agriculture news in Marathi, gram and maize sowing planing on cotton area in Khandesh, Maharashtra | Agrowon

कापसाखालील क्षेत्रात हरभरा, मका पेरणीचे नियोजन
टीम अॅग्रोवन
गुरुवार, 26 ऑक्टोबर 2017

कपाशीचे पीक फारसे समाधानकारक नाही. त्यात अजूनही सुधारणा झालेली नाही. त्यामुळे शेतकरी पूर्वहंगामी कपाशीचे क्षेत्र रिकामे करीत आहेत. 
- मधुकर राजाराम पाटील, कापूस उत्पादक, डोमगाव, जि. जळगाव

जळगाव ः खानदेशात यंदा पावसाची अनियमितता व रोगराई यामुळे बहुसंख्य क्षेत्रावरील पूर्वहंगामी कापसाला फटका बसला. आता या कापसाखालील क्षेत्र रिकामे करून त्यात हरभरा, मका पेरणीचे नियोजन शेतकरी करीत आहेत. 

खानदेशात आठ लाख हेक्‍टरवर कपाशीची लागवड झाली असून, त्यातील सव्वालाख हेक्‍टर क्षेत्र हे पूर्वहंगामी कपाशीखाली आहे. मे महिना व जूनच्या पहिल्या आठवड्यात लागवड झाली होती. पण यंदा पावसाचे पाणी हवे तसे मिळाले नाही. गुलाबी बोंडअळीने जुलै महिन्यातच जेरीस आणले. अशातच हळूहळू पीक हातचे गेले.

आजघडीला पूर्वहंगामी कपाशीचे पीक फारसे समाधानकारक नाही. ज्या शेतकऱ्यांनी भरमसाठ खर्च फवारणी व खतांवर केला त्यांचे पीक बरे दिसते. पण इतर क्षेत्रात पिकाची स्थिती चांगली नसल्याने हतबल झालेल्या शेतकऱ्यांनी अखेर पीक काढायला मागील आठवड्यातच सुरवात केली आहे.

काही शेतकऱ्यांनी थेट कपाशीवर रोटाव्हेटर फिरविला असून, त्यात बैलांद्वारे मशागत करून हरभरा, मका, गहू पेरणीचे नियोजन त्यांनी केले आहे. चोपडा, जळगाव, शिरपूर, शहादा, यावल या भागांत कपाशीचे पीक काढायला सुरवात झाल्याची माहिती मिळाली. 

१७ ते १८ हजार हेक्‍टर क्षेत्र रिकामे होणार
खानदेशात जवळपास सव्वालाख हेक्‍टरवर पूर्वहंगामी कपाशी अाहे. यातील सुमारे १७ ते १८ हजार हेक्‍टर क्षेत्र आगामी चार ते पाच दिवसांत रिकामे केले जाईल. रिकाम्या होणाऱ्या क्षेत्रात बीटी कापसाखालील क्षेत्राचाच समावेश असणार आहे. देशी कपाशीचे पीक बरे असल्याने ते मोडले जाणार नसल्याचे चित्र आहे. 

कपाशी परवडलीच नाही
मोठी मेहनत करून मे महिन्यात पूर्वहंगामी कपाशीची लागवड केली. एक-एक बीजाचे अंकुरण व्हावे यासाठी भरउन्हात शेतकरी राबत होता. परंतु कपाशीचे हे पीक यंदा नुकसानकारक ठरले आहे. पूर्वमशागत, बियाणे, आंतरमशागत, सूक्ष्मसिंचन यंत्रणा, खते, वेचणी, फवारणी आदी खर्च व उत्पन्न यात ताळमेळ बसलेला नसल्याच्या प्रतिक्रिया शेतकऱ्यांमध्ये आहेत. 

 

इतर ताज्या घडामोडी
अकोल्याला रब्बीसाठी हरभऱ्याचे वाढीव...अकोला  ः जिल्ह्यात रब्बी हंगामासाठी...
दुष्काळाची व्यथा मांडताना महिला...निल्लोड, जि. औरंगाबाद : विहिरींनी तळ गाठला, मक्‍...
कोल्हापूर जिल्ह्यात खरीप पिकांच्या...कोल्हापूर  : खरीप पिकांची काढणी वेगात...
सोलापुरातील अडचणीतील शेतकऱ्यांसाठी आश्‍...सोलापूर  ः सोलापूर जिल्ह्यात दुष्काळाची...
नगरमधील ४३३८ शेतकऱ्यांची शेतीमाल...नगर  ः आधारभूत किमतीने मूग, उडीद, सोयाबीनची...
जळगाव जिल्ह्यात ज्वारीच्या पेरणीला...जळगाव : जिल्ह्यात रब्बीतील ज्वारी पेरणीकडे...
ढगाळ वातावरणामध्ये द्राक्ष पिकात...सांगली, मिरज व सोलापूर येथील काही भागांमध्ये हलके...
हुमणी अळीचे एकात्मिक व्यवस्थापनगेल्या काही वर्षांपासून राज्याच्या विविध...
पुणे जिल्ह्यात रब्बीसाठी १९ हजार...पुणे : पुणे जिल्ह्यात रब्बी हंगामाची तयारी सुरू...
सोलापूर जिल्हा बॅंकेकडून ७० हजार...सोलापूर  : सोलापूर जिल्हा बॅंकेच्या सव्वा...
सोयाबीन खरेदी केंद्रे सुरू होईनातसातारा : जिल्ह्यात खरिप पिकांची काढणी अंतिम...
भाजीपाला सल्लासध्याच्या काळात बाजारपेठेची मागणी लक्षात घेऊन...
कृषी सल्ला : ऊस, कापूस, तूर, गहू, हरभरा...ज्या ठिकाणी पाण्याचा ताण बसत आहे, त्या ठिकाणी...
हाताचा नाकाशी होणाऱ्या संपर्कातूनही...न्यूमोनियाकारक जिवाणू हा नाकाला हात लावणे,...
खानदेशात खरिपातील ज्वारीची आवक सुरुजळगाव : खानदेशात अनेक भागांत ज्वारीची मळणी जवळपास...
परभणी जिल्ह्यात मुगाची उत्पादकता एकरी १...परभणी : यंदा परभणी जिल्ह्यात मुगाची सरासरी...
पुणे जिल्ह्यात चाराटंचाईपुणे   ः पुणे जिल्ह्यातील पूर्व पट्ट्यात...
नगर - मराठवाड्यात पाण्यावरून संघर्षाची...नगर ः पुरेसा पाऊस झाला नसल्याने यंदा...
‘महसूल’च्या जागेवर चाऱ्याच्या...यवतमाळ  ः पांढरकवडा व राळेगाव तालुक्‍यांतील...
सातारा जिल्ह्यात ७७३ एकरांवर तुती लागवडसातारा  ः जिल्ह्यात रेशीम शेती करण्याकडे...