agriculture news in marathi, govt not interested in banana export, Maharashtra | Agrowon

केळी निर्यातीसाठी शासन उदासीन
टीम अॅग्रोवन
मंगळवार, 2 ऑक्टोबर 2018

सावदा येथील केळी पॅक हाउस पणन मंडळाने नंतर खासगी संस्थेला भाडे तत्त्वावर दिले. खासगी संस्थेने चांगले काम या पॅक हाउसद्वारे केले. यामुळे केळीची पॅकिंग, तंत्रशुद्ध साठवणूक याचे मार्गदर्शन शेतकऱ्यांना मिळाले; परंतु इतर भागात असे पॅक हाउस शासनाच्या मदतीने साकारलेच नाहीत. आता शेतकरी उत्पादक कंपन्यांच्या मदतीने शासनाने हे काम करावे. 
- विकास महाजन, केळी उत्पादक, ऐनपूर, ता. रावेर, जि. जळगाव

जळगाव ः ॲग्रो एक्‍सपोर्ट झोनमध्ये समाविष्ट असलेल्या जळगाव जिल्ह्यात केळी निर्यातीसंबंधी शासकीय स्तरावरून फारसे प्रयत्न झालेले नाहीत. फक्त घोषणा झाल्या. केळी निर्यातीसाठी जे प्रकल्प हाती घेतले, ते खासगी व्यक्तींना देण्याची वेळही शासकीय यंत्रणेवर आली. खासगी संस्था, खरेदीदार यांच्या पुढाकाराने मागील वर्षी रावेर व चोपडा भागातून फक्त ८०० मेट्रिक टन केळीची निर्यात झाल्याची माहिती आहे. 

आठ वर्षांपूर्वी सावदा (ता. रावेर) येथे सुमारे दोन एकर जागेत पणन मंडळाने केळी निर्यातीसंबंधी सावदा उपबाजारअंतर्गत आधुनिक पॅक हाउस उभारले. जवळपास ४० टन क्षमतेचे कूलिंग चेंबर, केळीची स्वच्छता, बॉक्‍स पॅकिंगसाठी युनिट किंवा पॅक हाउस उभारले. जवळपास पाच कोटी खर्च तेथे झाला; पण नंतर खासगी संस्थांना हे पॅक हाउस देण्यात आले.

आजघडीलाही खासगी संस्थांना ही यंत्रणा केळीची पॅकिंग, कूलिंग यासाठी दिले आहे. सुरवातीला या पॅक हाउसमध्ये पाण्याची सुविधा अपुरी होती. नंतर पाणी बाहेरून आणून केळीची स्वच्छता केली जायची. 

केळी लागवडीत राज्यात जळगाव क्रमांक एक आहे. मागील पाच वर्षे सरासरी ४८ हजार हेक्‍टरवर लागवड झाली आहे. जेवढी लागवड होते, त्यापैकी १० टक्के केळीचीही निर्यात अजून होत नसल्याची स्थिती आहे. केळी लागवडीत रावेर आघाडीवर आहे; परंतु यापाठोपाठ यावल, चोपडा, मुक्ताईनगर, भडगाव-पाचोरा, जळगाव, जामनेरातही बऱ्यापैकी केळी असते. या भागात पॅक हाउस शासकीय यंत्रणांच्या मदतीने साकारले नाहीत. 

शेतकऱ्यांच्या पुढाकाराने कार्यवाही
शासनाने केळी निर्यातीसंबंधी पॅक हाउस उभारले. यानंतर शासनस्तरावरून पुढे प्रयत्न झाले नाहीत; परंतु हे पॅक हाउस, त्यातील यंत्रणा यासंबंधी अभ्यास करून काही व्यापाऱ्यांनी सावदा येथे पॅक हाउस उभारले. यात आता बॉक्‍समध्ये केळीची पॅकिंग केली जाते. सावदा व फैजपुरात (ता. यावल) मिळून १८ पॅक हाउस आहेत, तर मागील वर्षी तांदलवाडी (ता. रावेर) येथे प्रेमानंद व प्रशांत महाजन यांच्या पुढाकाराने आधुनिक पॅक हाउस उभे राहिले आहे. त्यात केळी साठवणुकीसाठी ८० टन क्षमतेचे कूलिंग चेंबर आहेत. 

शहादा येथील केंद्राबाबत घोषणाच
शहादा (जि. नंदुरबार) येथे सावदा (ता. रावेर) येथील पॅक हाउसच्या धर्तीवर आधुनिक पॅक पाउस (केळी निर्यात केंद्र) उभारण्याची घोषणा तत्कालीन फलोत्पादनमंत्री विजयकुमार गावीत यांनी केली होती; परंतु या पॅक हाउससंबंधी प्रत्यक्षात कामच झाले नाही. शेतकऱ्यांच्या धडपड्या, उपक्रमशील वृत्तीमुळे ब्राह्मणपुरी येथे केळी पिकवणी व कूलिंग चेंबर साकारले आहे. तसेच काही खरेदीदारांच्या मदतीने केळीची निर्यातही या भागातून होत आहे. 

 

इतर अॅग्रो विशेष
मका भुशाला तीन हजारांचा भावजायखेडा, जि. नाशिक : यंदा तालुक्‍यात अत्यल्प...
ऐन दुष्काळात राज्याला सहकार आयुक्त नाही पुणे  : तीव्र दुष्काळाकडे राज्याची सुरू...
कात्रज मिठाईसाठी वापरणार नायट्रोजन...पुणे  : पुणे जिल्हा दूध उत्पादक संघ अर्थात...
कुलगुरू निवड प्रक्रियेतील विलंब ...मुंबई : राज्यातील कृषी विद्यापीठांच्या...
जपला एकीचा वसा, उमटवला प्रगतीचा ठसा,...रावळगुंडवडी (ता. जत, जि. सांगली) येथील...
`डॉ. स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशी ...शिर्डी, जि. नगर ः डॉ. स्वामीनाथन आयोगाच्या...
खरिपात झाला केवळ ५२ टक्के कर्जपुरवठापुणे : पीक पतपुरवठा आराखड्याच्या शेतकऱ्यांना कर्ज...
हुडहुडी वाढलीपुणे : उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्यांच्या...
दूध पावडर निर्यात योजनेचाही फज्जापुणे : राज्य सरकारवर विश्‍वास ठेवून कमी भावात दूध...
महाराष्ट्रात सर्वाधिक पीक विम्याची नोंदनवी दिल्ली : पंतप्रधान पीकविमा योजनेअंतर्गत दोन...
पंधरा हजार धरण, तलावांतील गाळ काढणार :...मुंबई : राज्यातील छोटी धरणे, तलाव यांमधील...
‘माफसू’ उभारणार पशुविज्ञान संग्रहालयनागपूर ः मुलांना प्राणीशास्त्र कळावे त्यासोबतच...
राज्यात शनिवारपासून महारेशीम अभियाननागपूर   ः रेशीमशेतीला प्रोत्साहन मिळावे, या...
बदलत्या वातावरणामुळे केळी निसवणीवर...जळगाव ः थंड, विषम वातावरणामुळे खानदेशात केळीच्या...
सारंगखेड्याचा ‘चेतक महोत्सव’ आजपासून मुंबई : नंदूरबार जिल्ह्यातील सारंगखेडा येथे...
दूध पिशव्यांसंदर्भात दोन महिन्यांची...मुंबई: दुधाच्या पॉलिथीन पिशव्यांच्याबाबतीत राज्य...
सिंचन प्रकल्पांना नाबार्डकडून सात हजार...मुंबई : प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेंतर्गत...
‘सेमीफायनल’मध्ये भाजपला झटकानवी दिल्ली ः लोकसभेची दिशा ठरविणाऱ्या आणि अतिशय...
नगरला हंगामातील नीचांकी ९.२ अंश...पुणे : उत्तरेकडील वाऱ्यांचे प्रवाह सुरळीत...
मराठवाड्यातील सोयगाव तालुक्यात रुजतोय...औरंगाबाद जिल्ह्यातील सोयगाव तालुक्यातील शेतकरी...