नाशिक जिल्ह्यात ४० हजार क्विंटल धान्याची बचत

नाशिक जिल्ह्यात ४० हजार क्विंटल धान्याची बचत
नाशिक जिल्ह्यात ४० हजार क्विंटल धान्याची बचत

नाशिक : एप्रिल महिन्यापासून शिधापत्रिकाधारकांना पॉस यंत्राच्या साह्याने रेशनवरून धान्य वाटपास सुरवात झाल्यामुळे बोगस शिधापत्रिकाधारक समोर येऊ लागले असून, जिल्ह्यासाठी दरमहा मंजूर होणाऱ्या धान्याच्या नियतनात व उचलित दरमहा कमालीची घट होण्यास सुरवात झाली आहे. एप्रिल ते नोव्हेंबर या सहा महिन्यांच्या काळात जिल्ह्यात सुमारे ४० हजार क्विंटल धान्याची दरमहा बचत होत आहे.

पुरवठा अधिकारी श्रीनिवास अर्जुन यांनी ही माहिती दिली. नाशिक  शहरासाठी दरमहा २९,११२ मेट्रिक टन धान्याचे नियतन मंजूर असून, त्यापैकी ११,२५५ मेट्रिक टन धान्याची दुकानदारांकडून उचल झाली आहे. जिल्ह्णात एप्रिल महिन्यापासून शिधापत्रिकाधारकांना पॉस यंत्राच्या साह्याने रेशनमधून धान्य वितरण केले जात असून, त्यांचे आधार क्रमांकही जोडण्यात आलेले आहेत. त्यामुळे पॉस यंत्रातील माहितीशी लाभार्थ्यांची होणारी ओळख व आधारमुळे बोटाचे ठसे जुळत असल्याने रेशनमधून खऱ्या लाभार्थ्यांनाच धान्य मिळू लागले आहे. परिणामी यापूर्वी होणाऱ्या धान्याच्या उचलमध्ये कमालीची तफावत निर्माण झाल्याचे पाहून मोठ्या प्रमाणावर बनावट शिधापत्रिका असण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यातूनच धान्य शिल्लक राहत असल्याचा निष्कर्ष काढण्यात आला आहे.

नाशिक जिल्ह्णासाठी दोन लाख १५ हजार ८ क्विंटल नियतन मंजूर असले, तरी आॅगस्ट ते आॅक्टोबर या तीन महिन्यांच्या काळात जवळपास ४० टक्क्यांहून कमीच धान्याची उचल करण्यात आली. साधारणत: जिल्ह्याला मंजूर होणाऱ्या एकूण धान्याच्या नियतनातून दरमहा २० टक्के धान्य शिल्लक राहत आहे, असा दावा अर्जुन यांनी केला आहे.

दीड लाख लाभार्थी निवडणार

शिल्लक राहणारे धान्य नवीन शिधापत्रिकाधारकांना वाटप करण्याच्या सूचना राज्य सरकारने दिल्या आहेत. त्यानुसार गेल्या दोन महिन्यांपासून तहसील पातळीवर लाभार्थी शोधण्याचे काम सुरू आहे. अद्यापही लाभार्थी पुढे आलेले नाहीत. शिल्लक राहणारे धान्य सुमारे दीड लाख शिधापत्रिकाधारकांना वाटप होऊ शकते, असा अंदाज असल्याने येणाऱ्या काळात लाभार्थींची निवड करण्यात येईल.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com