Agriculture News in Marathi, Gram panchayat election campaign, Social media, Satara district | Agrowon

गावातील कारभाऱ्यांकडून हायटेक प्रचार
विकास जाधव
रविवार, 15 ऑक्टोबर 2017
सातारा ः जिल्ह्यातील २६० ग्रामपंचायतींच्या पंचवार्षिक निवडणुकीचे रणागंण सुरू आहे. प्रथमच सरंपचपदाची थेट जनतेतून निवडणूक होत असल्याने उत्साही कारभाऱ्यांकडून निवडणुकीचा प्रचार हायटेक पद्धतीने केला जात आहे.
 
व्हॉट्सॲप, फेसबुक या सोशल मीडियाबरोबच अँड्रॉईड मोबाईलचे विविध प्रकारची ॲप, व्हॉइस कॉलिंग, टेक्‍स मेसेजचा प्रचारासाठी वापर गावागावांत केला जात आहे.
जिल्ह्यात ३१९ ग्रामपंचायतींचा निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आला होता.
 
सातारा ः जिल्ह्यातील २६० ग्रामपंचायतींच्या पंचवार्षिक निवडणुकीचे रणागंण सुरू आहे. प्रथमच सरंपचपदाची थेट जनतेतून निवडणूक होत असल्याने उत्साही कारभाऱ्यांकडून निवडणुकीचा प्रचार हायटेक पद्धतीने केला जात आहे.
 
व्हॉट्सॲप, फेसबुक या सोशल मीडियाबरोबच अँड्रॉईड मोबाईलचे विविध प्रकारची ॲप, व्हॉइस कॉलिंग, टेक्‍स मेसेजचा प्रचारासाठी वापर गावागावांत केला जात आहे.
जिल्ह्यात ३१९ ग्रामपंचायतींचा निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आला होता.
 
या निवडणुकीत विनातक्रार ५८ ग्रामपंचायतींची निवडणूक बिनविरोध झाली. उर्वरित २६० ग्रामपंचायतींच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. केंद्र व राज्य सरकार प्रमाणे ग्रामपंचायत निवडणुकीतही गावागावांत हायटेक प्रचार केला जात आहे.
 
या अगोदरच्या निवडणुकांत बॅनर, स्पीकर तसेच थेट मतदारांना भेटून मते मागितली जात होती. या निवडणुककीत मात्र कारभाऱ्यांकडून प्रचाराच्या माध्यमात बदल करण्यात आला आहे. या निवडणुकीत सोशल मीडियाचा वापर केला जात आहे.
 
सध्याच्या युगात इंटरनेटचा सर्रास वापर केला जात आहे. या वापराचा गावच्या कारभाऱ्यांकडून फायदा घेतला जात आहे. निवडणुकीतील उमदेवारांनी मोबाईल ॲपद्वारे लिंक तयार केली अाहे. ही लिंक मेसेजद्वारे मतदारांना पाठवली जात आहे. या लिंकवर क्‍लिक करताच उमेदवार व त्यांच्या पॅनेलची माहिती मिळत आहे.
 
खासदार, आमदारकीच्या निवडणुकीत व्हॉइस कॉलचा वापर केला जात होता. आता या तंत्रज्ञानाचा ग्रामपंचायत निवडणुकातही वापर केला जात आहे. एकूणच या निवडणुकीत हायटेक प्रचाराने रंगत आली आहे.
 
जाहीरनाम्यातून मोठी अाश्वासने
या निवडणुकीत उमेदवार तसेच पॅनेल प्रमुखाकडून आपले पॅनेल तसेच उमेदवारांचा विजय होईल यासाठी जाहिरनामा प्रसिद्ध करण्यात अाले आहेत. लोकसभा व विधानसभा निवडणुकांप्रमाणे जाहीरनाम्यातून मोठी अाश्वासने दिली जात आहे.
 
शासकीय धोरणामुळे सरपंचाचे अधिकार आणि निधी मोठ्या प्रमाणात उपलब्ध होणार आहे. या निधीचा उपयोग करत गावाचा कसा विकास करता येईल, याचा जाहीरनाम्यात समावेश करण्यात आला आहे.

इतर ताज्या घडामोडी
फळबाग लागवड योजनेवर ग्रामसेवकांचा...चिपळूण, जि. रत्नागिरी ः महाराष्ट्र ग्रामसेवक...
‘रिसॅट-२ बी'चे उपग्रहाचे यशस्वी...श्रीहरीकोट : भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने (इस्रो...
‘कृष्णामाई’चा कर्नाटकातील काठ तहानला;...कोल्हापूर : कृष्णा नदीवर अवलंबून असणाऱ्या कर्नाटक...
जळगावात लिंबू २२०० ते ५००० रुपये...जळगाव  : कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
देशभरात ७२४ महिला उमेदवारांचे भवितव्य...नवी दिल्ली : देशात नुकत्याच झालेल्या लोकसभा...
गारपिटीनंतर द्राक्ष बागेची अधिक काळजी...द्राक्ष बागेमध्ये वाढीच्या विविध अवस्थेमध्ये...
अमरावती : नाफेडने अचानक केली तूरखरेदी...अमरावती : ऑनलाइन नोंदणी केलेल्या दहा टक्‍के...
बुलडाणा जिल्ह्यात भीषण पाणीटंचाईबुलडाणा ः गेल्या काही वर्षांत पहिल्यांदाच...
दुष्काळात संत्रा बागेला टँकरच्या...अकोला ः दुष्काळी परिस्थितीने शेतकऱ्याला चौफेर...
खानदेशात सौर कृषिपंप योजनेतून लवकरच पंप...जळगाव ः सौर कृषिपंपासाठी खानदेशातून ८ हजार ९५०...
मिरज, तासगावसह सिंधुदुर्गात पाऊससिंधुदुर्ग, सांगली : विजांच्या कडकडाटांसह...
मराठवाड्यात नवीन खासदारांबाबत उत्कंठानांदेड : मराठवाड्यातील आठ लोकसभा मतदारसंघांतील...
कोल्हापूर, सांगलीत निकालाची उत्सुकता...सांगली : लोकसभा निवडणुकीची मतमोजणी गुरुवारी (ता....
सोलापूर, माढ्याच्या निकालाकडे देशाचे...सोलापूर : अत्यंत प्रतिष्ठेच्या ठरलेल्या...
परभणी जिल्ह्यातील ग्रामीण भागात ७५...परभणी : जिल्ह्याच्या ग्रामीण भागात पाणीटंचाईचे...
यसनी तोडून पुढे या : रमेश घोलपसोलापूर  : "परिस्थितीने बांधलेल्या यसनी तोडत...
पुणे विभागासाठी साडेपाच कोटींवर वृक्ष...पुणे  ः पर्यावरणाचे संतुलन अबाधित...
सोयाबीन उत्पादकांना पीकविम्याची रक्कम...मुंबई  : शासनाच्या विशेषतः कृषी विभागाच्या...
आमदार निधीतून दुष्काळग्रस्त भागासाठी...मुंबई  ः दुष्काळग्रस्त भागातील जनतेला आमदार...
साडेचौदा टन केशर, बदामी आंबा...मुंबई : वातावरण नियंत्रित करून फळाचे...