Agriculture News in Marathi, Govt to bring 12 lakh hectares land under micro-irrigation, Said Union agriculture minister Radha Mohan Singh, India | Agrowon

बारा लाख हेक्टर क्षेत्र यंदा सूक्ष्म सिंचनाखाली : कृषिमंत्री सिंह
वृत्तसेवा
सोमवार, 16 ऑक्टोबर 2017
नवी दिल्ली ः यंदाच्या अार्थिक वर्षात देशातील १२ लाख हेक्टर क्षेत्र सूक्ष्म सिंचनाखाली अाणण्याच्या दिशेने केंद्र सरकार काम करत अाहे, अशी माहिती केंद्रीय कृषिमंत्री राधामोहन सिंह यांनी दिली.
 
तसेच देशातील ९९ सिंचन प्रकल्प मार्च २०१९ पर्यंत प्राधान्यक्रमाने पूर्ण करण्याचे केंद्र सरकारचे निर्याजन अाहे. यामुळे एकूण ७६ लाख हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली अाणण्यास मदत होईल, असेही त्यांनी सांगितले.
 
नवी दिल्ली ः यंदाच्या अार्थिक वर्षात देशातील १२ लाख हेक्टर क्षेत्र सूक्ष्म सिंचनाखाली अाणण्याच्या दिशेने केंद्र सरकार काम करत अाहे, अशी माहिती केंद्रीय कृषिमंत्री राधामोहन सिंह यांनी दिली.
 
तसेच देशातील ९९ सिंचन प्रकल्प मार्च २०१९ पर्यंत प्राधान्यक्रमाने पूर्ण करण्याचे केंद्र सरकारचे निर्याजन अाहे. यामुळे एकूण ७६ लाख हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली अाणण्यास मदत होईल, असेही त्यांनी सांगितले.
 
नवी दिल्ली येथे पाचव्या जल सप्ताहाच्या समारोप कार्यक्रमात ते बोलत होते. या वेळी केंद्रीय जलसंपदाराज्य मंत्री अर्जून राम मेघवाल उपस्थित होते. या वेळी देशातील जलस्रोतांविषयीचे केंद्रीय जल अायोगाच्या मोबाईल ॲपचे लॉचिंग करण्यात अाले.
 
कृषिमंत्री सिंह म्हणाले, की यंदा (२०१६-१७) ८ लाख हेक्टर क्षेत्र सूक्ष्म सिंचनाखाली अाणू शकते. अाता १२ लाख हेक्टर क्षेत्र सूक्ष्म सिंचनाखाली अाणण्याचा प्रयत्न अाहे. पुढील दोन वर्षांत २० लाख हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येईल. गेल्या काही वर्षात जे शक्य झाले नाही; ते अाता शक्य होत अाहे, असा दावा त्यांनी केला अाहे. पाण्याची बचत करा, पाण्याचा कार्यक्षम वापर करा, असा सल्ला त्यांनी या वेळी दिला. 
 
जलसंपदा राज्यमंत्री मेघवाल यांनी पाण्याचे महत्त्व पटवून देण्यासाठी जागृती करण्याची गरज व्यक्त केली. भविष्यातील पिढीसाठी नैसर्गिक जलस्रोतांचे संवर्धन करण्याची जबाबदारी सर्वांची अाहे. पाण्याचा योग्य वापर केला पाहिजे; त्याचा गैरवापर थांबला पाहिजे, असे त्यांनी या वेळी बोलताना सांगितले. जल सप्ताहाची सुरवात १० अाॅक्टोबर रोजी झाली अाहे.
 
देशातील ९९ सिंचन प्रकल्प मार्च २०१९ पर्यंत प्राधान्यक्रमाने पूर्ण करण्याचे केंद्र सरकारचे निर्याजन अाहे. तर पुढील दोन वर्षांत २० लाख हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली अाणले जाणार अाहे. 
- राधामोहन सिंह, केंद्रीय कृषिमंत्री

इतर बातम्या
बारामतीतील विकासाचे काम देशातील...बारामती : ग्रामीण विकासाच्या माध्यमातून सामान्य...
सुकाणू समितीच्या कार्यकारिणीची जवळगाव...अंबाजोगाई, जि. बीड : शेतकरी संघटना व सुकाणू...
मराठवाड्यात पीककर्ज वितरण कासवगतीनेऔरंगाबाद : आढावा बैठकींचा सपाटा, काही ठिकाणी...
‘बोंड अळी व्यवस्थापनाचा महाराष्ट्र...परभणी : कपाशीवरील गुलाबी बोंड अळीच्या...
रताळ्याच्या पिठापासून ‘अ’...टांझानियातील एका खासगी कंपनीने ‘अ’ जीवनसत्त्वांनी...
पोकराअंतर्गत ८४ गावांत आंतरपीक...परभणी : नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पांतर्गत...
पीककर्ज वाटपाचा टक्का वाढेनाअकोला  : शेतकऱ्यांना पीककर्ज वाटपाच्या...
कांदा बाजारात दरवाढीचे संकेतनाशिक : राजस्थान व मध्य प्रदेशमध्ये...
कुलगुरू भट्टाचार्य यांचा राजीनामा अखेर...पुणे : दापोली येथील डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी...
नाशिक बाजार समिती संचालकांवर गुन्हे...नाशिक : आचारसंहिता काळात शासकीय वाहनाचा वापर...
उपराष्ट्रपती आज बारामतीतबारामती ः उपराष्ट्रपती वेंकय्या नायडू शुक्रवारी (...
‘प्रलंबित वीजजोडणीसाठी मोबाईल नोंदणी...मुंबई : मार्च-२०१८ अखेर राज्यात...
पुणे जिल्हा परिषदेच्या पशुसंवर्धन...पुणे : जिल्हा परिषदेच्या पशुसंवर्धन विभागाच्या...
ऊस उत्पादनवाढीसाठी तंत्रज्ञान...पुणे ः सहकारी साखर कारखाने शक्तिस्थळे असून,...
शेतकऱ्यांच्या उत्पन्नवाढीसाठी बहुस्तरीय...पुणे ः शेती क्षेत्राच्या विकासासाठी सिंचन,...
सातारा जिल्ह्यात सर्वदूर पाऊस; चार...सातारा : जिल्ह्यात दडी मारलेल्या पावसाने...
कापूस बाजारात भारताला संधीन्यूयाॅर्क ः चालू कापूस हंगामात पिकाला फटका...
मॉन्सून सक्रिय होण्यास प्रारंभ पुणे  ः अरबी समुद्र आणि हिंदी महासागर...
शेतकऱ्यांनी अपघात विमा योजनेचा लाभ...सातारा : राज्यातील सातबारा उताराधारक...
थकली नजर अन्‌ पाय...औरंगाबाद : घोषणा झाली, पण काय व्हतंय कुणास ठाऊक,...