agriculture news in marathi, govt. asked to milk sangh is powder made by milk perchaced from farmers, Maharashtra | Agrowon

शेतकऱ्यांकडून घेतलेल्याच दुधाची भुकटी केली का?
चंद्रकांत जाधव
मंगळवार, 18 सप्टेंबर 2018

अनुदानासंबंधी आम्ही मागणी केली आहे. त्यासंबंधी शासनाने आमच्याकडे गायीचे दूध पुरवठादारांची सविस्तर माहिती, बॅंक खाते क्रमांक, गायीचे दूध संकलन याची माहिती मागितली आहे. ती संकलित करून शासनाला दिली जात आहे. जे शेतकरी कमी दूधपुरवठा करतात, त्यांचे बॅंक खाते क्रमांक मिळण्यास अडचणी येत आहेत.
- मनोज लिमये, कार्यकारी संचालक, जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ मर्या., जळगाव

जळगाव ः राज्यात प्रतिदिन सहकारी व इतर प्रमुख दूध संघ, संस्था १० लाख लीटर अतिरिक्त ठरणाऱ्या गायीच्या दुधाची भुकटी तयार करतात. या भुकटीसंबंधी शासनाने प्रतिलीटर पाच रुपये अनुदान देण्याचे जाहीर केले होते. परंतु, कोट्यवधींचे अनुदान दीड महिन्यापासून रखडले आहे. दूध संघांनी हे अनुदान मागितले असता ज्या दुधाची भुकटी केली, ते दूध गायीचेच होते का? दूध शेतकऱ्यांकडूनच घेतले का? असा प्रतिप्रश्‍न शासकीय यंत्रणांनी दूध संघांना विचारला आहे. यामुळे हे अनुदान मिळण्याची प्रक्रिया आणखी लांबणीवर पडेल, अशी स्थिती आहे. 

दूधधंदा अडचणीत येत असतानाच दूध उत्पादकांना कमी दरांचा फटका बसल्याने शासनाने शेतकऱ्यांशी संबंधित नेते, संघटना यांच्या आंदोलनानंतर १ ऑगस्ट, २०१८ पासून गायीच्या दुधाला २५ रुपये प्रतिलीटर दर संघ व इतर खाजगी दूध संकलन करणाऱ्या संस्थांनी देण्याचे बंधनकारक केले. तसेच संघ, खासगी संस्थांमध्ये रोज अतिरिक्त ठरणाऱ्या गायीच्या दुधापासून जी भुकटी तयार केली जाईल, त्यासंबंधी शासन प्रतिलिटर पाच रुपये प्रमाणे अनुदान देईल, असेही जाहीर केले. राज्यात तालुका व जिल्ह्यांचे सहकारी दूध संघ व इतर प्रमुख संस्था मिळून रोज १० लाख लीटर अतिरिक्त गायीच्या दुधाचे संकलन करून त्यापासून भुकटी करीत आहेत. 

शासनाला रोज ५० लाख रुपये अनुदान दूध संघांना या भुकटीसंबंधी देय आहे. दर महिन्याला १५० कोटी रुपये अनुदान देय आहे. अर्थातच ही बाब लक्षात घेता मागील दीड महिन्याचे सुमारे २२५ कोटी रुपये अनुदान शासनाला देय आहे. 

या अनुदानासंबंधी सहकारी दूध संघांनी शासनाला पत्र दिले, त्यावर शासनाने ज्या गायीच्या दुधाची भुकटी केली, त्याची सर्व सविस्तर माहिती मागविली आहे. तसेच जे दूध घेतले ते शेतकऱ्यांकडूनच घेतले का व ते गायीचेच होते का, असा प्रश्‍न केला आहे. दूध संघांकडे शेतकऱ्यांचे बॅंक खाते क्रमांक नाहीत. दूध संघ दूधपुरवठादार सोसायटीला निश्‍चित दिवसांचे दुधाचे पैसे सोसायटीच्या बॅंक खात्यात जमा करतो. मग सोसायट्या हा निधी दूधपुरवठादार, दूध उत्पादकांना रोखीने देतात. ही बाब लक्षात घेता आता दूध संघांनी या अनुदानासंबंधी आता गायीचे दूध पुरविणाऱ्या सोसायट्यांमधील सभासद, दूध उत्पादकांचे बॅंक खाते क्रमांक गोळा करून ती माहिती शासनाला देण्याची कार्यवाही सुरू केली आहे. त्यात आणखी काही दिवस लागतील. मग शासन सर्व बाबींची माहिती मिळाल्यानंतर पडताळणी, तपासणी करील. यानंतर अनुदानाचा मार्ग मोकळा होईल. यात अनेक दिवस जातील, अशी स्थिती आहे. 

टॅग्स

इतर अॅग्रो विशेष
आदिवासींचं श्रद्धास्थान असलेल्या कचारगड...कचारगड, जि. गोंदिया : मध्य भारतातील सर्व आदिवासी...
मराठवाड्यात दीड महिन्यात ७७...औरंगाबाद : मराठवाड्यातील शेतकरी आत्महत्यांचे सत्र...
चार वर्षांत संत्रा उत्पादकांची दखलच...नागपूर : कोट्यवधी रुपयांची उलाढाल असलेल्या आणि...
सांगली जिल्ह्यातील सहा कारखाने...सांगली  ः सहा कारखान्यांनी एकरकमी एफआरपी...
साखरेच्या टेंडरना प्रतिसाद नाही; दर...कोल्हापूर : साखरेच्या विक्री मूल्यात...
कांदा अनुदानाचे ११४ कोटी ‘पणन’ला वर्गसोलापूर : राज्यातील एक लाख ६० हजार शेतकऱ्यांसाठी...
देशातील हळद उत्पादनात वाढीची शक्यतासांगली ः यंदा देशातील महाराष्ट्र वगळता हळद...
किमान तापमानात चढ-उतार शक्य;...पुणे : उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्यांचे...
शेतीच्या मूळ दुखण्यावर हवा इलाज येत्या लोकसभा निवडणुकांत...
पोकळ घोषणा, की भक्कम आधार  पंतप्रधान नरेंद्र मोदी नुकतेच...
दुष्काळ निधीच्या याद्यांच्या नावे महसूल...जळगाव ः खानदेशात दुष्काळ निधीसंबंधी जिल्हा...
मराठवाड्याच्या घशाला कोरडऔरंगाबाद : मराठवाड्यातील पाणीसाठ्यांची...
‘स्वराज्य स्वर्णिम' योजनेद्वारे गड-...पुणे ः ग्रामीण पर्यटनातून रोजगार निर्मितीला...
कार्यकर्त्यांवर दडपशाही करून लाँग मार्च...नगर ः सरकारच्या विश्वासघाताविरोधात २०...
विठ्ठल विठ्ठल गजरी, अवघी दुमदुमली पंढरीपंढरपूर, जि. सोलापूर: माघ वारीसाठी (जया...
महिला सक्षमीकरणाला गती : नरेंद्र मोदी यवतमाळ : यवतमाळसह राज्यात महिला बचत गटांचे...
द्राक्षाला निर्यातीची गोडीमुंबई  ः यंदा देशातील द्राक्ष हंगामावर...
राज्यात थंडी वाढली, निफाड पुन्हा ६...पुणे: वातावरणात झालेल्या बदलामुळे वाढलेले किमान...
देशी गाईंचा दूध व्यवसाय ठरला फायदेशीरगेल्या तीन वर्षांपासून शेतकऱ्यांकडून देशी गाईचे...
'उगम' करतेय शेती, पर्यावरण अन्‌...गेल्या बावीस वर्षांपासून शाश्वत ग्रामीण...