ग्रामपंचायतींच्या दुसऱ्या टप्प्यातील मतदान १६ ऑक्टोबरला

ग्रामपंचायत निवडणूक
ग्रामपंचायत निवडणूक

मुंबई : राज्यातील ग्रामपंचायतींच्या निवडणूक कार्यक्रमात काहीसा बदल करण्यात आला अाहे. दुसऱ्या टप्प्यातील मतदान आता १४ ऐवजी १६ ऑक्टोबर २०१७ रोजी; तर मतमोजणी १७ ऑक्टोबर २०१७ रोजी होईल, अशी माहिती राज्य निवडणूक आयुक्त ज. स. सहारिया यांनी दिली.

श्री. सहारिया यांनी सांगितले की, राज्य निवडणूक आयोगाने नोव्हेंबर व डिसेंबर २०१७ मध्ये मुदत संपणाऱ्या ७ हजार ५७६ ग्रामपंचायतींच्या सर्वत्रिक निवडणुकांचा दोन टप्प्यांतील कार्यक्रम १ सप्टेंबर २०१७ जाहीर केला होता.

त्यानुसार ७ आणि १४ ऑक्टोबर २०१७ रोजी मतदान होणार होते; परंतु १४ ऑक्टोबर रोजी धम्मचक्रप्रवर्तन दिन असल्यामुळे मतदानाच्या तारखेत बदल करण्यात यावा, अशी विनंती विविध घटकांकडून करण्यात आली होती. त्यावर संबंधित विभागीय आयुक्तांकडून अहवाल प्राप्त झाल्यानंतर आता १६ ऑक्टोबर २०१७ रोजी मतदान घेण्याचा निर्णय घेण्यात आला  आहे.

   गोंदियात दुपारी ३ पर्यंतच मतदान गोंदियाच्या जिल्हाधिकाऱ्यांच्या विनंतीनुसार या जिल्ह्यातील देवरी, सालेकसा, सडक-अर्जुनी व अर्जुनी-मोर या चार नक्षलग्रस्त तालुक्यांतील मतदानाची वेळ सायंकाळी ५.३० ऐवजी दुपारी केवळ ३ वाजेपर्यंत करण्यात आली आहे. या ठिकाणीदेखील दुसऱ्या टप्प्यात १६ ऑक्टोबर २०१७ रोजी मतदान होणार आहे, असेही श्री. सहारिया यांनी सांगितले.    ग्रामपंचायतींची जिल्हानिहाय संख्या दुसऱ्या टप्यात १४ ऐवजी १६ ऑक्टोबर २०१७ रोजी मतदान होणाऱ्या ग्रामपंचायतींची जिल्हानिहाय संख्या अशी : ठाणे- ४१, पालघर- ५६, रायगड- २४२, रत्नागिरी- २२२, सिंधुदुर्ग- ३२५, पुणे- २२१, सोलापूर- १९२, सातारा- ३१९, सांगली- ४५३, कोल्हापूर- ४७८, नागपूर- २३८, वर्धा- ११२, चंद्रपूर- ५२, भंडारा- ३६२, गोंदिया- ३५३ आणि गडचिरोली- २६, एकूण- ३,६९२.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com