agriculture news in Marathi, Govt hikes import duty on kabuli chana to 60 percent, Maharashtra | Agrowon

काबुली हरभरा आयात शुल्क ६० टक्क्यांवर
कोजेन्सिस वृत्तसेवा
गुरुवार, 22 मार्च 2018

नवी दिल्ली ः हरभरा आवक बाजारात सुरू झाल्यापासूनच देशांतर्गत बाजारात दर हमीभावाच्या खाली होते. त्यामुळे विदेशांतून होणारी आयात रोखण्यासाठी आणि देशांतर्गत बाजारात हरभरा दर वाढावे, यासाठी सरकारने मंगळवारी (ता. २०) काबुली हरभऱ्याच्या आयात शुल्कात ४० टक्क्यांवरून ६० टक्क्यांपर्यंत वाढ केली आहे.

नवी दिल्ली ः हरभरा आवक बाजारात सुरू झाल्यापासूनच देशांतर्गत बाजारात दर हमीभावाच्या खाली होते. त्यामुळे विदेशांतून होणारी आयात रोखण्यासाठी आणि देशांतर्गत बाजारात हरभरा दर वाढावे, यासाठी सरकारने मंगळवारी (ता. २०) काबुली हरभऱ्याच्या आयात शुल्कात ४० टक्क्यांवरून ६० टक्क्यांपर्यंत वाढ केली आहे.

 देशात यंदा परतीचा मॉन्सून बराच काळ रेंगाळल्याने अनेक भागांत शेवटी चांगला पाऊस झाला. त्यामुळे रब्बी पेरणीला पोषक वातावरण होते. त्यातच मागील वर्षी चांगला दर मिळाल्याने यंदा शेतकऱ्यांनी हरभरा पेरणीला प्राधान्य दिले.  
पोषक वातवरण आणि वाढलेल्या पेरणीमुळे देशात हरभरा पिकाचे बंपर उत्पादन होणार असल्याचा अंदाज कृषी विभागाने आधीच जाहीर केला आहे. मात्र हरभरा हंगामाच्या सुरवातीलाच माल थोडाबहुत बाजारत येण्यास सुरवात झाल्यानंतर दर हमीभावापेक्षा १००० रुपयांपर्यंत खाली आले होते. सध्या मोठ्या प्रमाणात हरभरा आवक बाजारात होत आहे. सरकारने दर वाढण्यासाठी याआधी आयातशुल्क वाढविले होते. मात्र त्याचा फायदा झाला नाही. आता सरकारने काबुली हरभऱ्यावरील आयात शुल्क ६० टक्क्यांपर्यंत वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. 

सरकारने आयात होणाऱ्या काबुली हरभऱ्याच्या हार्मोनाईज्ड सिस्टिम कोडला काबुली हरभरा आणि बंगाली हरभरा किंवा देशी हरभरा असे विभाजन करून ६० टक्के आयात शुल्क लागू केले आहे. हार्मोनाईज्ड सिस्टिम कोड हे आंतरराष्ट्रीय बाजारात व्यापार होणाऱ्या कमोडिटीचे वर्गीकरण करण्यासाठी नाव आणि नंबरची आंतरराष्ट्रीय प्रमाणित सिस्टिम आहे. सरकारच्या या निर्याणयाने देशात होणाऱ्या आयातीला पायबंद बसून देशांतर्गत हरभऱ्याचे दर वाढण्यास मदत होणार आहे.

इतर अॅग्रो विशेष
विश्वासावर बहरेल व्यापारचीन-अमेरिकेमध्ये चालू असलेल्या व्यापार युद्धाच्या...
निवडणुकीने दुष्काळ खाऊन टाकू नये म्हणून...लोकसभेच्या निवडणुकीमुळे राजकीय हवामान-बदल होत...
उपलब्ध पाण्याचे गणित मांडा...अनेक कारणांमुळे जलसंधारण ही सोपी वाटणारी म्हणून...
उत्कृष्ठ कारली पिकवण्यात पाटील यांचा...लोणी (ता. चोपडा, जि. जळगाव) येथील भरत, गणेश व...
पेरू, अॅपलबेरमधून पीक बदल, कष्टातून...पारंपरिक शेती पद्धतीत बदल करून व सेंद्रिय...
राज्यात उरले अवघे ३०५ टीएमसी पाणीपुणे (प्रतिनिधी) : उन्हाच्या झळांना होरपळ वाढून...
केंद्राकडून यंदा खरिपात १२ टक्के अधिक...पुणे : राज्यासाठी गेल्या खरीप हंगामाच्या तुलनेत...
उन्हाचा चटका पुन्हा वाढण्याची शक्यतापुणे : मागील आठवड्यात झालेला पूर्वमोसमी वादळी...
सूर्य तळपताना छत करा दुरुस्तआठवड्यापूर्वी आलेल्या चांगल्या पावसाच्या अंदाजाने...
आयोगाचा कारभार प्रश्‍नचिन्हांकितप्रत्येक निवडणुकीची रीत न्यारी असते,...
पाणी व्यवस्थापनातून वाढविली कापसाची...आत्महत्याग्रस्त यवतमाळ जिल्ह्यातील अंबोडा (ता....
पाणी व्यवस्थापनातून नळावणे गावाची...अनेक वर्षांच्या पाणीटंचाईतून मुक्त होण्यासाठी...
डेरे यांनी उभारली अत्याधुनिक सिंचन...सातारा जिल्ह्यातील कवठे येथील अतुल डेरे यांनी...
‘आर्टिफिशियल इंटिलिजन्स’कडे आयटी...‘आर्टिफिशियल इंटिलिजन्स’ हेच येत्या काळातील...
पाणी व्यवस्थापनातून ग्रामविकासपाण्यासाठी कायम संघर्ष करीत असलेल्या कान्होळ (जि...
अवघी कारभारवाडी झाली ठिबकमयकोल्हापूर जिल्ह्यातील कारभारवाडी (ता. करवीर) येथे...
सर्वाधिक ६५० शेततळ्यांचं अजनाळेसोलापूर जिल्ह्यातील सांगोला तालुका दरवर्षीच...
अल्पभूधारकांच्या आयुष्यात जलश्रीमंती बुलडाणा जिल्ह्यात जानेफळ परिसरात शासनाच्या...
सत्तावीस गटांच्या बळातून घडली किमयासंगमनेर (जि. नगर) तालुक्यातील सावरगाव तळ...
वाघाड पाणीवापर संस्थांनी शेतीतून उभारले...नाशिक जिल्ह्यात वाघाड प्रकल्पस्तरीय पाणीवापर...