agriculture news in marathi, gram panchayat will honour for clean water supply, pune, maharashtra | Agrowon

शुद्ध पाणीपुरवठा करणाऱ्या ग्रामपंचायतींना मिळणार ‘चंदेरी कार्ड’
टीम अॅग्रोवन
मंगळवार, 10 एप्रिल 2018

पुणे : जलस्रोताभोवतीचा परिसर स्वच्छ ठेवून, पाण्याची गुणवत्ता राखत जनतेला शुद्ध व सुरक्षित पाणीपुरवठा करणाऱ्या ग्रामपंचायतींना जिल्हा परिषदेमार्फत हिरवे कार्ड देण्यात येते. सतत पाच वर्षे हिरवे कार्ड मिळविणाऱ्या आणि कोणत्याही जलजन्य साथरोगाचा उद्रेक न झालेल्या ग्रामपंचायतींना यंदाच्या वर्षापासून जिल्हा परिषदेतर्फे ‘चंदेरी कार्ड’ देण्यात येणार आहे. या ग्रामपंचायतींचा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री व जिल्हा परिषद अध्यक्ष यांच्या हस्ते जाहीर सन्मान होणार आहे. 

पुणे : जलस्रोताभोवतीचा परिसर स्वच्छ ठेवून, पाण्याची गुणवत्ता राखत जनतेला शुद्ध व सुरक्षित पाणीपुरवठा करणाऱ्या ग्रामपंचायतींना जिल्हा परिषदेमार्फत हिरवे कार्ड देण्यात येते. सतत पाच वर्षे हिरवे कार्ड मिळविणाऱ्या आणि कोणत्याही जलजन्य साथरोगाचा उद्रेक न झालेल्या ग्रामपंचायतींना यंदाच्या वर्षापासून जिल्हा परिषदेतर्फे ‘चंदेरी कार्ड’ देण्यात येणार आहे. या ग्रामपंचायतींचा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री व जिल्हा परिषद अध्यक्ष यांच्या हस्ते जाहीर सन्मान होणार आहे. 

राज्यात दरवर्षी पावसाळ्यापूर्वी म्हणजेच १ ते ३० एप्रिल, तसेच पावसाळ्यानंतर म्हणजेच २ ते ३१ ऑक्टोबर या कालावधीत दोन वेळा सार्वजनिक पिण्याच्या पाण्याच्या स्रोतांचे स्वच्छतेसह सर्वेक्षण करण्यात येते.  गावातील ७० टक्के लोकसंख्या अवलंबून असलेल्या स्राेतांच्या असुरक्षित पाणीपुरवठ्याच्या जोखमीनुसार लाल, पिवळे, व हिरवे कार्ड ग्रामपंचायतींना देण्यात येते.

अनियमित पाणी शुद्धीकरण, पाणी स्रोतांचा परिसर अस्वच्छ असणे, नळ, व्हाॅल्व्हगळती होणे, योग्य गुणवत्तेच्या टीसीएल पावडरचा पुरेशा प्रमाणात साठा नसणे, वर्षभरात जलजन्य साथ रोगाचा उद्रेक झाला असेल, तर अशा ग्रामपंचायतीला लाल कार्ड दिले जाते. वरील दोष आढळून न आल्यास हिरवे कार्ड, तर अस्वच्छता आढळून आल्यास पिवळे कार्ड देण्यात येते.  

सलग दोन वेळा लाल कार्ड मिळालेल्या ग्रामपंचायतींना हिरव्या कार्डात रूपांतर होईपर्यंत कोणत्याही प्रकारचे प्रोत्साहन अनुदान दिले जात नाही. तीव्र व मध्यम जोखीम असल्याने लाल व पिवळे कार्ड मिळालेल्या ग्रामपंचायतींना स्रोतांबाबत एका महिन्यात प्रतिबंधात्मक उपाययोजना कराव्या लागतात. अन्यथा ग्रामसेवकांची एक वेतनवाढ एका वर्षासाठी थांबविण्यात येते. 

आॅक्टोबर २०१२ मध्ये पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाने लाल, पिवळे, हिरवे कार्ड देण्याच्या निकषांमध्ये सुधारणा केल्या. त्यानंतर एप्रिल २०१३ पासून सातत्याने पाच वर्षे हिरवे कार्ड मिळविणाऱ्या आणि जलजन्य साथ रोगाचा उद्रेक न झालेल्या गावांना ‘चंदेरी कार्ड’ देण्यात येणार आहे. 

यंदा पाच वर्षे पूर्ण होत असून, एप्रिल महिन्याच्या सर्वेक्षणानंतर चंदेरी कार्ड मिळविणाऱ्या ग्रामपंचायतींची निवड करून त्यांचा सन्मान करण्यात येणार आहे. या गावांमधील ग्रामसेवक, अारोग्य कर्मचारी, जलसुरक्षक यांना प्रशस्ती पत्रक देऊन गौरविण्यात येईल.

इतर ताज्या घडामोडी
कृषी सल्ला : ऊस, कापूस, उन्हाळी भुईमूग...हवामान अंदाज - शुक्रवार - शनिवारी (ता. २६ - २७)...
द्राक्ष बागेचे वाढत्या तापमानातील...नव्या आणि जुन्या द्राक्ष बागांचा विचार केला असता...
ऑस्ट्रेलियातील सुपरमार्केटची दुष्काळाशी...ऑस्ट्रेलियातील एका सुपर मार्केटने दुष्काळाशी...
गोदावरीत प्रदूषण केल्यास होणार कारवाईनाशिक : नाशिक शहरातून वाहणाऱ्या गोदावरी...
सोलापुरात टंचाई निवारणाचा भार...सोलापूर : सोलापूर जिल्ह्याचा ग्रामीण भाग...
खानदेशात पपईला उन्हासह पाणीटंचाईचा फटकानंदुरबार : खानदेशात या हंगामात पपई लागवड कमी...
जळगावात पांढऱ्या कांद्याच्या आवकेत घटजळगाव  : कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
सांगली बाजारसमितीत हळद, गुळाची उलाढाल ...सांगली ः व्यापाऱ्यांना सेवाकराच्या नोटिसा...
नगर जिल्ह्यात छावण्यांवर दर दिवसाला...नगर  : नगर जिल्ह्यामध्ये दुष्काळात पशुधन...
सातारा जिल्ह्यात पाणीटंचाई होतेय तीव्रसातारा ः जिल्ह्यात दिवसेंदिवस पाणीटंचाई तीव्र होत...
पुणे जिल्ह्यासाठी २६ हजार ५७३ क्विंटल...पुणे  ः खरीप हंगाम सुरू होण्यास एक ते दीड...
तंटामुक्‍त गाव अभियानाला चंद्रपुरात...चंद्रपूर : शांततेतून समृद्धीकडे जाण्याचा...
अमरावतीत तुर चुकाऱ्यासाठी हवे ८७ कोटी;... अमरावती : चुकाऱ्यांसाठी यंदा शेतकऱ्यांना...
शेतीच्या दृष्टीने सरकारचा कारभार...नाशिक : अगोदरचा कालखंड व ही पाच वर्षे यात...
अमरावतीतून ९१ विहिरी अधिग्रहणाचे...अमरावती  ः सरासरीपेक्षा कमी पाऊस झाल्यामुळे...
शिल्लक एफआरपी मिळत नसल्याने साताऱ्यातील...सातारा  : अजिंक्यतारा कारखान्याचा अपवाद...
कांदा दर वाढले, तेव्हा भाजपने विरोध...नाशिक   ः कृषिमंत्री असताना मी...
'मतदान झालेल्या दुष्काळी भागात ...मुंबई  ः लोकसभेच्या मतदानाच्या तीन...
उच्चांकी मतदानामुळे कोल्हापूर मतदारसंघ...कोल्हापूर  : राज्याच्या तुलनेत कोल्हापूर...
अकोल्यात तूर प्रतिक्विंटल ४२०० ते ५४००...अकोला ः स्थानिक कृषी उत्पन्न बाजार समितीत...