agriculture news in marathi, govt. considering on subsidies export of 50 lac ton sugar, Maharashtra | Agrowon

साखर निर्यातीला अनुदानाची गोडी; ५० लाख टन निर्यातीचा प्रस्ताव
कोजेन्सिस वृत्तसेवा
रविवार, 16 सप्टेंबर 2018

नवी दिल्ली ः २०१८-१९ च्या ऊस गाळप हंगामात अतिरिक्त साखरेची समस्या कमी करण्यासाठी निर्यात आवश्यक आहे. त्यामुळे देशांतर्गत दरही सावरतील. यासाठी देशातून ५० लाख टन साखर निर्यातीसाठी अनुदानाची मागणी अन्न मंत्रालयाने केली आहे. साखर कारखान्यांना प्रतिटन १४० रुपये अनुदान देण्यात येणार आहे. यासंबंधीचा प्रस्ताव कॅबिनेटकडे मान्यतेसाठी पाठविण्यात आला आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली. 

नवी दिल्ली ः २०१८-१९ च्या ऊस गाळप हंगामात अतिरिक्त साखरेची समस्या कमी करण्यासाठी निर्यात आवश्यक आहे. त्यामुळे देशांतर्गत दरही सावरतील. यासाठी देशातून ५० लाख टन साखर निर्यातीसाठी अनुदानाची मागणी अन्न मंत्रालयाने केली आहे. साखर कारखान्यांना प्रतिटन १४० रुपये अनुदान देण्यात येणार आहे. यासंबंधीचा प्रस्ताव कॅबिनेटकडे मान्यतेसाठी पाठविण्यात आला आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली. 

आंतरराष्ट्रीय बाजारात दर कमी असल्याने देशातील साखर निर्यात करायची असल्यास अनुदान देणे आवश्यक आहे. त्यामुळे अन्न मंत्रालयाने २०१८-१९ च्या हंगामात ५० लाख टन साखरेला निर्यातीसाठी अनुदान देण्याची मागणी केली आहे. 

‘‘अन्न मंत्रालयाने साखर निर्यात अनुदान मागणीचा प्रस्ताव कॅबिनेटकडे मान्यतेसाठी पाठविला आहे. आता या प्रस्तावावर इतर मंत्रालयाकडून काय येणाऱ्या सूचना आणि मान्यतेची वाट पहात आहोत. पुढील आठवड्यात होणाऱ्या कॅबिनेटच्या बैठकीत या प्रस्तावाला मान्यता मिळण्याची शक्यता आहे,’’ असे सूत्रांनी सांगितले. 

अन्न मंत्रालयाने प्रस्तावित केलेले अनुदान हे मागील २०१७-१८ च्या हंगामातील अनुदानापेक्षा जास्त आहे. या हंगामात केंद्राने ऊस गाळप करणाऱ्या साखर कारखान्यांना प्रतिटन ५५ रुपये अनुदान दिले होते. या वेळी साखर कारखान्यांना २० लाख टन साखर निर्यात बंधनकारक केली आणि प्रत्येक कारखान्याला अनुदान मागण्यासाठी निर्यात कोटा ठरवून देण्यात आला. मात्र अनेक कारखान्यांना हे अनुदान अपुरे होते. 

असे असेल अनुदान
निर्यातीसाठी साखर उत्पादन करणाऱ्या कारखान्यांना प्रतिटन १४० रुपये अनुदान प्रस्तावीत आहे. तर निर्यात करण्यासाठी प्रतिटन २ हजार ५०० ते ३ हजार रुपये वाहतूक अनुदान देण्याचे प्रस्तावित केले आहे. समुद्र किनारी भागात साखर वाहतूक खर्च अनुदान २ हजार ५०० रुपये असेल. तर अंतर्गत भागात ३ हजार रुपये अनुदान देण्याची मागणी कॅबिनेटकडे करण्यात आली आहे,’’ अशी माहिती या निर्णय प्रक्रियेत सहभागी असलेल्या सूत्रांनी दिली.   

भारताकडे पर्याय नाही
भारतात साखरेचे विक्रमी उत्पादन झाल्याने अतिरिक्त साखरेचा प्रश्न निर्माण झाला आहे. २०१८-१९ च्या हंगामातही उत्पादन वाढणार असून मागील हंगमातील किमान १०० लाख टन साखर शिल्लक राहून एकूण पुरवठा ४५० लाख टन होण्याची शक्यता आहे. त्यामुळे भारताला निर्यात करावी लागणार आहे. जागतिक बाजारपेठेत साखरेचे दर कमी आहेत, त्यामुळे निर्यात करणे कारखान्यांना शक्य होत नाही. परिणामी देशातील साखर दर दबावात आहेत आणि कारखान्यांना शेतकऱ्यांची एफआरपी देणे अवघड झाले आहे, त्यामुळे अनुदान देऊन साखर निर्यात करण्याशिवाय भारताकडे पर्याय नाही. 

ब्राझील, आॅस्ट्रेलिया ‘डब्ल्यूटीओ’त जाणार
२०१८-१९ च्या हंगामात अन्न मंत्राल्याने आता अनुदान भरीव वाढ केल्याने साखर कारखान्यांना निर्यात वाढविणे शक्य होणार आहे. अनुदान भरीव असल्याने कारखान्यांना निर्यातसाठी प्रोत्साहन मिळेल, असे केंद्राला वाटत आहे. परंतु, जागातील ब्राझील आणि आॅस्ट्रेलिया हे दोन मोठे निर्यातदार देश या अनुदानाविरुद्ध जागतिक व्यापार संघटनेकडे (डब्ल्यूडीओ) साधी तक्रार करण्याची शक्यता आहे.  

इतर अॅग्रो विशेष
'शेतकऱ्यांना दिलासा देणारे निर्णय लवकरच...नवी दिल्ली  : समस्याग्रस्त शेती क्षेत्र आणि...
नंदुरबार, धुळ्यात पपई काढणी बंदनंदुरबार  : पपईच्या दरावरून शेतकरी, व्यापारी...
...त्या दिवशी घरातलं कुणी जेवलं नायसुपे, जि. पुणे : एकच बैल होता. चितऱ्या...
किमान तापमानात वाढ होण्याची शक्यतापुणे  : राज्याच्या किमान तापमानात वाढ...
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाला जगात...पुणे - द टाइम्स हायर एज्युकेशनने जाहीर...
पीक फेरपालटीवर भर देत श्रीमंती केळीचे...कलाली (ता. अमळनेर, जि. जळगाव) येथील योगेश व मनोज...
बळिराजाच्या हाती पुन्हा ‘लोखंड्या नांगर’गणूर, जि. नाशिक : शेतमालाला मिळणारे कवडीमोल भाव,...
दराच्या प्रतीक्षेतील कांद्याला फुटले...वडेल, जि. नाशिक :  आज ना उद्या दर वाढला, की...
पोटदुखीवर कडू कंद उपयुक्त कडू कंद ही वेलवर्गीय वनस्पती असून...
शिरूर ठरले मुगासाठी हक्काची बाजारपेठपुणे जिल्ह्यात शिरूर बाजार समिती ही मुगासाठी...
तहात अडकले ‘ब्रेक्झिट’युरोपीय महासंघातून बाहेर पडायचे अथवा नाही, या...
साखरेच्या कमी दराची शिक्षा ऊस...ऊस दराच्या बाबतीत कधी नव्हे एवढी आर्थिक कोंडी या...
बायोडायनॅमिक पद्धतीने कमी काळात कंपोस्ट...बायोडायनॅमिक तंत्रज्ञान हे मूलत: भारतीय वेदांवर...
पाने कुरतडणाऱ्या मुंग्यांकडूनही होते...उष्ण कटिबंधीय जंगले हे नायट्रस ऑक्साईड या हरितगृह...
पणन सुधारणेतील दुरुस्तीला शेतकरी...मुंबई ः महाराष्ट्र कृषी उत्पन्न पणन (विकास व...
ताराराणी महोत्सवातून घडली उद्यमशीलता,...कोल्हापूर जिल्हा परिषद व पंचायत राज विभागाच्या...
कृषी निविष्ठा अनुदानासाठी ‘ऑनलाइन'ची...पुणे : राज्यात कृषी विभागाच्या योजनांमधील विविध...
'आयमा'ची होतेय मुस्कटदाबी; मोठ्या...पुणे : ट्रॅक्टर, हार्वेस्टर, रोटाव्हेटरसारख्या...
विदर्भाच्या काही भागांत थंडीची लाट पुणे : उत्तर भारतात थंडीच्या वाढलेल्या...
संत्रा पिकातील सिट्रीस ग्रिनिंग...नागपूर : जागतिकस्तरावर संत्रा पिकात अतिशय गंभीर...