agriculture news in marathi, gps system install in water tanker, nagar, maharashtra | Agrowon

नगर जिल्ह्यात पाण्याच्या टॅंकरला ‘जीपीएस’ प्रणाली
टीम अॅग्रोवन
शनिवार, 19 मे 2018
नगर  ः जिल्ह्यात यंदा उशिराने टॅंकरद्वारे पाणी पुरवठा सुरू केला आहे. मात्र टॅंकरद्वारे पाणीपुरवठा करताना फेऱ्यात होणाऱ्या तफावतीचा अनुभव असल्यामुळे यंदा पाणीपुरवठा करणाऱ्या टॅंकरना ‘जीपीएस’ प्रणाली बसविण्यात आली आहे, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी संदीप निचित यांनी दिली. 
 
नगर  ः जिल्ह्यात यंदा उशिराने टॅंकरद्वारे पाणी पुरवठा सुरू केला आहे. मात्र टॅंकरद्वारे पाणीपुरवठा करताना फेऱ्यात होणाऱ्या तफावतीचा अनुभव असल्यामुळे यंदा पाणीपुरवठा करणाऱ्या टॅंकरना ‘जीपीएस’ प्रणाली बसविण्यात आली आहे, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी संदीप निचित यांनी दिली. 
 
जिल्ह्यात गेल्या आठ ते दहा वर्षांपासून सातत्याने टॅंकरने पाणीपुरवठा करावा लागत आहे. गेल्या दोन वर्षांपासून झालेल्या जल संधारणाच्या कामांमुळे यंदा पाणीटंचाईच्या झळा कमी आहेत. साधारण जानेवारीपासूनच अनेक गावांत टॅंकरने पाणी पुरवठा करावा लागत होता. मात्र यंदा अजूनपर्यत अनेक गावांत टॅंकरने पाणीपुरवठा करण्याची गरज पडली नाही. 
 
सध्या जिल्ह्यातील पाच तालुक्‍यांत पाणीटंचाई आहे. यात संगमनेरमध्ये १४, अकोल्यामध्ये दोन, कोपरगावमध्ये एक, नगरमध्ये पाच, पारनेर तालुक्‍यात १३, पारनेर शहराइत तीन टॅंकर सुरू आहेत. याशिवाय पाथर्डी तालुक्‍यात दोन टॅंकर मंजूर झाले आहेत. अद्याप ते सुरू झालेले नाहीत. मंजुर झालेल्या टॅंकरच्या खेपा योग्य प्रकारे होत आहेत अथवा नाहीत, हे तपासण्यासाठी प्रत्येक टॅंकरला ‘जीपीएस’ प्रणाली लावण्याच्या सूचना संबंधित ठेकेदारांना देण्यात आल्या आहेत. टॅंकर गावात अथवा वाड्यांवर गेल्यानंतर तेथील पाणीपुरवठा समितीतील प्रतिनिधीची स्वाक्षरी आणल्याशिवाय टॅंकरचे बिल मंजूर होत नाही. 
 
पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाच्या चार जानेवारी २०१४ च्या परिपत्रकानुसार टॅंकरची देयके अदा करताना टॅंकरवर ‘जीपीएस’ प्रणाली बसविलेली असणे आवश्‍यक. या प्रणालीवर ज्या टॅंकरच्या फेऱ्यांची नोंद होईल, त्याच फेऱ्या देयकांकरिता अनुज्ञेय राहतील. या प्रणालीच्या पर्यवेक्षणाची जबाबदारी जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागाकडे आहे.

इतर ताज्या घडामोडी
मराठवाड्यात १८९ मंडळात जोरदार पाउस औरंगाबाद : मराठवाड्यातील 421 महसुल मंडळांपैकी तब्...
हिंगोली जिल्ह्यात सोळा मंडळात अतिवृष्टीहिंगोली : जिल्ह्यात मागील चोवीस तासांमध्ये दोन...
परभणीतील २४ मंडळात अतिवृष्टी नदी, नाले...परभणी : जिल्ह्यात बुधवार पासून पावसाचे...
नांदेड जिल्ह्यात अतिवृष्टीनादेड : जिल्ह्यातील माहूर, किनवट, भोकर, हिमायतनगर...
कोयनेत पूरस्थिती शक्‍यपाटण, जि. सातारा : कोयना धरण पाणलोट...
कर्जमाफीसाठी मीपण आत्महत्या करू का ?सातारा - ‘‘सोसायटीचे एक लाख ३० हजार रुपयांचे...
यवतमाळ जिल्ह्यात पूर परिस्थिती यवतमाळ  : जिल्हयात सुरु असलेल्या संततधार...
राज्यात भेंडी ५०० ते ३००० रुपये...सांगलीत दहा किलोस २५० ते ३०० रुपये  सांगली...
राज्याचा पुरोगामित्वाचा वारसा जपूया :...मुंबई: शेती, पाणी, गुंतवणूक, गृहनिर्माण अशा विविध...
विदर्भात पावसाचे जोरदार कमबॅकनागपूर ः गेल्या महिनाभरापासून दडी मारलेल्या...
शिराळ्यात नागप्रतिमेची पूजाशिराळा, जि. सांगली ः  अनेक वर्षे जिवंत...
अकोल्यात पावसाचे आगमनअकोला : या भागात गेल्या २० पेक्षा अधिक...
एकात्मिक कीड नियंत्रणात फेरोमोन...कामगंध सापळ्यांचा वापर केल्यास कमी खर्चात कीड...
उत्पादनवाढीसाठी एअरोसोल्सद्वारे...पृथ्वीच्या वातावरणामध्ये कृत्रिमरीत्या सल्फेट...
राजकीय सभ्यता व सुसंस्कृतपणा जपणारा एक...पुणे : राजकिय विरोध कितीही असला तरी राजकारणातील...
अटलजी : एका उत्तुंग नेतृत्वाचा अस्तभारताचे माजी पंतप्रधान, देशाचे लोकप्रिय नेते...
देशाने महान पुत्र गमावला : राहुल गांधी नवी दिल्ली : ''आज भारताने महान पुत्र गमावला...
वाजपेयींच्या निधनाने एका युगाचा अंत :...नवी दिल्ली : ''अटलजींच्या निधनाने एका युगाचा...
अजातशत्रू, मुरब्बी राजकारणी : अटल...शालीन, सभ्य राजकारणाने विरोधकांना जिंकणारे,...
...या आजारांनी वाजपेयींना ग्रासले होतेनवी दिल्लीः माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी...