसभा, विधानसभा निवडणुकांमध्ये शेतकऱ्यांच्या...
‘कॅप्सूल’ सुधारणार मातीचे आरोग्यमहाराष्ट्र राज्यासाठी या वर्षी रासायनिक खतांची...
नागपूर : रब्बीची पैसेवारी काढली खरीप...नागपूर : खरीप आणि रब्बी हंगामात वेगवेगळी पिके...
अॅग्रोवन समृद्ध शेती योजनेचे...नांदेड: `अॅग्रोवन’च्या माध्यमातून...
मराठवाड्यातील २९२ लघुप्रकल्प कोरडेऔरंगाबाद : मराठवाड्यातील ७४९ लघुप्रकल्पांपैकी २९२...
दक्षिण आशियात यंदा सर्वसामान्य मॉन्सून...पुणे  : भारतासह दक्षिण आशियातील देशांच्या...
कृषिउद्योग महामंडळाकडून ‘बायोकॅप्सूल’चा...पुणे : सेंद्रिय शेतीकडे वळालेल्या शेतकऱ्यांच्या...
शासन दरबारी रब्बी हंगामात नागपूर...नागपूर  : खरिपानंतर पाण्याअभावी रब्बी...
बीटी बियाणे १५ मेपूर्वी विक्रीस मनाईपुणे : राज्यातील बियाणे उत्पादक कंपन्यांनी १५...
जमिनीचे जैविक पृथक्करणआजकाल शेतकऱ्यांना मातीचा पृथक्करण अहवाल करून...
सांगलीतून १२ टन द्राक्षे निर्यातसांगली ः यंदा प्रतिकूल परिस्थतीतही जिल्ह्यातील...
काळजी घ्या : उन्हाच्या झळा वाढल्यापुणे : उन्हाच्या झळा वाढल्याने विदर्भ,...