agriculture news in Marathi, Govt allows import of moong, urad pulses if payments made, Maharashtra | Agrowon

देयके दिलेल्या मूग, उडीदडाळ आयातीला परवानगी
कोजेन्सिस वृत्तसेवा
शुक्रवार, 27 ऑक्टोबर 2017

नवी दिल्ली ः देशात मागील वर्षी तुरीचे बंपर उत्पादन झाले होते. त्यामुळे तुरीसह इतर कडधान्यांचे दर हमीभावाच्याही खाली गेल्याने केंद्राने कडधान्यांच्या आयातीवर मर्यादा घातल्या होत्या; मात्र ज्या व्यापाऱ्यांनी २१ आॅगस्टच्या आधी मूग व उडीदडाळ आयातीसाठी देयके दिली असतील त्यांना वार्षिक ३ लाख टन मर्यादेपेक्षा जास्त आयात करण्यास परवानगी दिली आहे.

नवी दिल्ली ः देशात मागील वर्षी तुरीचे बंपर उत्पादन झाले होते. त्यामुळे तुरीसह इतर कडधान्यांचे दर हमीभावाच्याही खाली गेल्याने केंद्राने कडधान्यांच्या आयातीवर मर्यादा घातल्या होत्या; मात्र ज्या व्यापाऱ्यांनी २१ आॅगस्टच्या आधी मूग व उडीदडाळ आयातीसाठी देयके दिली असतील त्यांना वार्षिक ३ लाख टन मर्यादेपेक्षा जास्त आयात करण्यास परवानगी दिली आहे.

मूग आणि उडीदडाळ अायातीने आधीच ३ लाख टनांची मार्यादा गाठली आहे. त्यामुळे देयके दिलेल्या परंतु डाळ आयात केली नाही अशा व्यापाऱ्यांना दिलासा देण्यासाठी शासनाने हा निर्णय घेतला आहे. अशा व्यापाऱ्यांना त्यांची डाळ आयातीसाठी विदेशी व्यापार महासंचालकांच्या विभागीय कार्यालयात ३१ आॅक्टोबरपूर्वी नोंदणी करण्यास शासनाने सांगितले आहे. नोंदणी करतेवेळी व्यापाऱ्यांना खरेदी पावत्या व विहित वेळेत देयके दिल्याचे बॅंकेचे प्रमाणपत्र जमा करणे आवश्यक आहे. 

हंगाम २०१६-१७ मध्ये चांगला पाऊस व पोषक वातावरणामुळे देशात कडधान्यांचा पेरा वाढला होता. त्यातच पोषक वातावरणामुळे बंपर उत्पादन झाले होते. सरकारने खेरदी सुरू केली; परंतु आयात होत असलेल्या डाळी आणि खरेदी यंत्रणेतील अडचणी यामुळे पाहिजे तेवढा फायदा झाला नाही. त्यामुळे बाजारपेठेत कडधान्यांची आवक वाढल्यानंतर दर प्रचंड प्रमाणात पडले होते. त्यामुळे केंद्राने कडधान्यांच्या आयातीवर निर्बंध घातले होते.   

नोंदणी आवश्यक 
मूग व उडीदडाळ आयातीसाठी २१ आॅगस्टपूर्वी देयके दिलेल्या; परंतु डाळ आयात न केलेल्या व्यापाऱ्यांना शासनाने ३ लाख टन मर्यादा पूर्ण होऊनही आयातीला परवानगी दिली आहे; मात्र त्यासाठी त्यांना विदेशी व्यापार महासंचालकांच्या विभागीय कार्यालयात ३१ आॅक्टोबरपूर्वी नोंदणी करणे बंधनकारक आहे. नोंदणीसाठी २१ आॅगस्टपूर्वीच्या खरेदी पावत्या व देयके दिल्याचे बॅंकेचे प्रमाणपत्र देणे आवश्यक आहे.

नाफेडकडून खरेदीस प्रारंभ
खरीप हंगामात शेतकऱ्यांच्या मूग आणि उडदाला हमीभाव मिळावा, यासाठी नाफेडने खरेदी सुरू केली होती. नाफेडने मंगळवार (ता. २४)पर्यंत मुगाची ३३ हजार ९७६ टन आणि उडदाची १२ हजार ८५९ टन खेरदी केली आहे, अशी माहिती नाफेडच्या अधिकाऱ्यांनी दिली. नाफेड राजस्थान, तेलंगण, कर्नाटक आणि महाराष्ट्रात किमान आधारभूत किमतीने कडधन्यांची खरेदी करत आहे.

यंदा उडदाला बोनससह ५ हजार ४०० तर मुगाला बोनससह ५ हजार ५७५ रुपये हमीभाव जाहीर करण्यात आला आहे. सर्वाधिक २१ हजार ९८९ टन मूग आणि ९ हजार ६८८ टन उडदाची खेरदी राजस्थानमध्ये झाली आहे. खरिपातील नवीन उडदाची आवक सुरू होताच बाजारातील आवक वाढली आणि व्यापाऱ्यांकडून कमी खरेदी सुरू असल्याने दर हमीभावाच्या खाली आले होते. त्यामुळे शेतकऱ्यांना हमीभाव मिळावा यासाठी नाफेड खरेदीत उतरले आहे. 

इतर अॅग्रोमनी
हलव्याच्या कार्यक्रमाने अर्थसंकल्पाची...नवी दिल्ली : नवीन वर्षाची सुरवात झाली की...
आयटीसीचे ‘ई चौपाल’ आता येणार मोबाईलवरग्रामीण भागाला डिजिटल करण्याच्या उद्देशाने दोन...
कृषिमालाच्या मूल्यवर्धनालाच खरे भविष्य...२०१८ मध्ये डॅनफॉस इंडिया या कंपनीने उत्तम असा...
वनशेतीसह आंतरपिके ठरतोय फायद्याचा सौदाशाश्वत उत्पादनासाठी पारंपरिक पिकांसोबत वनशेतीचा...
हरभऱ्याला वाढती मागणी या सप्ताहात गेल्या सप्ताहाच्या तुलनेने कापूस, गहू...
भात निर्यातीसाठी मागणीबरोबरच भूराजकीय...भारतीय भात निर्यातदारांच्या वाढीसाठी जागतिक...
मका, साखर, हळदीच्या भावात घसरणया सप्ताहात गेल्या सप्ताहाच्या तुलनेने सोयाबीन...
अर्थमंत्री जेटली १ फेब्रुवारीला...नवी दिल्ली : केंद्रातील मोदी सरकार त्यांच्या...
कापूस उद्योगाचे अमेरिका-चीनच्या...जळगाव : चीन व अमेरिकेत मागील नऊ महिन्यांपासून...
सातत्याने ताळेबंद तपासत शेती राखली...जळगाव जिल्ह्यातील नायगाव (ता. मुक्ताईनगर) येथील...
हळदीच्या निर्यात मागणीत वाढया सप्ताहात गेल्या सप्ताहाच्या तुलनेने सर्वच शेती...
हळदीच्या स्थानिक, निर्यात मागणीत वाढया सप्ताहात नाताळच्या सुटीमुळे आंतरराष्ट्रीय...
ग्राहकाला आधारसक्ती केल्यास 1 कोटींचा...नवी दिल्ली: दूरसंचार कंपन्यांकडून मोबाइल फोन...
युरियाची आयात ४२ लाख टनांवरनवी दिल्ली : भारताची चालू आर्थिक वर्षातील...
मका, हळद वगळता इतर शेतमालाच्या भावात वाढया सप्ताहात गेल्या सप्ताहाच्या तुलनेने कापूस व...
कांदा उत्पादकांना दिलासा देण्यासाठी...छत्तीसगड, मध्य प्रदेश आणि राजस्थानमध्ये...
कापसाचा लांबवरचा कल वाढताया सप्ताहात गेल्या सप्ताहाच्या तुलनेने कापूस...
कापूस, हरभऱ्याची मागणी वाढतीया सप्ताहात गेल्या सप्ताहाच्या तुलनेने सोयाबीन व...
देशात ३४० लाख कापूस गाठी उत्पादनाचा...जळगाव : देशात सप्टेंबरच्या पावसासंबंधी अनियमितता...
द्राक्षाच्या तिहेरी विक्री व्यवस्थापनात...मालगाव (जि. सांगली) येथील संजय भीमराव बरगाले...