नगर बाजार समितीत हरभरा, मुगाची आवक वाढली

हरभरा
हरभरा

नगर ः नगर बाजार समितीत मागील सप्ताहात मूग, हरभऱ्याची आवक वाढली आहे. मुगाला चार हजार चारशे रुपयांचा, तर हरभऱ्याला तीन हजार ते ३६७५ रुपयांचा दर मिळाला. रब्बीची ज्वारी, गव्हाचे अजून उत्पादन हाती आलेले नसले तरी बाजारात ज्वारीची आवकही बऱ्यापैकी आहे. भाजीपाल्याची आवकही वाढती अजून दरात मात्र फारसी वाढ नाही. बाजार समितीत बाजरीची ५३ क्विंटलची आवक झाली असून, १९०० रुपयांचा दर मिळाला. तुरीची पाचशे आठरा क्विंटलची आवक झाली असून, ३८५० ते ४२५० रुपयांचा, तर हरभऱ्याची १०७९ क्विंटलची आवक होऊन तीन हजार ते तीन हजार सहाशे ७५ रुपयांचा प्रति क्विंटलला दर मिळाला. मुगाची २१८ क्‍लिंटलची आवक होऊन चार हजार चारशे, लाल मिरचीची १६६ क्विंटलची आवक होऊन ४८५० ते दहा हजार ५५०, गव्हाची ५९७ क्विंटलची आवक होऊन १६०० ते १७०५, सोयाबीनची ११७ क्विंटलची आवक होऊन ३४०० ते ३५५१, मक्याची ४१७ क्विंटलची आवक होऊन १०७५ रुपयांचा दर मिळाला. चिंचेची आवकही वाढली असून, गत सप्ताहात चिंचेची १३७९ क्विंटलची आवक झाली. त्याला सहा हजार ते १४ हजार ५०२ रुपयांचा दर मिळाला. गूळडागाची सहा हजार एकशे ४८ क्विंटलची आवक झाली. गूळडागाला २४०० ते ३२०० रुपयांचा दर मिळाला. बाजार समितीत हरभरा, ज्वारीची अजून आवक वाढेल, असे सचिव अभय भिसे यांनी सांगितले. टोमॅटोची ८०६ क्विंटलची आवक झाली. टोमॅटोला ६२० रुपयांचा सरासरी दर मिळाला. वांग्याची १६६ क्विंटल आवक होऊन दीड हजार रुपये, फ्लॉवरची ८१० क्विंटलची आवक होऊन पाचशे रुपये, कोबीची ५७३ क्विंटलची आवक होऊन पाचशे रुपये, काकडीची २८१ क्विंटलची आवक होऊन १५०० रुपये, भेंडीची ७७ क्विंटलची आवक होऊन तीन हजार रुपये, बटाट्याची १३४७ क्विंटलची आवक होऊन एक हजार रुपयांचा दर मिळाला.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com