agriculture news in marathi, Gram Panchayat workers' takeover movement | Agrowon

ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचे धरणे आंदोलन
टीम अॅग्रोवन
बुधवार, 8 ऑगस्ट 2018

सोलापूर : सोलापूर जिल्ह्यातील ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांनी जिल्हा परिषदेच्या प्रवेशद्वारासमोर सोमवारी (ता. ६) धरणे आंदोलन केले. ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित प्रश्‍नांकडे जिल्हा परिषद प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत कर्मचारी युनियनच्या वतीने हे आंदोलन करण्यात आले.

सोलापूर : सोलापूर जिल्ह्यातील ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांनी जिल्हा परिषदेच्या प्रवेशद्वारासमोर सोमवारी (ता. ६) धरणे आंदोलन केले. ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित प्रश्‍नांकडे जिल्हा परिषद प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत कर्मचारी युनियनच्या वतीने हे आंदोलन करण्यात आले.

ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना वेतन न दिल्यामुळे त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. जिल्ह्यात एक हजार २९ ग्रामपंचायती आहेत. त्यामध्ये काम करणाऱ्या आकृतिबंधातील कर्मचाऱ्यांची संख्या दोन हजारच्यावर आहे. या कर्मचाऱ्यांना गेल्या १० ते १२ महिन्यांपासून वेतन देण्यात आले नाही. तसेच फंड, राहणीमान भत्ता व त्यावरील मागील फरक, सेवापुस्तके, इतर सेवा विषयक बाबी जाणीवपूर्वक अपूर्ण ठेवल्या जात आहेत,अशा आंदोलकांच्या तक्रारी आहेत.

ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या तक्रारी निवारण्यासाठी नियमित बैठका व्हायला हव्यात, कर्मचाऱ्यांकडून स्ट्रीट लाइटची कामे करवून घेऊ नये, आदी प्रमुख मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात आले. युनियनचे जिल्हाध्यक्ष दिलीप जाधव, सरचिटणीस सुरेश राठोड, वसंत माने-पाटील आदी भारत कोळपे, अरुण सुर्वे, मसुदेव रणदिवे, गुरुबा भोसले, धनाजी पांढरे, संजय मगर, विलास गव्हाणे, रामचंद्र गरड, बसवराज कोळी, दिनकर खंडागळे, विनोद चव्हाण उपस्थित होते.

इतर ताज्या घडामोडी
राष्ट्रीय महामार्गाचे चौपदरीकरण...जळगाव : जळगाव आणि धुळे जिल्ह्यांतून जाणाऱ्या...
अंजनीसह पाच गावांची पाण्याविना आबाळसांगली ः तासगाव तालुक्‍याचा पूर्वभागात भीषण...
सोलापुरात दुष्काळ जाहीर करण्याची मागणीसोलापूर : सोलापूर जिल्ह्यात अद्यापही दमदार पाऊस...
गोंदिया जिल्ह्यात गणेशोत्सवाद्वारे शेती...गोंदिया :गणेशोत्सवाच्या माध्यमातून कृषी...
सातारा जिल्ह्यात स्ट्रॉबेरी लागवडीस...सातारा   ः राज्यभरात गोडव्यासाठी प्रसिद्ध...
सोलापूर जिल्ह्यावर दुष्काळ अन हुमणीचे...सोलापूर   ः जिल्ह्यात यंदाच्या हंगामात...
पीकविमा योजनेतून कंपन्यांचे भले ः विखे...पुणे   ः शेतकऱ्यांच्या पिकांना संरक्षण...
कृषी सल्ला : ऊस, कापूस, सोयाबीन, मका,...ऊस हुमणी किडीच्या नियंत्रणासाठी, फिप्रोनील (०.३...
अार्थिक व्यवस्थापनात राज्य सरकार अपयशी...मुंबई  : काँग्रेसच्या कार्यकाळात राज्याची...
कृषी सल्ला : भात, नागली, आंबा, नारळ,...भात  अवस्था ः पोटरी ते लोंबी बाहेर...
अकोल्यात मूग प्रतिक्विंटल ३८०० ते ५३००...अकोला ः या हंगामात लागवड झालेल्या मुगाची काढणी...
सोयाबीन, मूग, उडदासाठी १९ खरेदी केंद्रे...नगर ः शेतकऱ्यांचा शेतमाल हमीदराने खरेदी करता यावा...
शेतीमाल तारण योजनेत शेतकरी उत्पादक...कोल्हापूर : राज्यात शेतीमाल तारण योजना बाजार...
जळगावात आले २५०० ते ६००० रुपये...जळगाव ः येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
सिंदखेडराजा दुष्काळग्रस्त जाहीर कराअकोला : जिल्ह्यात या मोसमात तेल्हारा व अकोट या...
खान्देशातील धरणांत अल्प पाणीसाठा जळगाव : खान्‍देशातील तापी व पांझरा नदीवरील...
कोल्हापूरात धरणे भरली; नद्यांची...कोल्हापूर : केवळ पंधरा दिवसांतच जिल्ह्यातील...
जळगाव जिल्हा परिषदेत विरोधक शांत;...जळगाव : पोषण आहार, शिक्षक बदल्या यावरून जिल्हा...
नगर जिल्ह्याच्या काही भागांत पावसाचे...नगर ः गेल्या अनेक दिवसांपासून गायब झालेला आणि...
भंडारा जिल्ह्यातील धान उत्पादनात घटीची...भंडारा : गेल्या वीस दिवसांपासून धानपट्ट्यात...