agriculture news in marathi, govt grants permission to flower and honey wine making | Agrowon

फुले आणि मधापासून वाइननिमिर्तीस परवानगी
दीपा कदम : सकाळ न्यूज नेटवर्क
सोमवार, 29 जानेवारी 2018

मुंबई : फुले आणि मधापासून वाइन बनविण्याचा मार्ग आता मोकळा झाला आहे. चिकू, आंबा, गुलाबापासून वाइन तयार करण्यासाठी राज्य सरकारने परवानगी दिली असून, फुलांच्या वाइनमध्येदेखील मधाचा वापर केला जाणार आहे. 

मुंबई : फुले आणि मधापासून वाइन बनविण्याचा मार्ग आता मोकळा झाला आहे. चिकू, आंबा, गुलाबापासून वाइन तयार करण्यासाठी राज्य सरकारने परवानगी दिली असून, फुलांच्या वाइनमध्येदेखील मधाचा वापर केला जाणार आहे. 

फुले आणि मधापासून वाइन तयार करण्यासाठी महाराष्ट्र हे देशातले पहिले राज्य असणार आहे. फुले आणि फळांमध्ये मधाच्या वापरामुळे आंबवण्याची प्रक्रिया ही अधिक जलद गतीने होत असल्याने फुले आणि फळांच्या वाइनमध्येदेखील मध वापरता येणार आहे. शिवाय मधामध्ये नैसर्गिक साखर असल्याने या वाइनमध्ये साखरेचे प्रमाण इतर वाइनच्या तुलनेत कमी असणार आहे. द्राक्षांपासून वाइन बनविण्यामध्ये राज्याच हिस्सा देशात ९० टक्‍के आहे. राज्याने अलीकडेच बीअर आणि वाइन बनविणे नियम १९६६ मध्ये बदल केले आहेत. ज्यामध्ये स्पीरिटस किंवा अल्कोहोलशिवाय फळ, फुले आणि मधापासून वाइन तयार करण्यासाठी परवानगी दिली.

पुणे, नाशिक आणि विदर्भातील काही भागात फुले आणि फळांपासून वाइन तयार केली जाते. पाणी आणि ईस्ट वापरून ही वाइन तयार केली जात होती; मात्र या वाइनना परवानगी नसल्याने अशाप्रकारच्या वाइनना मोठी बाजारपेठ उपलब्ध होऊ शकली नव्हती. आता मध वापरून ही वाइन तयार करता येणार आहे. मधापासून वाइन तयार करण्यात आल्यानंतर दोन महिन्यांनंतर किंवा त्यानंतर कधीही घेतली तर तिची चव अधिक वाढणार आहे.

इतर अॅग्रो विशेष
अकोला जिल्हा प्रशासन शेतकऱ्यांना देणार...अकोला ः देशात राबवल्या जात असलेल्या प्रधानमंत्री...
दक्षिण महाराष्ट्रातील कारखान्यांत ८०...सांगली/कोल्हापूर ः साखरेला दर नसल्याने निराश...
सीताफळाच्या योग्य जातींची करा लागवडमहाराष्ट्रात सीताफळाच्या झाडांचे काही नैसर्गिक...
उत्पादकांसाठी बेदाणा गोडसांगली ः यंदाच्या बेदाणा हंगामात बेदाण्याच्या...
केळी दरात किंचित सुधारणाजळगाव ः रावेर, यावलमध्ये केळीची आवक वाढलेली...
मका चार वर्षांतील नीचांकी पातळीवरनवी दिल्ली ः बजारात मका आवक वाढल्यांतर मागणी कमी...
कामाच्या अतिरिक्त ताणामुळे पणन संचालक...पुणे ः पणन संचालकपदी पूर्णवेळ नियुक्ती असताना...
​​राज्य सरकार राबविणार मधुमक्षिका मित्र...पुणे : शहरी भागात मधुमक्षिकांचे पोळे दिसले, की ते...
ग्रामस्वच्छता अभियानात प्रभाग, गटातून...नगर ः ग्रामीण भागात स्वच्छतेची व्यापी...
केसर आंबा पाडाला आलाय...औरंगाबाद : आपली चव, गंध आणि रूपाने ग्राहकांना...
बदल्या समुपदेशनानेच...पुणे : राज्याच्या कृषी विभागात समुपदेशनाने बदल्या...
अरबी समुद्रात चक्रीवादळाचे संकेतपुणे : ‘सागर’ चक्रीवादळापाठोपाठ अरबी समुद्रात...
पाणलोट, मृदसंधारण घोटाळ्याचा पर्दाफाशपुणे : कृषी खात्यातील पाणलोट व मृदसंधारण...
ब्राझील, थायलंडचा यंदा इथेनॉलकडे वाढता...कोल्हापूर : आंतरराष्ट्रीय बाजारात सर्वत्रच...
बारमाही भाजीपाला शेतीला नर्सरी...ब्राह्मणगाव (जि. नाशिक) येथील केवळ वाघ पूर्वी...
सुधारित तंत्राची मिळाली गुरुकिल्लीअकोला जिल्ह्याचे मुख्य उन्हाळी पीक कांद्याची...
भाराभर चिंध्या राज्यात १२७ वा पशुसंवर्धन दिन नुकताच साजरा...
मथुरेचं दूध का नासलं?राज्यात मे महिन्याचे तापमान यंदा नैसर्गिक आणि...
चिमुरड्याच्या कॅमेऱ्यात कैद आनंदी शेतकरीआपल्याकडील शेतकरी आनंदी असू शकतो का? उत्तर...
‘अ’तंत्र निकेतनपुरेसा अभ्यास आणि तयारीअभावी, यंत्रणेचा विरोध...