agriculture news in marathi, Govt hikes import duty on sugar to 100% from 50%; chana to 40% | Agrowon

साखर अायात शुल्क १००, तर चना ४० टक्के
कोजेन्सिस वृत्तसेवा
बुधवार, 7 फेब्रुवारी 2018

नवी दिल्ली : साखरेच्या घसरत्या किमतींनंतर हतबल झालेल्या उद्योगाला सावरण्यासाठी केंद्र सरकारने अखेर १०० टक्के आयात शुल्क लागू करून मोठा दिलासा दिला. याशिवाय चना (हरभरा) आयातीवरील ३० टक्के शुल्कात १० टक्के वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. 

नवी दिल्ली : साखरेच्या घसरत्या किमतींनंतर हतबल झालेल्या उद्योगाला सावरण्यासाठी केंद्र सरकारने अखेर १०० टक्के आयात शुल्क लागू करून मोठा दिलासा दिला. याशिवाय चना (हरभरा) आयातीवरील ३० टक्के शुल्कात १० टक्के वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. 

केंद्र सरकारने चन्यावरील अायात शुल्क ४० टक्के करताच वायदे बाजारात १ टक्क्याने दरात सुधारणा झाली. एनसीडीएक्सच्या मार्चकरिताच्या वायद्यात चन्यात १.५ टक्के वाढ होऊन ३८७० रुपये प्रतिक्विंटलपर्यंत सुधारणा नोंदली गेली. मात्र, गेल्या काही महिन्यांपासून कमी व्यवहार होत असलेल्या साखरेत तसा कोणताही बदल दिसून आला नाही. स्थानिक घाऊक बाजारातील मात्र साखर दरात वाढ नोंदली गेली. 
डिसेंबर २०१७ मध्ये केंद्र सरकारने स्थानिक दरातील घट रोखण्यासाठी चन्यावर ३० टक्के आयात शुल्क लागू केले होते; परंतु हरभऱ्याचे बंपर उत्पादन होण्याच्या संकेतामुळे बाजारावर फारसा परिणाम झाला नव्हता. 

रब्बी हंगामात यंदा १०.७२ दशलक्ष हेक्टर क्षेत्रावर हरभऱ्याची पेरणी झाली. गेल्या वर्षीच्या तुलनेत त्यात ८.३ टक्के वाढ झाली आहे. चन्यावरील आयात शुल्क वाढविल्यानंतर परदेशातून होणाऱ्या आयातीवर बंधन येणार असून, स्थानिक हरभरा दरात वाढ आणि शेतकऱ्यांच्या हिताचे रक्षण होईल, असे शेतकरी आणि व्यापाऱ्यांनी सांगितले.   

साखर उद्योकातील संघटनांनी आयात शुल्कवाढीची मागणी केली होती; तसेच विविध व्यापारी संघटनांनी केंद्र सरकारकडे पाकिस्तानकडून होणाऱ्या साखर आयातीवरील शुल्क ५० टक्क्यांहून ६० टक्के करण्याची मागणी केली होती. या सर्व पाश्‍वर्भूमीवर आयात शुल्क वाढविण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला.

केंद्र सरकारने घेतलेला निर्णय निश्‍चितच दिलासादायक आहे. यामुळे देशातील साखर बाजारातील घसरण रोखली जाऊ शकते. मुळात आमची मागणी साखर आयात पूर्णत: बंद करण्याची होती. केंद्राने या समस्येवर अंशत: तोडगा काढलेला आहे. देशातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा द्यायचा असल्यास केंद्र सरकारने तातडीने साखर निर्यात अनुदान घोषित करून किमान २० लाख टनांचा बफर स्टॉक करण्याची गरज आहे.
- श्रीराम शेटे, उपाध्यक्ष, राज्य सहकारी साखर संघ

इतर अॅग्रो विशेष
आज शिवजयंती : शिवनेरीवर पारंपारिक...पुणे : फाल्गुन वद्य तृतीया या तिथीनुसार आज (ता....
अतितीव्र हवामानस्थितीला कर्बाचे वाढते...पुणे : वातावरणातील कार्बनडाय ऑक्साईडचे (कर्ब)...
कमतरतेनुसार सूक्ष्म अन्नद्रव्यांचा वापर...अलीकडे सूक्ष्म अन्नद्रव्यांची कमतरता अधिक...
पिंप्री गावाने कमावले लसूणघास शेतीत नाव पिंप्री (वळण) (ता. राहुरी, जि. नगर) हे गाव मुळा...
दुष्काळातही सुरती हुरड्याची  चवच काही...औरंगाबाद जिल्ह्यातील सारंगपूर येथील अरुण कडूबाळ...
। तुका म्हणे कान्हा । भूक लागली नयनां ।।देहू : तुकाराम तुकाराम...असा नामघोष आणि...
नांदेड जिल्ह्यात कापूस उत्पादकता...नांदेड ः नांदेड जिल्ह्यात २०१८-१९ च्या खरीप...
नगरची लढत राहणार लक्षवेधीनगर : राज्याच्या सर्वाधिक लक्ष असलेल्या नगर (...
रब्बी पीकविम्याला बोगस प्रकरणांचे ग्रहणमुंबई ः २०१८-१९ च्या रब्बी हंगामात पंतप्रधान...
सहा कारखान्यांची धुराडी थंडावलीऔरंगाबाद  : मराठवाडा व खानदेशातील पाच...
बेदाण्याला दराची गोडीसांगली ः होळी सणाच्या पार्श्वभूमीवर बेदाण्याची...
आनंदाचा उतरता आलेखजगभरातील आनंदी देशांचा अहवाल (वर्ल्ड हॅपीनेस...
आदित्यात् जायते वृष्टि:जगात एकूण १९५ देश आहेत, पण आकार, आर्थिक स्थिती,...
आज संत तुकाराम बीजदेहू, जि. पुणे  : जगद्‌गुरू संत श्री तुकाराम...
उज्ज्वल भविष्याचा सर्वोत्तम मार्ग ‘जल...भारत जलसंकट समस्येचा सामना करत आहे. वाढती...
जल‘मुक्त’ शिवारवॉ टर ग्रीडच्या माध्यमातून मराठवाड्यातील सर्व...
राज्यात शंभर लाख टन साखर उत्पादनभवानीनगर, जि. पुणे ः राज्यात ३० टक्के हुमणीग्रस्त...
मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात अवकाळीची...पुणे : रविवारी, सोमवारी पुन्हा काही अंशी...
जैविक कीड-नियंत्रणासाठी उपयुक्त बुरशीगेल्या काही वर्षांमध्ये कीडनियंत्रणासाठी...
केशर आंबा फळगळीची कारणे अन् उपाययोजना  सद्यःस्थितीत हवामान आंबा झाडांसाठी...