वीस हजारांवर शेतकऱ्यांची हरभरा खरेदी लटकण्याची शक्यता

हरभरा खरेदी
हरभरा खरेदी

नांदेड :  नांदेड, परभणी, हिंगोली या तीन जिल्ह्यांत हरभरा खरेदीसाठी नोंदणी केलेल्या २५ हजार ९२७  शेतकऱ्यांपैकी ५ हजार ६६३ शेतकऱ्यांचा ८४ हजार ९२८ क्विंटल हरभरा खरेदी करण्यात आला आहे. खरेदीसाठी शेवटचे दोन दिवस बाकी असून, मंगळवारी (ता.२९) खरेदी बंद होणार आहे. त्यामुळे नोंदणी केलेल्या २० हजारांवर शेतकऱ्यांचा हरभरा खरेदी, मोजमापाअभावी लटकणार आहे.

केंद्र शासनाच्या किंमत समर्थन मूल्य योजनेअंतर्गत नांदेड जिल्ह्यातील ९ खरेदी केंद्रावर नोंदणी केलेल्या १४ हजार ७५७ शेतकऱ्यांपैकी ३६२० शेतकऱ्यांचा ५६ हजार ६६३० क्विंटल हरभरा खरेदी करण्यात आला. अद्याप ११ हजारावर शेतकऱ्यांची हरभरा खरेदी बाकी आहे.

परभणी जिल्ह्यातील आठ खरेदी केंद्रांवर नोंदणी केलेल्या ५९३७ पैकी १६२७ शेतकऱ्यांचा २२ हजार १३ क्विंटल हरभरा खरेदी करण्यात आला आहे. अजून ४३१० शेतकऱ्यांच्या हरभऱ्याचे मोजमाप बाकी आहे. हिंगोली जिल्ह्यातील ५ खरेदी केंद्रांवर ५२३३ शेतकऱ्यांनी नोंदणी केली. परंतु त्यापैकी ४१६ शेतकऱ्यांचा ६२८५ क्विंटल हरभरा खरेदी करण्यात आला आहे.

वखार महामंडळाच्या गोदामात हरभरा साठविण्यासाठी जागा नसल्यामुळे शेतकऱ्यांचे चुकारे रखडले आहेत. बारदाना कमी पडू लागल्यामुळे काही खरेदी केंद्र आठवडाभर बंद होते. काही केंद्रावर पुरेशा चाळण्या वजन काट्याअभावी मोजमापास विलंब लागत आहे. खरेदीसाठी शेवटच्या दोन दिवसांत नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांचा हरभरा खरेदी करणे शक्य नाही. त्यामुळे हरभरा खरेदीसाठी मुदत वाढ देण्यात यावी, अशी मागणी शेतकऱ्यांमधून केली जात आहे.

खरेदी केंद्रावर आॅनलाइन नोंदणीसाठी शेतकऱ्यांनी भरून दिलेली माहिती अपलोड करत असताना गठ्ठ्यातील अर्ज खाली वर करून अर्जाचा क्रम बदलण्याचे प्रकार घडत आहे आहेत. शेतकऱ्यांच्या नावाखाली व्यापारी, बाजार समित्या, खरेदी विक्री संघाचे आजी माजी पदाधिकारी, त्यांचे नातेवाईक अर्जाची हेराफेरी करत आहेत. त्यामुळे त्यांना मोजमापाचा मॅसेज आधी पाठवला जात आहेत. त्यामुळे आधी अर्ज भरून देऊनही मोजमाप मात्र उशिरा झाल्याचे अनेक शेतकऱ्यांनी सांगितले.

तीनही जिल्ह्यातील अनेक केंद्रांवर असे प्रकार घडत असताना शेतकऱ्यांनी तक्रारी केल्या. परंतु संबंधित यंत्रणांच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांनी अक्षम्य दुर्लक्ष केल्यामुळे सामान्य शेतकऱ्यांना मोजमापासाठी कित्येक दिवस वाट पाहावी लागत आहे. हरभरा खरेदी स्थिती (क्विंटल)

जिल्हा  खरेदी  शेतकरी नोंदणी केलेले शेतकरी
नांदेड ५६६३० ३६२० १४,७५७
परभणी  २२०१३ १६२७  ५९३७
हिंगोली  ६२८५ ४१६ ५२३३

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com