तूर खरेदीसाठी लाच घेणाऱ्या ग्रेडरला अटक
तूर खरेदीसाठी लाच घेणाऱ्या ग्रेडरला अटक

तूर खरेदीसाठी लाच घेणाऱ्या ग्रेडरला अटक

हिंगोली ः कळमनुरी (जि. हिंगोली) येथील कृषी उत्पन्न बाजार समितीतील नाफेडच्या केंद्रावर तूर खरेदीसाठी शेतकऱ्यांकडून ४० हजार रुपये लाच घेताना ग्रेडरला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने बुधवारी (ता. २१) दुपारी चारच्या सुमारास अटक केली. या प्रकरणी बाजार समितीचे सभापती तसेच सचिव यांनादेखील ताब्यात घेण्यात आले असल्याची माहिती लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलिस उपाधीक्षक सुनील जैतापूरकर यांनी दिली. कळमनुरी बाजार समितीतील नाफेडच्या खरेदी केंद्रावर एका शेतकरी महिलेची ८० क्विंटल तूर खरेदी करण्यासाठी सभापती संजय कावडे, सचिव बाबूलाल जाधव, ग्रेडर गोपीनाथ गरड यांनी प्रतिक्विंटल ६०० रुपये याप्रमाणे लाचेची मागणी केली, अशी तक्रार महिलेच्या पतीने हिंगोली येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या कार्यालयात केली होती. या तक्रारीची पडताळणी केली असता, तक्रारदार शेतकऱ्याने बाजार समितीमध्ये तूर विक्रीस आणल्याचे तसेच तडजोडीअंती सभापती, सचिव आणि ग्रेडर यांना प्रतिक्विंटल ५०० रुपये याप्रमाणे ८० क्विंटल तूर खरेदीसाठी ४० हजार रुपये लाचेची मागणी केल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे बुधवारी (ता. २१) दुपारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने कळमनुरी बाजार समितीमध्ये सापळा लावून ग्रेडर गोपीनाथ गरड यांना ४० हजार रुपये लाच घेत असतांना अटक केली. या प्रकरणी सभापती संजय कावडे, सचिव बाबूलाल जाधव यांनादेखील चौकशीसाठी ताब्यात घेतले असल्याचे श्री. जैतापूरकर यांनी सांगितले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com