Agriculture News in Marathi, Govt urges UN to declare 2018 as International Year of Millets, India | Agrowon

२०१८ अांतरराष्ट्रीय तृणधान्य वर्ष जाहीर करा
कोजेन्सिस वृत्तसेवा
शुक्रवार, 24 नोव्हेंबर 2017
नवी दिल्ली ः बाजरी, ज्वारी, नाचणी या तृणधान्यांच्या उत्पादनाला प्रोत्साहन मिळावे, तसेच अाहारात त्याचा वापर वाढावा, या उद्देशाने २०१८ हे अांतरराष्ट्रीय तृणधान्य वर्ष म्हणून जाहीर करावे, अशी विचारणा भारत सरकारने संयुक्त राष्ट्रसंघाकडे केली अाहे.
 
नवी दिल्ली ः बाजरी, ज्वारी, नाचणी या तृणधान्यांच्या उत्पादनाला प्रोत्साहन मिळावे, तसेच अाहारात त्याचा वापर वाढावा, या उद्देशाने २०१८ हे अांतरराष्ट्रीय तृणधान्य वर्ष म्हणून जाहीर करावे, अशी विचारणा भारत सरकारने संयुक्त राष्ट्रसंघाकडे केली अाहे.
 
याबाबत केंद्रीय कृषी मंत्रालयाने संयुक्त राष्ट्रसंघाला पत्र पाठविले अाहे. याची माहिती केंद्रीय कृषिमंत्री राधामोहन सिंह यांनी ट्विटरद्वारे दिली अाहे.भारत तृणधान्य उत्पादनात अाघाडीवर अाहे. गहू, तांदूळ या धान्यांपेक्षा तृणधान्यांमध्ये पोषणमूल्ये अधिक अाहेत. त्यासाठी तृणधान्यांचा अाहारात वापराला प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न अाहे. तृणधान्ये पिके ही कोरडवाहू अाणि उष्णकटिबंधीय हवामानात तग धरू शकतात, असे कृषिमंत्रालयाने पाठविलेल्या पत्रात म्हटले अाहे.
 
तृणधान्यांच्या लागवडीला प्रोत्साहन मिळाल्यास शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढेल. तसेच तृणधान्यांच्या अाहारातील वापरामुळे लठ्ठपणा, मधुमेह अाणि जीवनशैलीशी संबंधित उद्भवलेल्या अारोग्य समस्या हाताळण्यास मदत होईल. तृणधान्यांबाबत ग्राहक, उद्योग अाणि धोरणकर्त्यांमध्ये जागृती कमीच अाहे. परिणामी, त्याचे उत्पादन कमी असून अाहारातील वापरही कमी झाला अाहे.
 
या पार्श्वभूमीवर २०१८ अांतरराष्ट्रीय तृणधान्य वर्ष जाहीर केल्यास या पिकांच्या लागवडीला प्रोत्साहन मिळेल, असे संयुक्त राष्ट्रसंघाला पाठविलेल्या पत्रात नमूद केले अाहे.भारतात मुख्यतः बाजरी, ज्वारी, नाचणी ही तृणधान्ये पिके घेतली जातात. राजस्थानात बाजरीचे अधिक उत्पादन घेतले जाते. नाचणी उत्पादनात कर्नाटक देशात अाघाडीवर अाहे. 
 
ज्वारी, बाजरी, नाचणी या तृणधान्यांमध्ये पोषणमूल्यांचे प्रमाण अधिक अाहे. त्यात ही पिकांचा उत्पादन खर्च कमी असून, ती कोरड्या अाणि उष्णकटिबंधीय हवामानात तग धरू शकतात. या पिकांच्या लागवडीला प्रोत्साहन मिळाल्यास शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढण्यास मदत होईल.
- राधामोहनसिंह, केंद्रीय कृषिमंत्री
 
तृणधान्य उत्पादन अंदाज (दशलक्ष टनांमध्ये)
 
पीक २०१४-१५ २०१५-१६ २०१६-१७ २०१७-१८
ज्वारी ५.४५ ४.२४ ४.५७ २.१५
बाजरी ९.१८ ८.०७ ९.८० ८.६६
नाचणी २.०६ १.८२ १.४० १.६१

स्रोत ः केंद्रीय कृषी विभाग

इतर ताज्या घडामोडी
ऊस गाळपात इंदापूर कारखान्याची आघाडी पुणे  : जिल्ह्यात सर्व १७ साखर कारखान्यांनी...
निवडणुकीमुळे चाराटंचाईकडे दुर्लक्ष;...पुणे  : निवडणुकीची रणधुमाळी सुरू असताना...
नाशिक जिल्ह्यात चारा छावण्यांसाठी...नाशिक  : जिल्ह्यातील टंचाईच्या झळा तीव्र होत...
सभा मोदींची; प्रशासनाने घेतली...नाशिक : लोकसभा उमेदवारांच्या प्रचारार्थ २२ एप्रिल...
नगर : पशुधन वाचविण्यासाठी इतर...नगर : जिल्ह्यात २८ लाख लहान-मोठे जनावरे आहेत....
सौर कृषिपंप योजना खोळंबलीजळगाव : सौर कृषिपंपासाठी खानदेशातून ८ हजार ९५०...
मराठवाड्यात पाणीपुरवठ्यासाठी २३५९ टँकरऔरंगाबाद : मराठवाड्यात दुष्काळामुळे होणारी...
नत्र ऱ्हास रोखण्यासोबत वाढवता येईल...शेतकरी आपल्या मक्याच्या उत्पादनांचा अंदाज...
खानदेशात पाणंद रस्त्यांची कामे ठप्पजळगाव : खानदेशात जानेवारीत मंजुरी मिळालेल्या,...
म्हैसाळची विस्तारित योजना पूर्ण करणार...जत, जि. सांगली : ‘‘जत तालुक्याच्या पूर्व भागाला...
पुणे विभागात रब्बी कांद्याचे ३६ लाख टन...पुणे   ः रब्बी हंगामात शेतकऱ्यांनी...
गारपीट, वादळी पावसाने पुणे जिल्ह्याला...पुणे  : जिल्ह्याच्या उत्तर भागात असलेल्या...
जळगावात आले प्रतिक्विंटल २००० ते ६५००...जळगाव : कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये बुधवारी (ता...
अवकाळी पावसाने वऱ्हाडात दाणादाणअकोला   ः वऱ्हाडातील अनेक भागात...
नगर जिल्ह्यातील १२८ गावांत दूषित पाणीनगर  : ‘सर्वांना शुद्ध पाणी’ यासाठी सरकार...
आमच्या काळात एकही घोटाळा नाही :...सोलापूर : काँग्रेस आघाडी देशाला मजबूत करू...
सातारा जिल्ह्यात सलग तिसऱ्या दिवशी...सातारा : जिल्ह्यात मंगळवारी सकाळपासून ढगाळ...
बहुपयोगी नत्रयुक्त खत `कॅल्शिअम...सावकाश उपलब्ध होण्याच्या क्षमतेमुळे कॅल्शियम...
जल, मृद्‌संधारणासाठी पूर्वमशागत...जमिनीमध्ये चांगले पीक उत्पादन येण्याकरिता भौतिक,...
कृषी सल्ला : भुईमूग, आंबा पीक भुईमूग शेंगा अवस्था भुईमूग पीक आऱ्या...