agriculture news in Marathi, Govt may hike agri-credit target this year, Maharashtra | Agrowon

कृषीचा पतपुरवठा यंदा वाढण्याचे संकेत
वृत्तसेवा
बुधवार, 24 जानेवारी 2018

नवी दिल्ली ः देशातील शेतीसमोरील प्रश्न दिवसेंदिवस वाढतच आहेत. त्यामुळे केंद्र सरकार २०१८-१९ च्या अर्थसंकल्पात पतपुरवठा वाढविण्याचा विचार करत आहे. यंदाच्या अर्थसंकल्पात शेतीसाठी १ लाख कोटींची वाढ करून ११ लाख कोटी पतपुरवठा होण्याचे संकेत आहेत, असे सूत्रांनी सांगितले.

नवी दिल्ली ः देशातील शेतीसमोरील प्रश्न दिवसेंदिवस वाढतच आहेत. त्यामुळे केंद्र सरकार २०१८-१९ च्या अर्थसंकल्पात पतपुरवठा वाढविण्याचा विचार करत आहे. यंदाच्या अर्थसंकल्पात शेतीसाठी १ लाख कोटींची वाढ करून ११ लाख कोटी पतपुरवठा होण्याचे संकेत आहेत, असे सूत्रांनी सांगितले.

केंद्र सरकराने चालू वर्षी २०१७-१८ च्या अर्थसंकल्पात शेती क्षेत्रासाठी १० लाख कोटी पतपुरवठ्याची तरतूद केली होती. त्यापैकी पहिल्या सहा महिन्यांत सप्टेंबर २०१७ पर्यंत ६.२५ लाख कोटी रुपये शेती विकासाच्या कामासाठी वितरित केले आहे. त्यातून वर्षभरात शेती विकासाला बळ मिळाले आहे, अशी माहिती सरकारने नुकतेच जाहीर केलेल्या अहवालातून मिळाली आहे.

‘‘सरकारची पहिली प्राथमिकता शेती विकास ही आहे. केंद्र सरकारने शेतकऱ्यांच्या विकासाला महत्त्व देताना वेळोवेळी पर्याप्त निधीची तरतूद केली आहे. चालू वर्षातील सरकारचा शेतीवरील खर्च पाहता पुढील आर्थिक वर्षात केंद्र सरकार शेतीसाठी ११ लाख कोटी निधी वितरित करेल, असा विश्वास आहे. शेती उत्पादन वाढण्यासाठी पतपुरवठा करणे आवश्यक आहे. तसेच सरकार बॅंकांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना पतपुरवठा करून खासगी सावकारांकडे जाण्यापासून थांबवित आहे,’’ असे सूत्रांनी सांगितले.

साधारणपणे शेतीला ९ टक्के व्याजदराने पतपुरवठा केला जातो. पंतु सरकार ३ लाखांपर्यंत २ टक्के व्याज अनुदान देते, तसेच ३ टक्क्यांपर्यंत शेतकऱ्यांना कर्जफेड करण्यासाठी सूट देते. म्हणजेच शेतकऱ्याला केवळ ४ टक्के व्याज द्यावे लागते, असेही सूत्रांनी सांगितले. 

 

इतर अॅग्रो विशेष
जलदगती मार्गाने निर्जलपर्वाकडे...‘‘पाण्याची उपलब्धता कमी होत जाणे हे हवामान बदलाचे...
पुढचं पाऊलप्र बोधन आणि संघर्षाच्या माध्यमातून गेली चौदा...
नोकरशहांच्या दुर्लक्षामुळे जल...राज्यात दुष्काळग्रस्त गावे वाढत असून, जलाशयांची...
ठिबक सिंचनातील आधुनिक तंत्रज्ञान : अरुण...राज्यात लागवडीखालील २२५ लाख हेक्टर क्षेत्रांपैकी...
परंपरागत जल व्यवस्थांचा संपन्न वारसा :...परंपरागत जल व्यवस्थांमधून घेण्याजोग्या आणि आजही...
कोरडवाहूचे जल व्यवस्थापन : चिपळूणकर,...पाण्याचे व्यवस्थापन हे केवळ बागायती पिकांसाठी...
फड पद्धतीमुळे झाला कायापालट : दत्ता...फड या जल व्यवस्थापन पद्धतीचे तंत्र अगदी सोपे आहे...
समन्यायी जल व्यवस्थापनाला पर्याय नाही...लोकशाहीकरण वा पुनर्संजीवक विकास ही फुकाफुकी...
डोळ्यांत अंजन घालणारी नागलीची कहाणी :...योग्य पीकपद्धती विकसित केली नाही तर जल व्यवस्थापन...
जल व्यवस्थापनाची सप्तपदी : नागेश टेकाळेनिसर्गदेवतेने दिलेला जलरूपी प्रसाद आज आपण तिने...
जल व्यवस्थापन हाच कळीचा मुद्दा... :...पर्यावरणातील बदल, दुष्काळ, मातीचे बिघडणारे आरोग्य...
जल व्यवस्थापनासाठी हवी लोकचळवळलक्षावधी हेक्टर जमीन, हजारो टीएमसी पाणी आणि...
चैत्र यात्रेनिमित्त भाविकांनी दुमदुमला...ज्योतिबा डोंगर, जि. कोल्हापूर  : ‘...
विदर्भात वादळी पावसाची शक्यतापुणे : पूर्वमोसमी पावसाच्या सरींमुळे...
‘ॲग्रोवन'चा आज १४वा वर्धापन दिन; जल...पुणे : लाखो शेतकऱ्यांच्या कुटुंबातील घटक बनलेल्या...
यंदा बीटी कापूस बियाणे मुबलक : कृषी...पुणे : राज्याच्या कापूस उत्पादक भागातील...
फलोत्पादन अनुदान अर्जासाठी शेवटचे चार...पुणे : एकात्मिक फलोत्पादन अभियानातून (एमआयडीएच)...
वीज पडून जाणारे जीव वाचवामागील जूनपासून सुरू झालेला नैसर्गिक आपत्तींचा कहर...
जल व्यवस्थापनाच्या रम्य आठवणीजलव्यवस्थापनाचे धडे घेण्यासाठी कुठलेही पुस्तक...
कापूस उत्पादकतेत भारताची पीछेहाटजळगाव ः जगात कापूस लागवडीत पहिल्या क्रमांकावर...