agriculture news in marathi, Grain distribution even after marketing director | Agrowon

पणन संचालकांच्या अावाहनानंतरही धान्य व्यवहार ठप्पच!
टीम अॅग्रोवन
बुधवार, 5 सप्टेंबर 2018

नगर : आधारभूत किमतीच्या खाली शेतमाल खरेदी करणाऱ्या व्यापाऱ्यांस कैद आणि दंडाची तरतूद करण्याचा आणि त्यासाठी पणन कायद्यात महत्त्वपूर्ण सुधारणा करण्याचा शासनाचा कोणताही विचार नाही. तशी तरतूदही नाही’, असे लेखी पत्र राज्याच्या पणन संचालकांनी जिल्हा उपनिबंधकांना देऊनही नगरमध्ये शेतमालाची खरेदी-विक्री सुरू झाली नाही.

नगर : आधारभूत किमतीच्या खाली शेतमाल खरेदी करणाऱ्या व्यापाऱ्यांस कैद आणि दंडाची तरतूद करण्याचा आणि त्यासाठी पणन कायद्यात महत्त्वपूर्ण सुधारणा करण्याचा शासनाचा कोणताही विचार नाही. तशी तरतूदही नाही’, असे लेखी पत्र राज्याच्या पणन संचालकांनी जिल्हा उपनिबंधकांना देऊनही नगरमध्ये शेतमालाची खरेदी-विक्री सुरू झाली नाही.

‘फक्त चर्चा झाली, अजून तसा कोणताही नियम झालेला नाही’ असे सांगितले जात असले तरी व्यापाऱ्यांना खात्रीशीर दिलासा कोण देणार? असा प्रश्‍न उपस्थित करत सरकारने तक्रारीनंतर परवाना रद्द करण्याची अट मागे घेण्याची मागणी व्यापाऱ्यांनी केली आहे. नगरसारख्या मोठ्या बाजारपेठेत गेल्या नऊ दिवसांपासून धान्य बाजारपेठ ठप्प आहे.

शेतकरी व व्यापारी यांच्यात मोठी दरी निर्माण करणारा हा निर्णय असल्याने व्यापारीवर्गात तीव्र असंतोष व्यक्त करत धान्याची खरेदी-विक्री बंद केली. त्याला आता नऊ दिवस उलटले आहेत. राज्य बाजार समिती संघाने व त्यानंतर रविवारी (ता. २) राज्य पणन संचालकांनी बाजार सुरू करण्याचे अावाहन केले. पणन कायद्यात महत्त्वपूर्ण सुधारणा करण्याचा शासनाचा कोणताही विचार नाही. तशी तरतूदही नाही, तसा कोणताही अध्यादेश निघालेला नाही,’ असे पत्र जिल्हा उपनिबंधकांना दिले. त्यानुसार त्यांनी सोमवारी (ता. ३) व्यापाऱ्यांना अावाहन केले. मात्र तरीही बाजार सुरू झालेले नाहीत.

‘शासनाने हमी खरेदी केंद्रे सुरू करावीत, तेथे गुणवत्तेत बसत नसलेला माल जाहीर करून तो व्यापाऱ्यांना कमी किमतीत खरेदी करण्याला परवानगी द्यावी, आणि कमी दराने खरेदी केलेल्या मालाबाबत तक्रार केली तर खरेदी परवाना रद्द करण्याचा जुना नियम आहे तो रद्द करावा, अशी व्यापाऱ्यांची मागणी आहे.

उद्या बाजार समिती घेणार बैठक
नगरला धान्याची खरेदी-विक्री बंद असल्याने नगरसारख्या मोठ्या बाजारपेठेत व्यवहार ठप्प आहेत. पणन संचालकांनी दिलेल्या लेखी पत्राच्या आधारे मंगळवारी (ता. ५) व्यापारी, खरेदीदारांची बैठक घेऊन व्यवहार सुरू करण्याचे अावाहन करणार आहे. बाजार सुरू करण्याचे आमचे प्रयत्न राहतील, असे बाजार समितीचे सचिव अभय भिसे यांनी सांगितले.

‘सोमवारी (ता. ३) राज्य असोसिएशनची बैठक झाली. त्यात व्यापार सुरू करण्याचे सांगितले; पण व्यापाऱ्यांचा त्रास कमी कसा होणार. सध्या गहू सोडला तर एकही माल हमीदराने खरेदी करण्यासारखा येत नाही. सरकारनेच हमीदराने धान्याची खरेदी करावी, आणि जो त्यांच्या नियमात बसत नाही तो जाहीर करून व्यापाऱ्यांना खरेदी करण्याची परवानगी मिळायला हवी. शिवाय खरेदीदार व्यापाऱ्याची तक्रार केली तर परवाना रद्द करण्याचा नियम आहे, तो रद्द करावा. सरकारकडून व्यापाऱ्यांना दिलासा देणारी खात्रीशीर हमी यायला हवी.
- शांतिलाल गांधी, सचिव, अडते बाजार मर्चंट असोसिएशन, नगर

इतर ताज्या घडामोडी
अकोल्यात तूर प्रतिक्विंटल ४२०० ते ५४००...अकोला ः स्थानिक कृषी उत्पन्न बाजार समितीत...
प्रतिष्ठेच्या माढ्यात मतदानासाठी चुरस सोलापूर : संपूर्ण राज्याचे लक्ष वेधलेल्या व...
सांगली काही ठिकणी ‘ईव्हीएम’च्या...सांगली ः जिल्ह्यात लोकसभेसाठी झालेल्या मतदानावेळी...
कोल्हापूर, हातकणंगले मतदारसंघात चुरशीने...कोल्हापूर : लोकसभेच्या कोल्हापूर आणि हातकणंगले...
मोदी यांच्या सभेसाठी कांदा लिलाव बंदनाशिक : नाशिक व दिंडोरी लोकसभा मतदारसंघातील...
परभणी ः दूध संकलनात सात लाख ८९ हजार...परभणी ः शासकीय दूध योजनेअंतर्गंत परभणी दुग्धशाळेत...
राज्यात तिसऱ्या टप्प्यात शांततेत मतदानमुंबई :  लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या...
लोकांचा कौल आघाडीलाच; पण ईव्हीएम...मुंबई : मी अनेक मतदारसंघांमध्ये फिरलो....
शिर्डी लोकसभा निवडणुकीसाठी वीस उमेदवार...नगर   : नगर लोकसभा मतदारसंघात मंगळवारी...
सोलापूर जिल्ह्यातील ६६२...सोलापूर  : लोकसभा निवडणुकीची धामधूम सुरू...
पुण्यात पाच वाजेपर्यंत ५३ टक्के मतदानपुणे  ः पुणे लोकसभा मतदारसंघात मंगळवारी (ता....
बारामतीत शांततेत मतदानपुणे  : बारामती लोकसभा मतदारसंघासाठी...
पुणे जिल्ह्यातील १४ कारखान्यांचा गाळप...पुणे  ः जिल्ह्यातील १४ साखर कारखान्यांचा...
बुलडाण्यात खरिपात सात लाख ३८ हजार...बुलडाणा  ः येत्या खरीप हंगामात जिल्हयात...
तुरीचे चुकारे रखडल्याने शेतकरी अडचणीत   संग्रामपूर, जि. बुलडाणा  : शासनाच्या हमीभाव...
नगर लोकसभा मतदारसंघात उत्साहात मतदाननगर ः नगर लोकसभा मतदारसंघात मंगळवारी (ता. २३)...
उपयोगानुसार वनशेतीसाठी वृक्षांची निवडवनशेतीसाठी मुख्यतः कोरडवाहू अथवा पडीक जमिनीची...
आंतरमशागतीसाठी अवजारेमकृवि चाकाचे हात कोळपे ः या अवजाराने आपण खुरपणी,...
एकलहरे वीज केंद्रात उभारली रोपवाटिकानाशिक : पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी...
जळगाव : निवडणुकीमुळे टॅँकरचे प्रस्ताव...जळगाव : खानदेशात दिवसागणिक पिण्याच्या...