agriculture news in marathi, Govt hikes wheat MSP by Rs 110; pulses Rs 200 per quintal, | Agrowon

गव्हाच्या हमीभावात ११०, हरभरा, मसूरमध्ये २००ने वाढ
पीटीआय
बुधवार, 25 ऑक्टोबर 2017

नवी दिल्ली ः केंद्र सरकारने रब्बी हंगामातील पिकांसाठी किमान आधारभूत किमती मंगळवारी (ता. २४) जाहीर केल्या. केंद्राने गव्हाच्या किमान आधारभूत किमतीत ११० रुपयांनी; तर कडधान्यात २०० रुपयांनी वाढ केली आहे. यंदाच्या हंगामात गव्हाला १७३५ रुपये हमीभाव मिळणार आहे, असे सूत्रांनी सांगितले. 

नवी दिल्ली ः केंद्र सरकारने रब्बी हंगामातील पिकांसाठी किमान आधारभूत किमती मंगळवारी (ता. २४) जाहीर केल्या. केंद्राने गव्हाच्या किमान आधारभूत किमतीत ११० रुपयांनी; तर कडधान्यात २०० रुपयांनी वाढ केली आहे. यंदाच्या हंगामात गव्हाला १७३५ रुपये हमीभाव मिळणार आहे, असे सूत्रांनी सांगितले. 

पंतप्रधान नरेद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील केंद्रीय मंत्रिमंडळाच्या अर्थविषयक समितीच्या बैठकीत २०१७-१८ च्या रब्बी हंगामासाठी किमान आधारभूत किमती जाहीर करण्यात आल्या. किमान आधारभूत किमतीवर सरकार शेतकऱ्यांचा शेतीमाल खरेदी करणार आहे. रब्बी हंगमात शेतकऱ्यांनी पिकांचे जास्त उत्पादन घ्यावे आणि त्यांना मालाला किफायतशीर दर मिळावा यासाठी किमान आधारभूत किमतीत वाढ करण्यात आली आहे, असे सूत्रांनी सांगितले. 

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘सीसीईए’ने गव्हाच्या किमान आधारभूत किमतीत ११० रुपयांनी वाढ केली आहे. आता गव्हाला १७३५ रुपये दर मिळणार आहे. मागील वर्षी गव्हाला १६२५ रुपये हमीभाव होता. तसेच देशात हरभरा आणि मसुराचे उत्पादन वाढावे यासाठी दोन्ही पिकांच्या किमान आधारभूत किमतीत २०० रुपयांनी वाढ करण्यात आली आहे. २०१७-१८ च्या हंगमात हरभऱ्याला ४२०० रुपये आणि मसुराला ४१५० रुपये हमीभाव मिळणार आहे. तसेच मोहरी, सूर्यफूल तेलबियांच्या किमान आधारभूत किमतीतही वाढ करण्यात आली आहे.

इतर अॅग्रो विशेष
काळी आई आणि तिच्या लेकरांवर प्रेम करा४ ऑगस्टच्या ‘अॅग्रोवन’मध्ये तीस वर्षे सतत फ्लॉवर...
युरियाचा वापर हवा नियंत्रितचपंधरा दिवसांच्या उघडिपीनंतर राज्यात पावसाने दमदार...
कृषी आयुक्तांकडून डाळिंबावरील रोगाचा...सांगली ः राज्यातील आंबे बहारातील डाळिंबावर तेलकट...
केरळात पावसाचा जोर कमी; मदतकार्यात वेगतिरुअनंतपुरम/कोची  : दोन दिवसांपासून पावसाचा...
यवतमाळ जिल्ह्यात सोळा कृषी केंद्रांचे...यवतमाळ : कीटकनाशक खरेदी केलेल्या एजन्सीचे डीलरचे...
पिकं हातची गेली, शिवारात फक्त हिरवा पालापावसाचा खंड २२ ते २४ दिवसांचा राहिला. हव्या...
स्वच्छ सर्वेक्षणात सोलापूर देशात दुसरेसोलापूर  : ‘स्वच्छ सर्वेक्षण ग्रामीण २०१८'...
खान्‍देशातील तीन प्रकल्प भरलेजळगाव : मागील आठवड्यात झालेल्या पावसाने खान्‍...
कापसातील कृत्रिम मंदीचा फुगा फुटलाजळगाव ः सरकीच्या वायदे बाजारातील सटोडियांनी...
गडचिरोली, नांदेडमध्ये दमदार पाऊस पुणे : विदर्भातील गडचिरोली, मराठवाड्यातील नांदेड...
‘ग्लायफोसेट’ धोकादायक की सुरक्षित? पुणे: अमेरिकेतील एका न्यायालयाने अलीकडेच दिलेल्या...
अळिंबी उत्पादन, मूल्यवर्धन,...पूर्व विदर्भातील भंडारा जिल्हा भात उत्पादनासाठी...
जिद्द द्राक्षबाग फुलवण्याची नाशिक जिल्ह्यात सटाणा तालुक्यातील द्राक्ष उत्पादक...
मराठवाडयात कपाशीवर मर रोगाचा प्रादुर्भावपरभणी : सलग तीन आठवडे  पावसाचा खंड आणि...
पर्यावरणपूरक अक्षय ऊर्जा फायदेशीर देशात उपलब्ध अपारंपरिक ऊर्जा स्त्रोतांपैकी...
अस्मानी कहरराज्यात जुलैचा शेवटचा आठवडा ते ऑगस्टचा पहिला...
देशातील ५२ टक्के शेतकरी कुटुंबे...२०१५-१६ या वर्षात देशातील शेतकरी कुटुंबांचे...
नेमका गरजेवेळी युरिया जातो कुठे?जळगाव  ः जिल्ह्यात मागील काही दिवसांत चांगला...
केरळमध्ये युद्धपातळीवर मदतकार्य तिरुअनंतपुरम : केरळमधील पूरस्थिती अजूनही गंभीर...
मोसंबीची फळगळ वाढलीऔरंगाबाद : मोसंबीच्या आंबे बहारावर फळगळीचे संकट...