Agriculture News in Marathi, Govt may take trade steps if subsidised Pakistan sugar enters India, said senior food ministry official | Agrowon

...तर पाकिस्तानमधून अायात साखरेवर बंदी
कोजेन्सिस वृत्तसेवा
शुक्रवार, 22 डिसेंबर 2017
नवी दिल्ली : पाकिस्तानमधून साखर अायात मुद्द्यावर केंद्र सरकारने सारवासारव करण्यास सुरवात केली अाहे. जर पाकिस्तानमधून अनुदानित साखर भारतात अायात झाल्यास केंद्र सरकार त्याविरोधात अावश्यक पावले उचलेल. तसेच केंद्र सरकार पाकिस्तानमधून होणाऱ्या अायात साखरेवर बंदी घालण्यास संकोच करणार नाही, असे अन्न मंत्रालयातील सूत्रांनी स्पष्ट केले अाहे.
 
नवी दिल्ली : पाकिस्तानमधून साखर अायात मुद्द्यावर केंद्र सरकारने सारवासारव करण्यास सुरवात केली अाहे. जर पाकिस्तानमधून अनुदानित साखर भारतात अायात झाल्यास केंद्र सरकार त्याविरोधात अावश्यक पावले उचलेल. तसेच केंद्र सरकार पाकिस्तानमधून होणाऱ्या अायात साखरेवर बंदी घालण्यास संकोच करणार नाही, असे अन्न मंत्रालयातील सूत्रांनी स्पष्ट केले अाहे.
 
पाकिस्तानकडून साखर निर्यातीसाठी अनुदान दिले जात अाहे. पाकिस्तानमधील साखर भारतात अाल्यास देशांतर्गत साखर दर खाली येतील, अशी भीती व्यक्त करण्यात अाली अाहे. या पार्श्वभूमीवर अन्न मंत्रालयाने पाकिस्तानमधून साखर होत असल्याचे निर्दशनास अाल्यास तत्काळ कारवाई केली जाईल, असे स्पष्ट केले अाहे. साखरेवर अायात शुल्क वाढविण्याबरोबरच केंद्र सरकार साखर अायातीवर बंदी घालू शकते, असेही सूत्रांनी म्हटले अाहे.
 
पाकिस्तानने १५ लाख टन अनुदानित साखर निर्यातीसाठी परवानगी दिली अाहे. यामुळे पाकिस्तानमधून वाघा सीमेमार्गे भारतात साखर अायात होण्याची शक्यता वर्तविली जात अाहे. या पार्श्वभूमीवर अखिल भारतीय साखर व्यापार संघटनेने साखरेवरील अायात शुल्क ५० टक्क्यांवरून ६० टक्क्यांपर्यंत वाढविण्याची मागणी केंद्र सरकारने केली अाहे. 
 
दरम्यान, पाकिस्तानमध्ये यंदाच्या हंगामात ८० लाख टन साखर उत्पादन होण्याचा अंदाज अाहे. पाकिस्तानमध्ये ५० लाख टन साखरेचा वापर राहिल्यास ३० लाख टन साखरेचा अतिरिक्त साठा शिल्लक राहणार अाहे. त्यासाठी यातील १५ लाख टन साखर निर्यातीसाठी पाकिस्तान सरकारने परवानगी दिली अाहे.

इतर ताज्या घडामोडी
अकोल्याला रब्बीसाठी हरभऱ्याचे वाढीव...अकोला  ः जिल्ह्यात रब्बी हंगामासाठी...
दुष्काळाची व्यथा मांडताना महिला...निल्लोड, जि. औरंगाबाद : विहिरींनी तळ गाठला, मक्‍...
कोल्हापूर जिल्ह्यात खरीप पिकांच्या...कोल्हापूर  : खरीप पिकांची काढणी वेगात...
सोलापुरातील अडचणीतील शेतकऱ्यांसाठी आश्‍...सोलापूर  ः सोलापूर जिल्ह्यात दुष्काळाची...
नगरमधील ४३३८ शेतकऱ्यांची शेतीमाल...नगर  ः आधारभूत किमतीने मूग, उडीद, सोयाबीनची...
जळगाव जिल्ह्यात ज्वारीच्या पेरणीला...जळगाव : जिल्ह्यात रब्बीतील ज्वारी पेरणीकडे...
ढगाळ वातावरणामध्ये द्राक्ष पिकात...सांगली, मिरज व सोलापूर येथील काही भागांमध्ये हलके...
हुमणी अळीचे एकात्मिक व्यवस्थापनगेल्या काही वर्षांपासून राज्याच्या विविध...
पुणे जिल्ह्यात रब्बीसाठी १९ हजार...पुणे : पुणे जिल्ह्यात रब्बी हंगामाची तयारी सुरू...
सोलापूर जिल्हा बॅंकेकडून ७० हजार...सोलापूर  : सोलापूर जिल्हा बॅंकेच्या सव्वा...
सोयाबीन खरेदी केंद्रे सुरू होईनातसातारा : जिल्ह्यात खरिप पिकांची काढणी अंतिम...
भाजीपाला सल्लासध्याच्या काळात बाजारपेठेची मागणी लक्षात घेऊन...
कृषी सल्ला : ऊस, कापूस, तूर, गहू, हरभरा...ज्या ठिकाणी पाण्याचा ताण बसत आहे, त्या ठिकाणी...
हाताचा नाकाशी होणाऱ्या संपर्कातूनही...न्यूमोनियाकारक जिवाणू हा नाकाला हात लावणे,...
खानदेशात खरिपातील ज्वारीची आवक सुरुजळगाव : खानदेशात अनेक भागांत ज्वारीची मळणी जवळपास...
परभणी जिल्ह्यात मुगाची उत्पादकता एकरी १...परभणी : यंदा परभणी जिल्ह्यात मुगाची सरासरी...
पुणे जिल्ह्यात चाराटंचाईपुणे   ः पुणे जिल्ह्यातील पूर्व पट्ट्यात...
नगर - मराठवाड्यात पाण्यावरून संघर्षाची...नगर ः पुरेसा पाऊस झाला नसल्याने यंदा...
‘महसूल’च्या जागेवर चाऱ्याच्या...यवतमाळ  ः पांढरकवडा व राळेगाव तालुक्‍यांतील...
सातारा जिल्ह्यात ७७३ एकरांवर तुती लागवडसातारा  ः जिल्ह्यात रेशीम शेती करण्याकडे...