agriculture news in Marathi, govt approved 114 ethanol proposals, Maharashtra | Agrowon

इथेनॉलनिर्मितीसाठी ११४ प्रकल्पांना मंजुरी
कोजेन्सिस वृत्तसेवा
रविवार, 30 सप्टेंबर 2018

नवी दिल्ली ः देशातील अतिरिक्त साखर उत्पादन कमी करण्यासाठी आणि तेल आयातीवर नियंत्रण अणण्यासाठी केंद्राने इथेनॉलनिर्मितीला प्रोत्साहन दिले आहे. अलीकडेच सरकारने इथेनॉलच्या दरात वाढ करून कारखान्यांना निर्मिर्ती वाढविण्याचे आवाहन केले होते. त्यानुसार इथेनॉलनिर्मितीसाठी साखर कारखान्यांकडून आलेल्या एकूण प्रस्तावांपैकी केंद्राने ११४ प्रस्तावांना मान्यता दिली आहे. या कारखान्यांना केंद्राने सहा हजार १३९ कोटी रुपयांची कर्जे उपलब्ध करून देणार आहे, अशी माहिती केंद्र सरकारने प्रसिद्ध केलेल्या निवेदनातून मिळाली. 

नवी दिल्ली ः देशातील अतिरिक्त साखर उत्पादन कमी करण्यासाठी आणि तेल आयातीवर नियंत्रण अणण्यासाठी केंद्राने इथेनॉलनिर्मितीला प्रोत्साहन दिले आहे. अलीकडेच सरकारने इथेनॉलच्या दरात वाढ करून कारखान्यांना निर्मिर्ती वाढविण्याचे आवाहन केले होते. त्यानुसार इथेनॉलनिर्मितीसाठी साखर कारखान्यांकडून आलेल्या एकूण प्रस्तावांपैकी केंद्राने ११४ प्रस्तावांना मान्यता दिली आहे. या कारखान्यांना केंद्राने सहा हजार १३९ कोटी रुपयांची कर्जे उपलब्ध करून देणार आहे, अशी माहिती केंद्र सरकारने प्रसिद्ध केलेल्या निवेदनातून मिळाली. 

देशात २०१८-१९ चा हंगामात अतिरिक्त साखरेचा प्रश्न गंभार होणार असल्याची शक्यता आहे. त्यामुळे केंद्र सरकारने ब्राझीलचा धर्तीवर इथेनॉलनिर्मितीला प्राधान्य दिले आहे. त्यानुसार केंद्राने इथेनॉलच्या धोरणात बदल करत थेट उसाच्या रसापासून निर्मितीला मान्यता दिली. तसेच इथेनॉलच्या दरातही वाढ केली आहे. सरकारच्या आवाहनाला प्रतिसाद देत कारखान्यांनी इथेनॉल प्रकल्प निर्मिती किंवा अस्तित्वात असलेल्या प्रकल्पांची क्षमता वाढविण्यासाठी प्रस्ताव केंद्राकडे पाठविले होते. त्यापैकी ११४ प्रस्तावांना केंद्राने मान्यता दिली असून या कारखान्यांना सहा हजार १३९ कोटी रुपयांची कर्जे उपलब्ध करून देणार आहे. 

जूनमध्ये केंद्राने काराखान्यांना त्यांनी आपली इथेनॉलनिर्मिती क्षमता वाढवावी यासाठी ४ हजार ४४० कोटी रुपये कर्जे उपलब्ध करून देण्याची निर्णय घेतला होता. त्यानंतर आॅगस्टमध्ये सरकाने कारखान्यांना उपलब्ध करून द्यावयाच्या कर्जांवरील मर्यादा काढल्या. तसेच केंद्राने पहिल्यांदाच इथेनॉलच्या किंमती निर्मितीसाठी वापरण्यात येणाऱ्या मळीनुसार ठरविल्या आहेत. सी हेव्ही मोलॅसीपासून बनविण्यात येणाऱ्या इथेनॉलसाठी ४३.४६ रुपये प्रतिलिटर तर बी हेव्ही मोलॅसीसपासून तयार होणाऱ्या इथेनॉलसाठी ५२.४३ रुपये प्रतिलिटर दर जाहीर करण्यात आले आहेत. तसेच थेट उसाच्या रसापासून (१०० टक्के कॉन्सट्रेटेड) तयार होणाऱ्या इथेनॉलसाठी प्रतिलिटर ५९.१३ रुपये प्रतिलिटर दर केंद्राने जाहिर केला आहे.

सहा टक्के व्याज किंवा ५० टक्के व्याज सवलत
केंद्राने मान्यता दिलेल्या एकूण सहा हजार १३९ कोटी रुपयांपैकी ५ हजार ३२४ कोटी रुपये नवीन इथेनॉल प्रकल्प उभारणीसाठी तसचे अस्तित्वात असलेल्या प्रकल्पांची क्षमता वाढविण्यासाठी तरतूद केली आहे. ज्या कारखान्यांनी इन्सिनेरेशन ब्राॅलयर बसविण्यासाठी प्रस्ताव पाठविले होते त्यांच्यासाठी ८१५ कोटी रुपयांची तरतूद केली आहे. मान्यता मिळालेल्या प्रस्तावांना केंद्राने ठरवून दिल्याप्रमाणे व्याज अनुदान  देण्यात येणार आहे. पाच वर्षांसाठी वार्षिक सहा टक्के व्याज किंवा बॅंका आकारत असलेल्या व्याजदराच्या ५० टक्के, या पैकी जी रक्कम कमी आहे ती आकारली जाईल.

इतर अॅग्रो विशेष
नांदेड जिल्ह्यात मुगाची उत्पादकता...नांदेड ः यंदा नांदेड जिल्ह्यातील १४ तालुक्यांतील...
संतप्त शेतकऱ्यांनी हवामान विभागाला...पुणे : हवामान विभागाचा अंदाज चुकीचा...
जलयुक्त शिवार, शेततळ्यांमुळे संरक्षित...अमरावती   : जिल्ह्यात शेततळी, जलयुक्त शिवार...
तिसगाव उपबाजारात चाऱ्यासाठी उसाला...तिसगाव, जि. नगर  : पाथर्डी तालुक्‍यात...
तुझे आहे तुजपाशी जगाच्या सरासरीच्या दीडपट पाऊस भारतात पडतो तरी...
सूक्ष्म सिंचनात अडचणी मोठ्या राज्यात पाण्याचे दुर्भिक्ष...
भातशेती वाचविण्यासाठी शेतकऱ्यांची धडपडनगर ः ‘पोळ्यापासून पाऊस नाही. पोळ्याला गेला तरी...
ठिबकचा तिढा सुटला, नोंदणीला होणार सुरवातनागपूर  ः ठिबक संदर्भातील नोंदणीवर वितरकांनी...
महिला बचत गटाने सुरू केली बियाणे बँकपाटीलवाडी (धामणवन) (ता. अकोले, जि. नगर) या...
शेती अन् ग्रामविकासासाठी आलो एकत्रअकोला शहरात विविध क्षेत्रांत काम करणाऱ्यांनी...
थेट शेतीमाल विक्री ठरली नावापुरतीचपुणे  ः फळे भाजीपाला नियमनमुक्तीनंतर शेतकरी...
‘सीसीआय’च्या खरेदी केंद्रासाठी...जळगाव  ः खासगी जिनिंगमध्ये कापूस खरेदीसंबंधी...
गटशेतीला प्रोत्साहनासाठी निकषांत बदलपुणे : राज्याच्या गटशेती धोरणाला आलेली मरगळ...
जळगावला ‘हीट’चा चटका ः पारा ३८ अंशांवरपुणे : राज्यात ऑक्टोबर हीटच्या चटक्यात जळगाव...
संकटातील सूतगिरण्यांना वीज दरवाढीचा...कोल्हापूर : महावितरणने वीज दरवाढीचा बडगा...
उसाच्या जनुकीय संरचनेतून उलगडली अनेक...गेल्या अनेक शतकांपासून ऊस हे पीक साखरेसोबतच...
दुर्गम सातपुड्यात नवतंत्रज्ञानाचा...नंदुरबार जिल्ह्यात सातपुडा पर्वतातील दुर्गम धनाजे...
‘ब्रॉयलर’ संगोपनासोबत भक्कम विक्री...नांदेड जिल्ह्यातील झरी (ता. लोहा) येथील मारुतीराव...
चक्रीवादळाची तीव्रता कमी होण्यास सुरवातपुणे : बंगालच्या उपसागरात तयार झालेले तितली...
टेंभू योजनेचे पाणी घाटमाथ्यावर कधी येणारसांगली ः टेंभू उपसा सिंचन योजनेचे पाणी...