agriculture news in marathi, Govt ups export incentive on soymeal to 7%, gives other meals a miss | Agrowon

सोयामील निर्यात प्राेत्साहन अनुदानात दाेन टक्के वाढ
टीम अॅग्रोवन
गुरुवार, 7 डिसेंबर 2017

पुणे : तेलबियांच्या आयात शुल्कात वाढ केल्यानंतर केंद्र सरकारने सोयामीलच्या निर्यात प्रोत्साहन अनुदानात २ टक्के वाढ करून शेतकऱ्यांना हलका दिलासा दिला आहे. निर्यात प्रोत्साहन अनुदान ७ टक्के झाल्यामुळे सोयाबीनच्या स्थानिक बाजार भावात किमात ४० ते ५० रुपयांपर्यंत सुधारणा होण्याची शक्यता राज्य कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल यांनी व्यक्त केली आहे.  

पुणे : तेलबियांच्या आयात शुल्कात वाढ केल्यानंतर केंद्र सरकारने सोयामीलच्या निर्यात प्रोत्साहन अनुदानात २ टक्के वाढ करून शेतकऱ्यांना हलका दिलासा दिला आहे. निर्यात प्रोत्साहन अनुदान ७ टक्के झाल्यामुळे सोयाबीनच्या स्थानिक बाजार भावात किमात ४० ते ५० रुपयांपर्यंत सुधारणा होण्याची शक्यता राज्य कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल यांनी व्यक्त केली आहे.  

केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाने मंगळवारी (ता. ५) यासंदर्भात अधिसूचना काढण्याची माहिती श्री. पटेल यांनी दिली. १ नोव्हेंबर २०१७ ते ३० जून २०१८ पर्यंत हे निर्यात प्रोत्साहन अनुदानात लागू करण्यात अाल्याचे या अधिसूचनेत म्हटले आहे. तीळ, कारळसह रब्बर, चहा, कॉफी, धने, हळद, जीरे, मिरी, वेलदोडा, मिरची पावडर यांच्या निर्यात प्रोत्साहन अनुदानात २ टक्के वाढ करण्यात अाली आहे.

श्री. पटेल म्हणाले, की सोयामीलचे निर्यात प्रोत्साहन अनुदान १० टक्के करावे, अशी आमची मागणी होती. मात्र, २ टक्के वाढ करण्यात आली. यामुळे बाजारपेठेत ४० ते ५० रुपयांपर्यंत सोयाबीन वधारण्यास मदत होईल. १० टक्के झाले असते तर सोयाबीन दर हमीभावाच्या पुढेच स्थिरावला असता. मात्र, अाता उरलेल्या तीन टक्क्यांकरिता आम्ही प्रयत्न वाढविणार आहाेत. 

जागतिक बाजारपेठेत भारतीय सोयामीलचा भाव ४० डॉलरने अधिक होता. त्यामुळे आपल्या मालाला वाढ मिळत नव्हती. याकरिता सोयामील उत्पादकांना निर्यात अनुदान देण्याचीही आम्ही वाजवी मागणी केली. याकरिता केंद्र सरकारने निर्यात प्रोत्साहन अनुदान वाढविल्यास त्यांचे १० ते ११ हजार कोटी रुपये वाचणार होते. त्यापैकी केवळ ४०० ते ५०० कोटींचे अनुदानाकरिता खर्च करणे शक्य आहे, हे आम्ही केंद्रीय वाणिज्य मंत्रालयास पटवून दिले होते. सोयामिलचे दर वाढल्यास त्याचा थेट परिणाम बाजारभावातील सोयाबीनवर होतो, म्हणून दोन टक्के जरी आयात शुल्क वाढविले असले, तरी ४० ते ५० रुपयांपर्यंत दरात वाढ अपेक्षित धरली जात असल्यासे श्री. पटेल म्हणाले. 

निर्यातीला नैसर्गिक संधी
यंदा सोयामिल निर्यातीला नैसर्गिक संधी भारतीय उद्योजकांना उपलब्ध झाली आहे. किमान १० ते १२ लाख टन सोयामील निर्यात होण्याची शक्यता आहे. यातील ५ लाख टन आत्तापर्यंत निर्यातही झाले. भारतीय सोयामील जगभरात मागणी असते, परंतु आपले दर जागतिक बाजारपेठेत चढे असल्याने अपेक्षित उठाव नव्हता अाणि त्याचा थेट फायदा सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना मिळत नव्हता. आता निर्यात प्रोत्साहन अनुदान शुल्क ५ टक्क्यांवरून ७ टक्के लागू केल्याने निर्यातीला प्रोत्साहन मिळून देशांतर्गत सोयाबीन बाजारपेठेत दरात सुधारणा होणे अपेक्षित असे श्री. पटेल म्हणाले. 

  केंद्र सरकारने शेतकऱ्यांच्या दृष्टिकोनातून चांगला निर्णय घेतला. यामुळे बाजारात सोयाबीनच्या दरात ५० रुपये नोंद झाली.
- अशोक भुताडा, सोयाबीन प्रक्रिया उद्योजक, कीर्ती गोल्ड मील, लातूर

इतर अॅग्रो विशेष
आरोग्यदायी आहार हेच हवे लक्ष्य!पहिले आणि दुसरे महायुद्ध संपले, यामध्ये...
तापलेलं ‘दूध’अनिश्‍चित अशा शेतीला शाश्वत मिळकतीची जोड म्हणून...
खडकवासला, कलमोडी धरण भरलेपुणे  : जिल्ह्याच्या बहुतांशी भागात पावसाने...
दुधाचा भडका; सरकारची कोंडी पुणे  : राज्यातील दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या...
दुधाचे टँकर बंदोबस्तात मुंबईकडे रवानानाशिक : स्वाभिमानी शेतकरी संघटनेने पुकारलेल्या...
कोकण, मध्य महाराष्ट्र, पूर्व विदर्भात...पुणे: कोकण, मध्य महाराष्ट्राला सोमवारी (ता. १६)...
दूध आंदोलनाचे विधिमंडळातही पडसादनागपूर: दुधाला लिटरमागे प्रतिलिटर पाच रुपये...
बाजारपेठ ओळखून केळी बागेचे आदर्श नियोजनकठोरा (ता. जि. जळगाव) येथील पांडुरंग मोहन पाटील व...
एकात्मीक शेतीतून खुल्या झाल्या...आत्महत्याग्रस्त अशी ओळख असलेल्या यवतमाळ जिह्यातील...
दूधदर प्रश्नी विधिमंडळ दणाणले; सभेत...नागपूर : राज्यात सुरु असलेल्या दूध दर आंदोलनाचे...
दूध आंदोलन तापले, बहुतांश जिल्ह्यात...पुणे : शेतकऱ्यांना प्रति लिटर थेट पाच रुपये...
कोल्हापूरात दूध संकलन १०० टक्के बंद ! कोल्हापूर- गायीच्या दूधाला प्रतिलिटर पाच...
आंतरराष्ट्रीय सुबाभूळ परिषदेच्या...पोषण हा पशुपालनातील सगळ्यात महत्त्वाचा घटक आहे....
चिंब झाली रान माती...कमी पाऊसमानानंतर उद्भवणारी पाणीटंचाई आणि दुष्काळी...
आंदोलन होणारचकोल्हापूर/ पुणे : अनेक दूध संघ अगोदरच गायीच्या...
काेकण, विदर्भात तुरळक ठिकाणी...पुणे : बंगालच्या उपसागरातील कमी दाबाचे क्षेत्र...
साखर कारखान्यांकडे १२ हजार कोटींची...लखनौ ः उत्तर प्रदेशात २०१७-१८ च्या हंगामात...
संघांकडून दूध दरात तीन रुपयांची वाढपुणे ः दूध दरावर ताेडगा काढण्यासाठी राज्य सरकारने...
पीककर्ज वितरण केवळ ३० टक्केचपुणे : शेतकऱ्यांना पीककर्ज वाटपात दिरंगाई...
सेंद्रिय भातशेतीसोबतच राबविली थेट...पुणे जिल्ह्यातील भोयरे (ता. मावळ) येथील रोहिदास...