Agriculture News in Marathi, govt released soyabean grant, Maharashtra | Agrowon

सोयाबीन अनुदानासाठी १०८ कोटी रक्कम वितरीत
टीम अॅग्रोवन
शुक्रवार, 10 नोव्हेंबर 2017
परभणी : राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये १ आॅक्टोबर ते ३१ डिसेंबर २०१६ या कालावधीत विक्री केलेल्या सोयाबीनचे प्रतिक्विंटल २०० रुपये अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यासाठी १०८ कोटी ६४ लाख २९ हजार ७६० रुपये रक्कम राज्यातील २५ जिल्हा निबंधक (सहकारी संस्था) यांच्या खात्यावर करण्यात वितरित आली आहे.
 
बाजार समितीनिहाय लाभार्थी शेतकऱ्यांच्या खात्यावर आठ दिवसांच्या आत अनुदानाची रक्कम जमा करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. २०१६-१७ मध्ये सोयाबीन उत्पादनात मोठ्या प्रमाणात वाढ झाली होती. त्यामुळे बाजारातील आवक वाढून दरात घसरण झाली होती.
परभणी : राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये १ आॅक्टोबर ते ३१ डिसेंबर २०१६ या कालावधीत विक्री केलेल्या सोयाबीनचे प्रतिक्विंटल २०० रुपये अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यासाठी १०८ कोटी ६४ लाख २९ हजार ७६० रुपये रक्कम राज्यातील २५ जिल्हा निबंधक (सहकारी संस्था) यांच्या खात्यावर करण्यात वितरित आली आहे.
 
बाजार समितीनिहाय लाभार्थी शेतकऱ्यांच्या खात्यावर आठ दिवसांच्या आत अनुदानाची रक्कम जमा करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. २०१६-१७ मध्ये सोयाबीन उत्पादनात मोठ्या प्रमाणात वाढ झाली होती. त्यामुळे बाजारातील आवक वाढून दरात घसरण झाली होती.
 
त्यामुळे १ आॅक्टोबर ते ३१ डिसेंबर २०१६ या कालावधीत राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समित्याअंतर्गत अडत व्यापाऱ्यांकडे सोयाबीनची विक्री केलेल्या शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्याच्या दृष्टीने राज्य शासनाने प्रतिक्विंटल २०० रुपये या प्रमाणे २५ क्विंटल मर्यादेपर्यंत अनुदान देण्याचे जाहीर केले होते. त्यासाठी शासनाने १०८ कोटी ६४ लाख २९ हजार ७६० रुपये एवढी रक्कम आकस्मिकता निधीतून खर्च करण्यासाठी राज्यातील २५ जिल्हा निबंधक (सहकारी संस्था) यांच्या खात्यावर वितरित केली आहे.
 
आठ दिवसांच्या आत बाजार समितीनिहाय शेतकरी लाभार्थ्यांच्या खात्यावर अनुदानाची रक्कम जमा करण्याचे आदेश देण्यात आले आहेत, असे जिल्हा उपनिबंधक कार्यालयातील सूत्रांनी सांगितले.
 
जिल्हानिहाय वितरित करण्यात आलेली सोयाबीन अनुदानाची रक्कम पुढीलप्रमाणे अशी : औरंगाबाद (३,९२,८७३ रुपये), जालना (६,९२,३०,४७२ रुपये), परभणी (५,२६,७५,३४० रुपये), हिंगोली (५,६७,१२,३५२ रुपये), नांदेड (३,८५,२९,२०६), लातूर (१९,३९,२९,३०४ रुपये), उस्मानाबाद (७७,९९,८१२ रुपये), बीड (३,४५,३७,५३४ रुपये), पुणे ग्रामीण (९,०९९४६ रुपये), सोलापूर (२,६९,७१४ रुपये), सांगली ५१,१०४ रुपये), नाशिक (३८,६७,२९८ रुपये), नगर (५६,७९,९६७ रुपये), जळगांव (३८,९८,५४२ रुपये), नंदुरबार (१९,८९,०१० रुपये), धुळे (६,७३,०८२ रुपये), अमरावती (१२,१६,५७,५२० रुपये), अकोला (७,५६,४९,२७४ रुपये), वाशीम (१४,७९,१३,५९४ रुपये), यवतमाळ (४,२४,३७,०२२ रुपये), नागपूर (१,२७,९४,९८४ रुपये), वर्धा (५,६१,०२,६९० रुपये), चंद्रपूर (६८,०९,७३६ रुपये), भंडारा (१५,८७४ रुपये). 
 
परभणी जिल्ह्यातील बाजार समितीनिहाय लाभार्थी शेतकरी संख्या अाणि अनुदान रक्कम : परभणी २,४८४ (९०,१२,००० रुपये), जिंतूर २,८८४० (९९,९६,६९२ रुपये), बोरी१,५६२ (५१,८२,८०० रुपये), सेलू २,६१९(७८,८६,१७० रुपये), मानवत १,७४७ (४८,२६,६९० रुपये), पाथरी १,०४३ (३५,६१,००० रुपये), सोनपेठ ३२९ (१२,१९,२२२ रुपये), गंगाखेड ५०४ (१,६०,००,६६४ रुपये), पालम १३५(५,३१,७८६ रुपये), पूर्णा १,३८२(५०,९३,३४८ रुपये), ताडकळस ९२३(३७,६४,७३० रुपये).

इतर ताज्या घडामोडी
नियोजन खरिपाचे : ठिबक, खत व्यवस्थापन...शेतकरी ः विजय इंगळे चित्तलवाडी, ता. तेल्हारा, जि...
नियोजन खरिपाचे : लागवडीसह सिंचन, काढणी...शेतकरी - दीपक माणिक पाटील माचले, ता. चोपडा, जि....
जळगावात दीड हजारांवर शेततळ्यांची कामे...जळगाव ः जिल्ह्यात "मागेल त्याला शेततळे''...
संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ साधणार...अमरावती ः दुष्काळ, पाणीटंचाईच्या पार्श्‍वभूमीवर...
नांदगाव तालुक्यात फळबागा वाचविण्यासाठी...नाशिक : नांदगाव तालुक्यातील फळबागा वाचविण्यासाठी...
अरुणाग्रस्तांचा गाव न सोडण्याचा निर्धारसिंधुदुर्ग : अरुणा प्रकल्पात पाणीसाठा केला, तरी...
नांदेड : साडेतेरा हजार हेक्टरवर उन्हाळी...नांदेड : जिल्ह्यात २०१९ च्या उन्हाळी हंगामात १३...
परभणीत फ्लॉवर ३५०० ते ५००० रुपये...परभणी : पाथरी रस्त्यावरील फळे भाजीपाला...
पुणे जिल्ह्यातील चौदा कारखान्यांकडे...पुणे   ः जिल्ह्यात गळीत हंगाम संपवून...
जळगावात कांदा विक्रीत शेतकऱ्यांची लूटजळगाव ः कांद्याचे दर दबावात असतानाच त्याची विपणन...
जळगावात किसान सन्मान निधीचे वितरण...जळगाव ः खानदेशात सुमारे सव्वादोन लाख शेतकऱ्यांना...
पुणे जिल्ह्यात फळबाग लागवडीसाठी एक...पुणे  ः यंदा खरीप हंगामात फळबाग लागवड करू...
नगर, शिर्डीत ‘काँटे की टक्कर’ मतात...नगर ः भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेच्या कामावर...
अकरापैकी सहा आमदारांचा लोकसभेत प्रवेशमुंबई ः सतराव्या लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात...
पुण्यातील पाणी, वाहतुकीचे प्रश्न...पुणे  ः येत्या पाच वर्षांत पुण्याचा...
निवडणुका घेतल्या नसत्या तरी चालले असते...सातारा  ः देशात नरेंद्र मोदी यांच्या...
मंत्रिपदाची संधी जळगाव की धुळ्याला?जळगाव ः खानदेशने भाजपला कौल दिला असून, आता...
‘ईव्हीएम’चा विजय असो : छगन भुजबळनाशिक  : लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीमध्ये...
सातारा मतदारसंघातून उदयनराजे भोसलेंना...सातारा : अत्यंत चुरशीच्या झालेल्या सातारा लोकसभा...
नगरमध्ये डॉ. सुजय विखे, शिर्डीत...नगर  : विसाव्या फेरीअखेर नगर लोकसभा...