agriculture news in marathi, govt files complaint against three BT seed compainies, Vidharbha, Maharashtra | Agrowon

तीन बीटी कंपन्यांवर गुन्हे दाखल
टीम अॅग्रोवन
शनिवार, 28 ऑक्टोबर 2017

नागपूर : प्रयोगशाळेत तपासणीत बीटी बियाणे अयोग्य असल्याचा निष्कर्ष आल्याने कृषी आयुक्‍तालयाच्या आदेशावरून तीन बियाणे उत्पादकांविरोधात गुरुवारी (ता.२६) कृषी विभागाच्या तक्रारीवरून गुन्हे दाखल करण्यात आले. हे प्रकरण अत्यंत गुंतागुंतीचे असल्याचे सांगत याविषयी अधिक माहिती देण्यास विभागीय गुणवत्ता नियंत्रकाकडून नकार दिला जात होता. 

नागपूर : प्रयोगशाळेत तपासणीत बीटी बियाणे अयोग्य असल्याचा निष्कर्ष आल्याने कृषी आयुक्‍तालयाच्या आदेशावरून तीन बियाणे उत्पादकांविरोधात गुरुवारी (ता.२६) कृषी विभागाच्या तक्रारीवरून गुन्हे दाखल करण्यात आले. हे प्रकरण अत्यंत गुंतागुंतीचे असल्याचे सांगत याविषयी अधिक माहिती देण्यास विभागीय गुणवत्ता नियंत्रकाकडून नकार दिला जात होता. 

यवतमाळ जिल्ह्यात कपाशीवरील फवारणीदरम्यान विषबाधा होत २२ जणांचा मृत्यू झाला. सदोष बीटी बियाणे असल्याने त्यावर कीडरोगाचा प्रादुर्भाव वाढीस लागला. त्याच्या नियंत्रणासाठी शेतकऱ्यांना अधिक फवारण्या कराव्या लागल्या. त्यामुळे बीटी बियाणे उत्पादक कंपन्यादेखील चौकशीच्या कक्षेत आल्या होत्या. 

दरम्यान, नागपूर जिल्ह्यात विविध कंपन्यांच्या बीटी बियाण्याचे नमुने घेण्यात आले होते. हे बियाणे केंद्रीय कापूस संशोधन संस्थेकडे तपासणीसाठी पाठविण्यात आले. प्रयोगशाळेच्या अहवालात हे बियाणे अयोग्य असल्याचा निष्कर्ष समोर आला. हा अहवाल त्यानंतर केंद्रीय कृषी मंत्रालय; तसेच कृषी आयुक्तालयाकडे गेला. त्याआधारे कंपन्यांविरोधात गुन्हे दाखल करण्याचे आदेश गुरुवारी देण्यात आले. सहा बियाणे नमुने अयोग्य असल्याचे कळाल्यानंतर तीन बियाणे नमुनेप्रकरणी नरखेड, पारशिवणी, सावनेर या पोलिस ठाण्यात तीन वेगवेगळे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. 

कंपन्यांचे नाव तपासात होणार जाहीर
नमुने गोपनीय घेतले जातात. त्यावर ठराविक कोड असल्याने कंपनीचे नाव न टाकता पोलिस तक्रार करण्यात आली आहे. पोलिसांच्या चौकशीत या कंपन्यांच्या नावाचा खुलासा होईल. त्याआधारे मग कंपन्यांची नावे जाहीर होतील व पुढील कारवाई होईल, असे कृषी विभागाने सांगितले. विशेष म्हणजे गुन्हा दाखल झाल्यानंतरही कृषी विभागाकडून या प्रकरणाची माहिती देण्यास गोपनीयता बाळगली जात आहे.

इतर अॅग्रो विशेष
फिलिपिन्सच्या शाश्वत शेतीचे गमकफिलिपिन्स हा शेतीप्रधान देश आहे. येथील शेतकरी...
सेंद्रिय शेतीसाठी विविध योजना मानवी आरोग्य आणि पर्यावरण रक्षणाच्या दृष्टीने...
आंबा पालवीवरील किडींचे एकात्मिक...सर्वसाधारणपणे आंबा पिकामधे नोव्हेंबर महिन्याच्या...
राज्यात ग्रामीण घरकुल योजनेला मिळणार गतीमुंबई : राज्यात ग्रामीण घरकुल योजनेंतर्गत...
करडई पीक सल्लागेल्या काही दिवसांत राज्यात पुन्हा अनेक ठिकाणी...
थंडीची तीव्रता वाढेल, हवामान कोरडे राहीलमहाराष्ट्रावरील हवेच्या दाबात वाढ होऊन तो १०१२...
रोग-किडींमुळे कापूस उत्पादकांना १५ हजार...शेतकरी मेटाकुटीस, नुकसानीचा पंचनामा आणि मदतीची...
जैवइंधनातून नवीन अर्थनीती निर्माण होणारपुणे : इथेनॉलचा वापर आणि जैवइंधनाच्या...
साखरेच्या किमती सहा महिन्यांत २००...कोल्हापूर : साखरेच्या दरात गेल्या सहा महिन्यांत...
नाशिक ११.४ अंश; गारठा वाढलापुणे : अंदमान निकाेबार समुद्रालगत तयार...
राज्यात पेरू प्रतिक्विंटल ८०० ते ७०००...नागपुरात प्रतिक्विंटल ६००० ते ७००० रुपये नागपूर...
दुष्काळाचे निकष हवेत व्यावहारिक दुष्काळ जाहीर केला, की कृषिपंपांच्या वीजबिलात...
आता पर्याय हवाचरसशोषक किडींबरोबर गुलाबी बोंड अळीकरिताही...
कांद्यावर ८५० डॉलर किमान निर्यातमूल्यनवी दिल्ली/नाशिक : देशांतर्गत दरावर नियंत्रण...
सौर कृषिपंप योजना गुंडाळली?केंद्र सरकारकडून अनुदान देण्यास हात वर मुंबई :...
बीटी कंपन्यांविरोधात तक्रारीस पोलिसांची...वर्धा : कायद्याच्या अखत्यारीत येत नसल्याचे कारण...
धोरणात्मक बदल न केल्यास दूध संघांचा संप...विस्कटलेल्या दूध धंद्याचे भरकटलेले धोरण : भाग ५...
सूक्ष्म सिंचन अनुदानाचे भिजत घोंगडेमुंबई : राज्यातील सूक्ष्म सिंचन योजनेच्या...
हवामान कोरडे, थंडी परतलीपुणे : राज्यावरील ढगांची रेलचेल कमी होताच,...
पीक अवशेषांचे ब्रिक्वेटिंग शेतकऱ्यांसह...शेतीमध्ये उत्पादित होणाऱ्या पीक अवशेषांची...