हरभऱ्याचे चुकारे अद्याप थकीत

हरभऱ्याचे चुकारे अद्याप थकीत
हरभऱ्याचे चुकारे अद्याप थकीत

नांदेड : केंद्र शासनाच्या किंमत समर्थन योजनेअंतर्गत हरभरा खरेदी बंद होऊन महिनाभराचा कालावधी उलटला आहे. परंतु नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांतील ८ हजार ८९७ शेतकऱ्यांचे ६३ कोटी ५४ लाख १९ हजार ६८० रुपये एवढ्या रकमचे चुकारे अद्याप थकीत आहेत.

नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना ५ कोटींचे चुकारे अदा करण्यात आले. मात्र, परभणी आणि हिंगोली जिल्ह्यातील ३ हजार ८४३ शेतकऱ्यांचे हरभरा खरेदी सुरू झाल्यापासूनचे चुकारे अद्याप अदा करण्यात आलेले नाहीत. खरेदी बंद होऊन महिनाभराचा कालावधी उलटला आहे. परंतु, नाफेडने मार्केटिंग फेडरेशनकडे निधी दिला नसल्यामुळे शेतकऱ्यांचे चुकारे अदा करण्यासाठी विलंब लागत असल्याचे सूत्रांनी सांगितले. चुकारे अडकल्यामुळे या तीन जिल्ह्यांतील आर्थिक अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांवर पेरणीसाठी उधार -उसणवारी, सावकारी कर्ज काढण्याची वेळ आली.

नांदेड, परभणी, हिंगोली या तीन जिल्ह्यांमध्ये केंद्र शासनाच्या किंमत समर्थन योजनेअंतर्गत नाफेड आणि विदर्भ को आॅपरेटीव्ह मार्केटिंग फेडरेशन यांच्या तर्फे ९ एप्रिल ते १३ जून या कालावधीत १० हजार ४४६ शेतकऱ्यांचा १ लाख ५५ हजार ७७६.७० क्विंटल हरभरा खरेदी करण्यात आला. खरेदी केलेला हरभरा साठविण्यासाठी वखार महामंडळाच्या गोदामात जागा नसल्यामुळे चुकारे अदा करण्यासाठी विलंब लागला. त्यात आता नाफेडने निधी उपलब्ध करून न दिल्यामुळे चुकारे मिळत नाहीत.

नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना ५ कोटींचे चुकारे अदा करण्यात आले. परंतु अद्याप ५ हजार ५४ शेतकऱ्यांचे ३५ कोटी १८ लाख ३५ हजार २८० रुपये एवढ्या रक्कमचे चुकारे थकीत आहेत.

तुरीचे १४१ कोटी ८६ लाख रुपयांचे चुकारे अदा आजवर नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना तुरीचे ७० कोटी रुपये, परभणी जिल्ह्यातील ३ हजार ९७० शेतकऱ्यांना ३७ कोटी १८ लाख २६ हजार २१७ रुपये, हिंगोली जिल्ह्यातील ५ हजार ५४९ शेतकऱ्यांना ३४ कोटी ६७ लाख ९१ हजार ६१९ रुपये असे एकूण १४१ कोटी ८६ लाख १७ हजार ८३६ रुपयांचे चुकारे अदा करण्यात आले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com