गव्हावरील अायात शुल्क वाढविण्याचा केंद्राचा विचार
कोजेन्सिस वृत्तसेवा
शुक्रवार, 6 ऑक्टोबर 2017
नवी दिल्ली ः देशांतर्गत बाजारातील दराला प्रोत्साहन मिळावे तसेच शेतकऱ्यांच्या गव्हाला चांगला दर मिळावा या उद्देशाने गव्हावरील अायात शुल्क केंद्र सरकारकडून वाढविले जाण्याची शक्यता अाहे, अशी माहिती सूत्रांनी दिली अाहे.
 
नवी दिल्ली ः देशांतर्गत बाजारातील दराला प्रोत्साहन मिळावे तसेच शेतकऱ्यांच्या गव्हाला चांगला दर मिळावा या उद्देशाने गव्हावरील अायात शुल्क केंद्र सरकारकडून वाढविले जाण्याची शक्यता अाहे, अशी माहिती सूत्रांनी दिली अाहे.
 
देशात गेल्या हंगामात उत्पादन वाढल्याने गव्हाचे दर घसरले. त्यानंतर गेल्या मार्चमध्ये केंद्र सरकारने गव्हावर १० टक्के अायात शुल्क लागू केले. तरीही अांतरराष्ट्रीय बााजारात स्वस्त दरात गहू उपलब्ध होत असल्याने देशात अायात सुरूच अाहे. सध्या अाॅस्ट्रेलियात गव्हाचा दर प्रतिटन २७९ डॉलर अाणि युक्रेनमध्ये २२० डॉलर एवढा अाहे, अशी माहिती व्यापाऱ्यांनी दिली अाहे.
 
यंदा (२०१७-१८) भारतात १.२ दशलक्ष टन गहू अायातीसाठी करार झाले अाहेत. परदेशातून मोठ्या प्रमाणात गव्हाची अायात होत असल्याने गेल्या सहा महिन्यांत देशांतर्गत बाजारातील दरात घसरण झाली अाहे. या पार्श्वभूमीवर गव्हावरील अायात शुल्क वाढविण्याचा केंद्राचा विचार सुरू अाहे.
 
शंभर रुपयांनी एमएसपी वाढीचा प्रस्ताव
देशातील २०१८-१९ मधील हंगामासाठी गव्हाची किमान अाधारभूत किंमत (एमएसपी) प्रतिक्विंटलमागे १०० रुपयांनी वाढविण्याचा प्रस्ताव कृषी मूल्य अायोगाने केंद्र सरकारपुढे ठेवला अाहे, अशी माहिती सरकारी सूत्रांनी दिली अाहे. सध्या गव्हाची एमएसपी प्रतिक्विंटल १,६२५ रुपये एवढी अाहे. रब्बी हंगामासाठी गहू लागवडीला प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने एमएसपी वाढविली जाण्याची शक्यता अाहे.
 
देशात २०१६-१७ या वर्षात गव्हाचे उत्पादन ९८.४ दशलक्ष टन झाले अाहे. त्याअाधीच्या वर्षी ९२.३ दशलक्ष टन उत्पादन झाले होते. गेल्या वर्षी केंद्र सरकारने ३०.८ दशलक्ष टन गव्हाची खरेदी केली अाहे. दरम्यान, केंद्र सरकार रब्बी हंगामातील गव्हासह मोहरी, हरभरा, मसूर अाणि सूर्यफूल अादी पिकांची एमएसपी ६ टक्क्यांनी वाढविण्याचा कृषी मंत्रालयाचा प्रस्ताव अाहे, असे सूत्रांनी म्हटले अाहे.
टॅग्स

इतर ताज्या घडामोडी
परभणीत प्रतिक्विंटल टोमॅटो १२०० ते १८००...परभणी ः येथील कृषी उत्पन्न बाजार...
आयुर्वेदिक रेसिपींच्या आस्वादासाठी...पुणे ः आयुर्वेदात उल्लेख असलेल्या...
परभणी जिल्ह्यात कृषी विभागातील ३१ टक्के...परभणी ः परभणी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी...
वाटाणा लागवड कधी करावी?वाटाणा लागवडीसाठी मध्यम ते भारी, चांगल्या...
नागपूर ३६.४ अंशांवरपुणे : राज्यातील काही भागांत कमाल तापमानात वाढ...
कोल्हापुरात भाजीपाल्याचे दर वधारलेकोल्हापूर : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत या...
जळगावात उडदाची आवक घटलीजळगाव ः कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गत आठवड्यात...
नाशिकला टोमॅटोची आवक निम्म्याने घटलीनाशिक : नाशिक जिल्ह्यात ऑक्‍टोबरच्या पहिल्या...
उत्पादकता घटल्याने फूल मार्केटमध्ये...नागपूर : परतीच्या पावसाचा फटका बसल्याने या वर्षी...
मंचर बाजार समितीत कटतीद्वारे लूटपुणे : पालेभाज्यांसाठी आणि विशेषतः काेथिंबीरीसाठी...
नांदेड विभागात ३३ कारखान्यांच्या...परभणी : नांदेड विभागातील ५ जिल्ह्यांतील ३३ साखर...
समृद्धी महामार्गाच्या विरोधाची धार...घोटी, जि. नाशिक : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस...
तापमान पुन्हा वाढू लागलेपुणे : गेल्या काही दिवसांपासून राज्यातील बहुतांशी...
कोयना धरणातून पाण्याचा विसर्ग पाटण, जि. सातारा ः कोयना धरण पाणलोट क्षेत्रात...
सांगलीत ज्वारीच्या कणसांना दाणेच आले... सांगली : कृषी विभागाने शेतकऱ्यांना वाटप...
केळीवरील करपा निर्मूलनासाठी अनुदान... जळगाव : केळी पिकावर सातत्याने करप्याचा...
परतीच्या पावसाने रब्बी पेरणीचा खोळंबा परभणी : नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांमध्ये...
शिरूर तालुक्यातील पिकांचे पावसामुळे... रांजणगाव सांडस, जि. पुणे : शिरूर तालुक्यातील...
जळगाव जिल्ह्यात हरभऱ्याचे क्षेत्र... जळगाव :  जिल्ह्यात मागील चार ते पाच...
संयुक्त राष्ट्र विकास कार्यक्रमाचे सोधी...वाशीम : संयुक्त राष्ट्रसंघाच्या वतीने राबविण्यात...