agriculture news in marathi, govt will purchase will be start in jalgaon district, Maharashtra | Agrowon

...अखेर शासकीय कडधान्य खरेदी केंद्र सुरू
टीम अॅग्रोवन
सोमवार, 30 ऑक्टोबर 2017

जळगाव : जिल्ह्यात कडधान्य व सोयाबीन खरेदीसाठी गुरुवारी (ता. २६) दुपारी येथील औद्योगिक वसाहतीमधील वखार महामंडळाच्या गोदामात अखेर मार्केटिंग फेडरेशनने शासकीय खरेदी केंद्र सुरू केले आहे. या केंद्रात पहिल्या दिवशी धान्याची कुठलीही खरेदी झाली नाही. मात्र जिल्ह्यात फक्त अमळनेर येथेच कडधान्य खरेदी केंद्र सुरू, पाचोरा व जळगाव येथील खरेदी केंद्रांना मुहूर्त नाहीच, अशा आशयाचे वृत्त ॲग्रोवनने बुधवारी (ता. १८ ऑक्‍टोबर) प्रसिद्ध केले होते. त्याची दखल घेऊन अखेर मार्केटिंग फेडरेशनने जिल्ह्यातील दुसरे कडधान्य खरेदी केंद्र सुरू केले.

जळगाव : जिल्ह्यात कडधान्य व सोयाबीन खरेदीसाठी गुरुवारी (ता. २६) दुपारी येथील औद्योगिक वसाहतीमधील वखार महामंडळाच्या गोदामात अखेर मार्केटिंग फेडरेशनने शासकीय खरेदी केंद्र सुरू केले आहे. या केंद्रात पहिल्या दिवशी धान्याची कुठलीही खरेदी झाली नाही. मात्र जिल्ह्यात फक्त अमळनेर येथेच कडधान्य खरेदी केंद्र सुरू, पाचोरा व जळगाव येथील खरेदी केंद्रांना मुहूर्त नाहीच, अशा आशयाचे वृत्त ॲग्रोवनने बुधवारी (ता. १८ ऑक्‍टोबर) प्रसिद्ध केले होते. त्याची दखल घेऊन अखेर मार्केटिंग फेडरेशनने जिल्ह्यातील दुसरे कडधान्य खरेदी केंद्र सुरू केले.

कृषी उत्पन्न बाजार समितीपासून पुढे काही अंतरावर औद्योगिक वसाहतीमध्ये बी-६ येथे वखार महामंडळाच्या गोदामात हे केंद्र असून, त्यात हमीभावात उडीद, मूग व सोयाबीनची खरेदी केली जाणार असल्याचे सांगण्यात आले. नाफेडअंतर्गत मार्केटिंग फेडरेशनचे हे केंद्र असून, जळगाव तालुका शेतकरी सहकारी खरेदी विक्री संघ मर्यादित हे या केंद्राचे सब एजंट आहेत. केंद्राच्या उद्‍घाटनाला शेतकी संघाच्या उपाध्यक्ष मायाबाई पांडुरंग पाटील, संचालक विजय सोनवणे, बाजार समितीचे सचिव रवींद्र नारखेडे, केंद्राचे प्रमुख चंद्रकांत सूर्यवंशी, कृषी अधिकारी बालाजी कोळी, वखार महामंडळाचे जळगावमधील शाखाध्यक्ष बी. डी.जाधव आदी उपस्थित होते.  

६१ शेतकऱ्यांनी आपल्या धान्य विक्रीसंबंधी या केंद्रात गुरुवारी नोंदणी केली. त्यांना मोबाईलवर एसएमएस गेल्यानंतर धान्य विक्रीसाठी आणायचे आहे. त्यांना शुक्रवारी (ता. २७) हे संदेश किंवा एसएमएस गेले, असे शेतकी संघातून सांगण्यात आले. 

सोयाबीनला प्रतिक्विंटल ३०५०, उडदाला ५४०० आणि मुगाला ५५७५ रुपये प्रतिक्विंटल एवढा हमीभाव दिला जाणार आहे. दर्जेदार मालाचीच खरेदी केली जाईल, असे केंद्रप्रमुख यांनी स्पष्ट केले. धान्य विक्रीसाठी येणाऱ्या शेतकऱ्याचा आधार क्रमांक, बॅंक खाते क्रमांक व पीकपेरा असलेला सातबारा याच्या ऑनलाइन नोंदी घेतल्या जात आहेत. सातबाऱ्यावर नोंद नसली तर संबंधित शेतकऱ्याचे कडधान्य किंवा सोयाबीन या केंद्रात खरेदी केला जाणार नाही. ऑनलाइन नोंदणी बंधनकारक आहे, असे सांगण्यात आले.

इतर ताज्या घडामोडी
मार्चअखेरपर्यंत टप्प्याटप्याने... मंदीतील ब्रॉयलर्सचा बाजार मार्चअखेरपर्यंत...
पुण्यात लसूण, फ्लॉवर, मटार वधारलापुणे ः वाढता उन्हाळ्यामुळे शेतीमालाचे उत्पादन...
चीनमध्ये डेअरी उत्पादनांच्या मागणीमध्ये...चीनमध्ये डेअरी उत्पादनांच्या मागणीमध्ये प्रति...
राहुल गडपाले ‘सकाळ’चे चीफ कन्टेंट क्‍...पुणे : सकाळ माध्यम समूहाच्या संपादक संचालकपदी...
सत्तावीस कारखान्यांकडून १ कोटी २१ लाख... नगर  ः नगर, नाशिक जिल्ह्यांत सुरू असलेल्या...
पुणे जिल्ह्यातील १०० मंडळांमध्ये... पुणे  ः हवामान अंदाजाबाबत अचूक माहिती...
लाचखोर तालुका कृषी अधिकारी 'लाचलुचपत'...अकोला : जलसंधारणाच्या केलेल्या कामांची देयके...
परभणी जिल्ह्यातील चार लघू तलाव कोरडे परभणी ः पाणीसाठा संपुष्टात आल्यामुळे...
स्वखर्चाने शेततळे करणाऱ्यांना मिळेना...औरंगाबाद : शेतीला पाण्याची सोय व्हावी म्हणून...
कोल्हापुरात गुळाचे पाडव्यानिमित्त सौदे कोल्हापूर : येथील बाजार समितीत पाडव्यानिमित्त...
साखरेप्रमाणे कापसासाठी धाेरण ठरवावे :...पुणे : साखरेप्रमाणेच कापसासाठी दरावर लक्ष कें....
राज्यात आज अन्नत्याग आंदोलनमाळकोळी, नांदेड ः आजवर आत्महत्या केलेल्या...
'ईव्हीएम'ऐवजी आता मतपत्रिकांचा वापर...नवी दिल्ली : आगामी निवडणुकांमध्ये इलेक्‍...
राज-पवार भेटीने चर्चेला उधाणमुंबई : दिल्ली येथे कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी...
परभणीत ढोबळी मिरची १२०० ते १८०० रुपये... परभणी ः येथील जुना मोंढा भागातील फळे-भाजीपाला...
औरंगाबाद येथे मोसंबी २००० ते ४५०० रुपये औरंगाबाद  : येथील बाजार समितीमध्ये शनिवारी...
कृषी सल्लामार्च महिन्यात उन्हाळी भुईमूग पिकाची पेरणी करू...
पशू सल्लागोठ्यातील अस्वच्छतेमुळे बऱ्याचदा दुधाळ जनावरांना...
सांगलीतील द्राक्ष, बेदाणा उत्पादक ढगाळ... सांगली : गेल्या तीन दिवसांपासून जिल्ह्यात ढगाळ...
जळगावमधील शेतकऱ्यांचा परदेश अभ्यास दौरा... जळगाव : परदेशातील शेतीचे तंत्रज्ञान, शेती,...