Agriculture News in Marathi, govt should give subsidy on milk, said arun narke, president indian dairy association, India | Agrowon

दूध संघांना अनुदान द्या : अरुण नरके
टीम अॅग्रोवन
सोमवार, 11 डिसेंबर 2017

पुणे ः राज्य सरकारने दुधाला २७ रुपये प्रतिलिटरचा भाव जाहीर करण्याची मोठी घोडचूक केली आहे. दूध व्यावसायिक अडचणीत आला असून, हे दूध खरेदी दर कमी करण्याचे धाडस सरकारने दाखवावे. ते शक्य नसेल तर सरकारने दूध संघांना प्रतिलिटर सात रुपये अनुदान द्यावे, अशी मागणी इंडियन डेअरी असोसिएशनचे अध्यक्ष अरुण नरके यांनी केली.

जिल्हा सहकारी दूध संघातर्फे (कात्रज दूध) माजी कृषिमंत्री शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित कात्रज एक्स्पोचे उद्‍घाटन माजी खासदार अशोक मोहोळ यांच्या हस्ते झाले. या वेळी श्री. नरके बोलत होते.

पुणे ः राज्य सरकारने दुधाला २७ रुपये प्रतिलिटरचा भाव जाहीर करण्याची मोठी घोडचूक केली आहे. दूध व्यावसायिक अडचणीत आला असून, हे दूध खरेदी दर कमी करण्याचे धाडस सरकारने दाखवावे. ते शक्य नसेल तर सरकारने दूध संघांना प्रतिलिटर सात रुपये अनुदान द्यावे, अशी मागणी इंडियन डेअरी असोसिएशनचे अध्यक्ष अरुण नरके यांनी केली.

जिल्हा सहकारी दूध संघातर्फे (कात्रज दूध) माजी कृषिमंत्री शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित कात्रज एक्स्पोचे उद्‍घाटन माजी खासदार अशोक मोहोळ यांच्या हस्ते झाले. या वेळी श्री. नरके बोलत होते.

या वेळी दूध संघाचे अध्यक्ष विष्णू हिंगे, उपाध्यक्ष वैशाली गोपाळघरे, प्रादेशिक दुग्धविकास अधिकारी महेश मुळे, महानंदच्या माजी अध्यक्षा वैशाली नागवडे, गोपाळ मस्के, रामचंद्र ढोंबरे, रमेश भुजबळ, बाळासाहेब खिलारी, भगवान पासलकर, केशर पवार, व्यवस्थापकीय संचालक विवेक क्षीरसागर अादी उपस्थित होते.

या वेळी अरुण नरके म्हणाले, की जगभरात दूध भुकटीचे दर घसरले अाहेत. दूध भुकटी उत्पादकांना ३० ते ९० रुपये प्रतिकिलो तोटा सहन करावा लागत आहे. देशात मोठ्या प्रमाणावर दूध भुकटी पडून असल्याने भुकटी प्रकल्पासाठी दूध खरेदी नाकारण्यात येत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या दुधाचे दर उतरवावे लागतील, अशी स्थिती असताना राज्य सरकारने कोणाला तरी खुश करण्यासाठी दुधाचे दर वाढविण्याची घोडचूक केली.

अधिकाऱ्यांच्या सांगण्यावरून घेलेल्या निर्णयामुळे दूध संघ भरडले जात आहेत. गोकुळ दूध संघाला गेल्या चार महिन्यांत २५ कोटी रुपयांचा तोटा झाला आहे. अडचणीच्या काळात दर वाढविण्याचा निर्णय घेतल्यानंतर कोणत्या तोंडाने तो कमी करायचा, अशी सरकारची स्थिती आहे.

पुढील वर्षभर हीच स्थिती राहणार आहे. कर्नाटक सरकारने दूध संघांना प्रतिलिटर ५ रुपये अनुदान दिले असून, राज्य सरकारनेही नुकसानभरपाई म्हणून संघांना प्रतिलिटर सात रुपये अनुदान द्यावे, दूध भुकटीचा बफर स्टॉक करावा, शाळांमध्ये विद्यार्थ्यांना पिण्यासाठी दूध उपलब्ध करून देऊन उत्पादकांना पैसे द्यावेत, अशी मागणी श्री. नरके यांनी या वेळी केली.

दुधाचा विक्री दर वाढवू नका ः मोहोळ
खासदार अशोक मोहोळ म्हणाले, की कात्रज दूध संघाने शेतकऱ्यांसाठी गीर गाईचा गोठा तयार करण्याचे नियोजन केले आहे. यात एक पाऊल पुढे टाकून देशी गाईच्या दूध उत्पादनात वाढ करण्यासाठी पुढाकार घ्यावा.

इतर राज्यांत सरकार दूध संघांमध्ये लक्ष घालत नाही. महाराष्ट्रात मात्र उलट स्थिती आहे. दूध खरेदी दर वाढवूनही दुधाचा विक्री दर वाढवू नका, असे सांगणे हा सरकारचा नासमजपणा आहे. शेतकऱ्यांच्या फायद्यासाठी तालुका स्थरावर प्रदर्शने भरविण्यात यावीत, असेही श्री. मोहोळ यांनी सांगितले.

इतर ताज्या घडामोडी
दुधाचा दर वाढवून मिळाल्याने ‘स्वाभिमानी...सोलापूर : दुधाला वाढीव दराची मागणी करत स्वाभिमानी...
नाशिक जिल्ह्यात वाहतूकदारांच्या संपाला...नाशिक : देशात वाढत चाललेली डिझेल दरवाढ, न...
समृद्धीसाठी सक्तीने भूसंपादनाचा प्रस्तावनाशिक  : मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गासाठी...
माउली- सोपानदेव बंधुभेटीच्या सोहळ्याने...भंडी शेगाव - पंढरीच्या वाटचालीत वेळापूरचा...
कर्जमाफी योजनेत आता व्यक्ती घटकनागपूर : छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान...
रविकांत तुपकर यांना पुण्यात अटकपुणे ः दूध आंदोलनादरम्यान पुणे शहरात जवळपास १० ते...
भात पिकातील एकात्मिक खत व्यवस्थापनभात पिकामध्ये हेक्टरी सरासरी उत्पादन कमी...
कर्जवाटपात राष्ट्रीयीकृत बॅंकांची...सोलापूर : यंदाच्या खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांना...
परभणीत पीकविमा वेबपोर्टलची गती धीमीपरभणी ः पंतप्रधान पीक विमा योजनेअंतर्गंत...
उजनी धरणातील पाणीपातळीत वेगाने वाढ सोलापूर : पुणे जिल्ह्यातील पावसावर सोलापूर...
धरणसाठा वाढण्यासाठी जोरदार पावसाची... जळगाव  : जिल्ह्यात मागील दोन दिवसांत...
राज्य सरकारकडून केळी उत्पादकांची टिंगल...नागपूर : चक्रीवादळ आणि गारपिटीमुळे जळगाव...
शेतकऱ्यांच्या बांधावर तज्ज्ञांकडून...जालना : वसंतराव नाईक मराठवाडा कृषी...
सांगलीत शेतकऱ्यांनी काढला ९० कोटींचा...सांगली ः केंद्र सरकारच्या पंतप्रधान शेती विमा...
आरक्षणासाठी आता ‘ठोक मोर्चा’ काढणारनाशिक :  देवेंद्र फडणवीस सरकार मराठा...
धमकीमुळे गंगापूर धरणाचे संरक्षण वाढविलेनाशिक : ‘हम यूपीसे बोल रहें हैं, गंगापूर बांध के...
ऊसतोडणी यंत्र खरेदीसाठी स्वतंत्र योजना...नागपूर  : वैयक्तिक लाभार्थी शेतकऱ्यांना...
पीक कर्जवाटपात सातारा जिल्हा अव्वलसातारा  : खरीप हंगामात शेतकऱ्यांना पीककर्ज...
अकोले तालुक्‍यात पावसाचा जोर ओसरलानगर  ः जिल्ह्यात सध्या फक्त अकोले तालुक्‍...
नगर जिल्ह्यात ‘जलयुक्त शिवार’ची साडेसहा...नगर  ः जलयुक्त शिवार योजनेतून २०१७-१८...