Agriculture News in Marathi, Govt pegs sugar output at around 24.9 mln ton, India | Agrowon

साखर उत्पादन यंदा तेवीस टक्क्यांनी वाढणार
कोजेन्सिस वृत्तसेवा
गुरुवार, 21 डिसेंबर 2017

नवी दिल्ली ः देशात यंदा (२०१७-१८) सुमारे २४९ लाख टन साखर उत्पादनाचा अंदाज केंद्रीय अन्न मंत्रालयाने बांधला अाहे. यंदाचे साखर उत्पादन हे गेल्या वर्षीच्या तुलनेत २३.३ टक्क्यांनी अधिक असणार अाहे. गेल्या वर्षी २०२ लाख टन साखर उत्पादन झाले होते. यंदा उत्पादनवाढीचे संकेत देण्यात अाले अाहेत.

देशात यंदा २५० लाख टन साखरेचा वापर राहणार अाहे. गेल्या वर्षीचा शिल्लक साठा अाणि यंदाचे उत्पादन मिळून देशातंर्गत साखरेचा पुरेसा पुरवठा राहणार अाहे, असेही अन्न मंत्रालयाने नमूद केले अाहे.

नवी दिल्ली ः देशात यंदा (२०१७-१८) सुमारे २४९ लाख टन साखर उत्पादनाचा अंदाज केंद्रीय अन्न मंत्रालयाने बांधला अाहे. यंदाचे साखर उत्पादन हे गेल्या वर्षीच्या तुलनेत २३.३ टक्क्यांनी अधिक असणार अाहे. गेल्या वर्षी २०२ लाख टन साखर उत्पादन झाले होते. यंदा उत्पादनवाढीचे संकेत देण्यात अाले अाहेत.

देशात यंदा २५० लाख टन साखरेचा वापर राहणार अाहे. गेल्या वर्षीचा शिल्लक साठा अाणि यंदाचे उत्पादन मिळून देशातंर्गत साखरेचा पुरेसा पुरवठा राहणार अाहे, असेही अन्न मंत्रालयाने नमूद केले अाहे.

देशात सध्या गाळप हंगाम वेगाने सुरू अाहे. यंदाची उसाची उपलब्धतता अधिक असल्याने साखर उत्पादन २५१ लाख टनांवर पोचेल, असा अंदाज भारतीय कारखानदार संघटनेने (इस्मा) व्यक्त केला अाहे. महाराष्ट्र अाणि कर्नाटकातील साखर उत्पादनात यंदा सुधारणा होणे अपेक्षित अाहे. तसेच उत्तर प्रदेशात अधिक साखर उत्पादन मिळणार असल्याचा अंदाज अाहे.

उत्तर प्रदेश, महाराष्ट्र अाणि कर्नाटक ही तीन राज्ये साखर उत्पादनात अाघाडीवर अाहेत. या तीन राज्यांतून १९८ लाख टन साखर उत्पादन अपेक्षित अाहे, असे ‘इस्मा’ने नमूद केले अाहे.

२१ लाख टन साखर निर्यात
वाणिज्य मंत्रालयाकडील अाकडेवारीनुसार, देशातून २०१६-१७ (एप्रिल ते जानेवारी) २१.७३ लाख टन साखर निर्यात करण्यात अाली होती. याच कालावधीत १८.९९ लाख टन साखर अायात करण्यात अाली अाहे.

भारतातील साखरेचा व्यापार (लाख टनांमध्ये)

वर्ष निर्यात अायात
२०१०-११ १७.११ ११.९८
२०११-१२ २७.३८ ०.९९
२०१२-१३ २७.९१ ११.२१
२०१३-१४ २४.६० ८.८१
२०१४-१५ १९.५४ १५.३८
२०१५-१६ ३८.२६ १९.४
२०१६-१७ (एप्रिल-जानेवारी) २१.७३ १८.९९

स्राेत ः वाणिज्य मंत्रालय

इतर ताज्या घडामोडी
अब आया उंट पहाड के निछे; राजू शेट्टींचा...सोलापूर : शेतकऱ्यांच्या दूध दराच्या प्रश्‍...
सरकार रिलायन्स, पतंजलीच्या दुधाची वाट...नागपूर : एकीकडे समाधानकारक पाऊस पडत असताना...
शेतकऱ्यांच्या प्रश्नावर काँग्रेस-...नागपूर : कधी देणार कधी देणार...कापूस, धानाला...
पीक सल्ला१६ जुलै ते ३१ जुलैपर्यंत पेरणी लांबल्यास संकरीत...
खानदेशात दूध आंदोलनास अल्प प्रतिसादजळगाव ः खानदेशात कुठेही दूध आंदोलनाला उग्र स्वरुप...
संत गजानन महाराज पालखीचे सोलापुरात...सोलापूर : पावसाच्या संततधार सरी झेलत ‘गण गण गणात...
रस्त्यावर दूध ओतून शासनाचा निषेधसांगली ः दूध दरवाढीच्या स्वाभिमानी शेतकरी...
दूध दरप्रश्नी तारसा फाटा येथे आंदोलननागपूर  ः दूध उत्पादकांना प्रतिलिटर पाच...
पुणे जिल्ह्यात दूध दरप्रश्नी आंदोलनपुणे  ः  दूध दरप्रश्‍नी स्वाभिमानी...
दूध दरप्रश्‍नी वऱ्हाडात आंदोलनअकोला   ः दूध उत्पादकांना प्रतिलिटर पाच...
मराठवाड्यात विविध ठिकाणी दूध संकलन बंदऔरंगाबाद : दूध दरावरून पुकारल्या आंदोलनाच्या...
नगर जिल्ह्यात दूध संकलन बंदनगर  : दूध दरप्रश्नी स्वाभिमानी शेतकरी...
केनियात आढळल्या पिवळ्या वटवाघळांच्या...केनियामध्ये पिवळ्या रंगाच्या वटवाघळांच्या जनुकीय...
सातारा जिल्ह्यात दूध दर आंदोलनास मोठा...सातारा   ः स्वाभिमानी शेतकरी संघटनेने दुधाला...
झाडांच्या संवर्धनामध्ये हवामान बदलासोबत...तापमानवाढीमुळे अधिक उंचीकडे किंवा उत्तरेकडे...
नागपूर, गडचिरोलीत संततधारनागपूर  : हवामान विभागाने विदर्भात सोमवारी (...
मराठवाड्यातील २४५ मंडळांत पावसाची रिपरिपऔरंगाबाद : मराठवाड्यातील ४२१ मंडळांपैकी जवळपास...
पुणे जिल्ह्यात दमदार पाऊसपुणे   : जिल्ह्यात पावसाने दमदार हजेरी लावली...
अकोले तालुक्यात पावसाचा जोर कायमनगर   ः अकोले तालुक्याच्या पश्चिम भागात...
नांदेड, परभणी, हिंगोलीतील २६...नांदेडः नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांतील २६...