Agriculture News in Marathi, govt misleading about swaminathan recommendations, said vijay jawandhiya, Maharashtra | Agrowon

स्वामिनाथन आयोगाबद्दल दिशाभूल करू नये : जावंधिया
टीम अॅग्रोवन
शुक्रवार, 17 नोव्हेंबर 2017

नागपूर : ‘डॉ. स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशीप्रमाणे भाव जाहीर केले तर ते महाराष्ट्रावर अन्याय करणारे ठरेल, कारण आपला उत्पादन खर्च जास्त आहे’ असे विधान करून अापण शेतकऱ्यांची व जनतेची दिशाभूल करीत आहात, अशा आशयाचे पत्र शेतीप्रश्‍नांचे अभ्यासक विजय जावंधिया यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पाठविले आहे.

नागपूर : ‘डॉ. स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशीप्रमाणे भाव जाहीर केले तर ते महाराष्ट्रावर अन्याय करणारे ठरेल, कारण आपला उत्पादन खर्च जास्त आहे’ असे विधान करून अापण शेतकऱ्यांची व जनतेची दिशाभूल करीत आहात, अशा आशयाचे पत्र शेतीप्रश्‍नांचे अभ्यासक विजय जावंधिया यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पाठविले आहे.

श्री. जावंधिया आपल्या पत्रात म्हणतात, ‘शेतीमालाच्या भावासंदर्भात विरोधी पक्षात असताना काय बोलायचे हे मी सांगण्याची गरज नाही. पण २०१४ च्या लोकसभा निवडणूक प्रचार सभेतून शेतकऱ्यांना खर्चावर ५० टक्के नफा जोडून भाव देऊ, असे स्पष्ट आश्‍वासन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिले होते. मात्र, आपण म्हणता, स्वामिनाथन यांच्या शिफारशीप्रमाणे भाव जाहीर केले, तर ते महाराष्ट्रावर अन्याय करणारे ठरेल, कारण आपला उत्पादन खर्च जास्त आहे. अापण असे विधान करून शेतकऱ्यांची व जनतेची दिशाभूल करीत आहात, ती आपण करू नये.’

स्वामिनाथन आयोगाने शिफारस केली अाहे, त्यात,‘केंद्रीय कृषी कृषिमूल्य आयोग ज्या पद्धतीने उत्पादन खर्च काढतो, त्यावर १५ टक्के नफा जोडून हमीभाव जाहीर करतो. यात बदल करून तो उत्पादन खर्च अधिक ५० टक्के नफा जोडून जाहीर करावा,’ असे म्हटले आहे. याचाच अर्थ असा, की मोदी सरकारने जे भाव आज जाहीर केले आहेत, त्यापेक्षा जास्त भाव जाहीर करावे लागतील. असे झाले, तर हमीभावाच्या खरेदीत शेतकऱ्यांना जास्त भाव मिळतील, मग यात शेतकऱ्यांचे नुकसान कसे, असा प्रश्‍न जावंधिया विचारतात.

मध्य प्रदेशचा भावांतर योजनेचा सिद्धांत देश पातळीवर राबवावा लागेल व हमी भाव, बाजारभावातील फरक शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करावा लागेल, अशी मागणीही त्यांनी केली.

इतर ताज्या घडामोडी
आर. आर. पाटील यांचे स्मारक युवकांना...सांगली   ः आर. आर. पाटील यांनी ग्रामविकास,...
जळगाव जिल्हा परिषद पाणी योजनांचे वीज...जळगाव : पाणी योजनांचे बिल भरण्यात आले नसल्याने...
जमीन सुपीकतेसाठी सेंद्रिय कर्बाचे...जमिनीच्या सुपीकतेमध्ये सेंद्रिय कर्ब हे अत्यंत...
खानदेशात कांदा लागवड निम्म्याने...जळगाव : खानदेशात यंदा उन्हाळ कांद्याची लागवड...
सटाणा, मालेगावसाठी सोडणार चणकापूर...नाशिक : सटाणा व मालेगावला भेडसावणाऱ्या...
पुणे विभागात ४८ हजार हेक्टरवर कांदा...पुणे   ः पुणे विभागात आत्तापर्यंत ४८ हजार...
वीजदरवाढीचा शॉक, अनुदानाची फक्त घोषणाचजळगाव ः वस्त्रोद्योगाला चालना मिळावी, उद्योजकांचा...
महिलांनी नाचणीपासून बनवले सत्तरहून अधिक...कोल्हापूर   : नाचणीची आंबील, नाचणीच्या...
बुलडाणा जिल्ह्यात रब्बीची ५६ हजार...बुलडाणा  ः कमी व अनियमित पावसामुळे संपूर्ण...
कोल्हापुरात ऊसतोडणीसाठी यंदा पुरेसे मजूरकोल्हापूर  : गेल्या हंगामाच्या तुलनेत...
यवतमाळ जिल्हा दुष्काळग्रस्त जाहीर करा ः...वणी, जि. यवतमाळ   ः केंद्र व राज्यातील सरकार...
ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या वेतनासाठी...नाशिक (प्रतिनिधी) : कुटुंबाच्या आर्थिक अडचणीच्या...
पीकनिहाय सिंचनाचे काटेकोर नियोजनपिकांच्या अधिक उत्पादकतेसाठी जमिनीची निवड, मुबलक...
नारळासाठी खत, पाणी व्यवस्थापननारळ हे बागायती पीक असल्यामुळे पुरेसे पाणी...
खानदेशात केळीच्या दरात सुधारणाजळगाव : केळीची आवक सध्या कमी असून, थंडी वधारताच...
नाशिक जिल्ह्यातील दुष्काळी तालुक्यात...नाशिक : नाशिक जिल्ह्यातील पंधरापैकी आठ तालुके...
‘निम्न दुधना’तून पाणी देण्याचे...परभणी : निम्म दुधना प्रकल्पातून पिण्यासाठी पाणी...
सर्वसाधारण सभेचा सत्ताधाऱ्यांना धसकाजळगाव : जिल्हा परिषदेची सर्वसाधारण सभा येत्या २८...
शेतकऱ्यांनी चारा पिकांवर भर द्यावा ः...पुणे  : नव्या वर्षाच्या सुरवातीलाच कृषी...
‘वनामकृवि’ तयार करणार दुष्काळी...परभणी  ः मराठवाड्यात उद्भलेल्या दुष्काळी...