agriculture news in marathi, grading for agriculture univercities, parbahni, maharashtra | Agrowon

परभणी, राहुरी कृषी विद्यापीठांना पाच वर्षांसाठी अधिस्वीकृती
टीम अॅग्रोवन
शनिवार, 20 ऑक्टोबर 2018

महाविद्यालयातील शैक्षणिक सुविधांचे बळकटीकरण करण्यात आले. रिक्ते पदे भरण्यात आली. खासगी महाविद्यालयांना तुकड्या वाढविण्यासाठी तसेच नवीन महाविद्यालयांना परवानगी दिली नाही. त्यामुळे अधिस्वीकृती कायम राहिली. ‘ब’ दर्जा मिळाल्याने विद्यापीठास प्रतिष्ठा प्राप्त झाली आहे. अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या सामुदायिक प्रयत्नांचे हे यश आहे.
- डॅा. अशोक ढवण, कुलगुरू, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ.

परभणी ः भारतीय कृषी संशोधन परिषदअंतर्गत कृषी शिक्षण अधिस्वीकृती मंडळाने परभणी येथील वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ आणि राहुरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठास पाच वर्षांसाठी अधिस्वीकृती दिली आहे.
 

मूल्यांकनामध्ये परभणी येथील कृषी विद्यापीठाला ४ पैकी २.७७ आणि राहुरी येथील कृषी विद्यापीठाला २.९१ गुण मिळाले. यामुळे दोन्ही विद्यापीठांना ‘ब’ दर्जा प्राप्त झाला आहे. ‘आयसीएआर’च्या कार्यकक्षेत न येणारे अभ्यासक्रम तसेच २.५ पेक्षा कमी गुण मिळालेल्या महाविद्यालयांना अधिस्वीकृती देण्यात आलेली नाही.

भारतीय कृषी संशोधन परिषदेचे अध्यक्ष तथा राष्ट्रीय कृषी शिक्षण अधिस्वीकृती मंडळाचे अध्यक्ष डॅा. त्रिलोचन महापात्रा, उप महासंचालक (कृषी शिक्षण) डॅा. एन. एस. राठोड यांच्या प्रमुख उपस्थितीत कृषी शिक्षण अधिस्वीकृती मंडळाची २२ वी बैठक नुकतीच घेण्यात आली. या वेळी देशातील आठ कृषी विद्यापीठांच्या अधिस्वीकृतीबाबत निर्णय घेण्यात आला. संबंधित राज्यांच्या मुख्य सचिवांनी सकारात्मक परिणांमाच्या दृष्टीने दर्जेदार कृषी शिक्षणासाठी प्रयत्न करावेत.

खासगी महाविद्यालयांची अधिस्वीकृती करून घ्यावी असे निर्देश देण्यात आले आहेत. अधिस्वीकृती मिळाल्यामुळे ‘आयसीएआर’कडून शिक्षण, संशोधन, विस्तार शिक्षणासाठी निधी उपलब्ध होईल.
‘वनामकृवि’अंतर्गत अधिस्वीकृती मिळालेल्या कृषी महाविद्यालयांमध्ये परभणी येथील कृषी महाविद्यालयास ३ गुण, लातूर येथील कृषी महाविद्यालयास ३ गुण, बदनापूर येथील कृषी महाविद्यालयास २.७३ गुण, गोळेगाव येथील कृषी महाविद्यालयास २.५६ गुण, उस्‍मानाबाद येथील कृषी महाविद्यालयास २.८६ गुण आणि अंबाजोगाई येथील कृषी महाविद्यालयास २.५५ गुण प्राप्त झाले आहे. परभणी येथील कृषी अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान महाविद्यालयास २.९१ गुण, अन्‍नतंत्र महाविद्यालयास २.८७ गुण, उद्यानविद्या महाविद्यालयास २.८२ गुण, सामाजिक विज्ञान महाविद्यालयास २.८७ गुण, लातूर येथील जैवतंत्रज्ञान महाविद्यालयास २.८० गुण मिळाले असून त्यांचा अधिस्वीकृती मिळालेल्या महाविद्यालयांमध्ये समावेश आहे.

या महाविद्यालयातील पदवी, पदव्‍युत्तर तसेच आचार्य पदवी अभासक्रमास अधिस्वीकृ‍ती देण्‍यात आली आहे.  पशुसंवर्धन, दुग्धशास्‍त्र, जैवतंत्रज्ञान आणि कृषी व्‍यवसाय व्‍यवस्‍थापन विषयांतील पदव्‍युत्तर अभ्‍यासक्रम हा भारतीय कृषी संशोधन परिषदेच्‍या कार्यक्षेत्रात येत नाहीत. चाकूर (जि. लातूर) येथील कृषी व्यवसाय व्यवस्थापन महाविद्यालयास (२.०५ गुण) अधिस्‍वीकृती दिलेली नाही. ‘वनामकृवि’तील रिक्त पदे, शैक्षणिक दर्जा, खासगी महाविद्यालयातील शैक्षणिक दर्जा आदी कारणांनी राज्यातील चारही कृषी विद्यापीठांची २०१६ मध्ये स्थगित केलेली अधिस्वीकृती काही अ‍टी, शर्तींवर दोन वर्षांकरिता बहाल करण्यात आली होती. शैक्षणिक दर्जा सुधारण्यासाठी तत्कालीन कुलगुरू डॉ. बी. व्‍यंकटेश्‍वरलू, विद्यमान कुलगुरू डॉ. अशोक ढवण यांच्‍या मार्गदर्शनाखाली शिक्षण संचालक तथा‍ अधिष्‍ठाता डॉ. विलास पाटील आदींनी प्रयत्न केले. अधिस्वीकृती मूल्यांकनासाठी ‘आयसीएआर’च्या समितीने २० ते २३ सप्टेंबर या कालावधीत वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाअंतर्गत विविध महाविद्यालयांची तपासणी केली होती.

राहुरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठअंतर्गत धुळे येथील कृषी महाविद्यालयास २.९८ गुण, नंदूरबार येथील कृषी महाविद्यालयास २.७५ गुण, राहुरी येथील कृषी अभियांत्रिकी महाविद्यालयास ३.१५ गुण, पदव्युत्तर पदवी संस्थेस २.९५ गुण, पुणे कृषी महाविद्यालयास २.८८ गुण, कोल्हापूर येथील कृषी महाविद्यालयास ३.०८ गुण मिळाले असून या महाविद्यालयातील पदवी, पदव्युत्तर तसेच आचार्य पदवी अभ्यासक्रमास अधिस्वीकृती देण्यात आली आहे.

महात्मा फुले कृषी विद्यापीठास २.९१ गुणांसह ‘ब’ दर्जा मिळाला आहे. पाच वर्षांसाठी ही अधिस्वीकृती देण्यात आली आहे. परंतु अधिस्वीकृतीसाठी अपेक्षित २.५ पेक्षा कमी गुण मिळाल्यामुळे कराड येथील कृषी महाविद्यालय, कृषी पदवी (२.१२ गुण), पुणे येथील उद्यानविद्या महाविद्यालय, पदवी (१.८५ गुण), पुणे कृषी महाविद्यालयातील मृदाशास्त्र आणि कृषी रसायनशास्त्र विषयातील पदव्युत्तर पदवी, राहुरी कृषी अभियांत्रिकी महाविद्यालयातील आचार्य पदवी, पदव्युत्तर संस्थेतील पदव्युत्तर पदवी तसेच आचार्य पदवी अभ्यासक्रमास अधिस्वीकृती देण्यात आलेली नाही.
 

इतर अॅग्रो विशेष
मॉन्सून एक्सप्रेस कोकणात दाखल;...पुणे : अरबी समुद्रात आलेल्या वायू चक्रीवादळामुळे...
नवसंकल्पना ठीक; पण... राज्य शासनाच्या पशुसंवर्धन विभागातर्फे राज्यात ‘...
उत्पन्न दुपटीसाठी आत्ताही अपुरे उपाय दर्जेदार बियाणांची उपलब्धता  शेतकऱ्यांना...
सौर कृषिपंप योजनेतील लाभार्थी हिस्सा...मुंबई : मुख्यमंत्री सौर कृषिपंप योजनेत...
कृषी विभागात बदल्यांची धूमपुणे  : राज्यात ऐन खरिपाच्या नियोजनात कृषी...
मका लागवड तंत्रज्ञानपेरणी     खरीप हंगाम ः १५...
पावसाचा प्रत्येक थेंब जिरवा ः...पुणे  ः पावसाच्या पाण्याचे विविध प्रयोगांनी...
मॉन्सून आज कोकणात?पुणे  : अरबी समुद्रात आलेल्या ‘वायू’...
ग्रामविकासाचा आदर्श झालेले वडगाव पांडे महाराष्ट्र ग्राम सामाजिक परिवर्तन अभियानाच्या...
राज्यात डाळिंबाचा मृग बहर अडचणीतसांगली ः राज्यात डाळिंबाचे क्षेत्र एक लाख ३० हजार...
कोकणात पाऊस जोर धरणारपुणे  : मॉन्सूनच्या आगमनास पोषक स्थिती...
सिंधुदुर्ग जिल्हयात मुसळधार पाऊस (video...सिंधुदुर्ग : जिल्ह्यातील काही भागात बुधवारी (ता....
मक्यावरील लष्करी अळीचे एकात्मिक नियंत्रणमहाराष्ट्रात फॉल आर्मी वर्म (स्पोडोप्टेरा...
राज्य अर्थसंकल्प : सर्वसमावेशक ‘निवडणूक...मुंबई : राज्यात मोसमी पाऊस लांबला असला तरी आगामी...
‘सबसरफेस ड्रीप’ तंत्राने  ऊस, टोमॅटोची...शेततळ्यातले जेमतेम पाणी आणि उपलब्ध पाण्याचा योग्य...
कोकणात तुरळक ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाजपुणे   : राज्यातील मॉन्सूनचे आगमन...
जुनीच वाट की नवी दिशाप्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना ...
कोरड्या महाराष्ट्रावर घोषणांचा पाऊसराज्यात सत्तेत आल्यानंतर शेतीतील गुंतवणूक वाढविली...
लोकसहभागातून नागरी पर्जन्यजल संधारण शक्यप्रत्येक जलस्रोताचे पुनर्भरण करून त्याचं बळकटीकरण...
बोंडअळी निर्मूलन प्रकल्पात आठ राज्यांचा...नागपूर : देशात सर्वात आधी गुजरात त्यानंतर...