agriculture news in marathi, gram procurement issue,jalgaon, maharashtra | Agrowon

जळगावमध्ये २५ ते २८ हजार क्विंटल हरभरा पडून
टीम अॅग्रोवन
रविवार, 17 जून 2018

शेवटच्या दिवशी शासकीय केंद्रांवर रात्री उशिरापर्यंत हरभरा खरेदी केली. शेतकरी वंचित राहायला नको, असा प्रयत्न होता. आता जे शेतकरी हरभरा विक्रीपासून वंचित आहेत, त्यांची माहिती घेतली जात आहे.
- परिमल साळुंखे, पणन अधिकारी, मार्केटिंग फेडरेशन.

जळगाव : जिल्ह्यात हरभरा खरेदीसाठीची मुदत संपल्यानंतर अनेक नोंदणीकृत शेतकऱ्यांची हरभरा विक्री शासकीय केंद्रात झालेली नाही. खरेदी केंद्र पुन्हा सुरू करण्याची मागणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी केली आहे.१३ जूनपर्यंत खरेदी सुरू होती. जिल्ह्यात शेवटच्या दिवशी सुमारे १० खरेदी केंद्रांवर रात्री उशिरापर्यंत खरेदी करण्यात आली. परंतु तरीदेखील अनेक शेतकऱ्यांचा हरभरा पडून आहे. या शेतकऱ्यांनी शासकीय केंद्रात विक्रीसंबंधीची नोंदणी केली आहे. सुमारे २५ ते २८ हजार क्विंटल हरभरा पडून असल्याची माहिती आहे.

या शेतकऱ्यांची नेमकी माहिती जमा करण्याची कार्यवाही सुरू झाली आहे. त्यात शेतकऱ्याचे नाव, किती क्षेत्रावर पेरणी होती, किती हरभरा विकायचा होता, बॅंक खाते क्रमांक, आधार क्रमांक आदी मुद्यांची माहिती जमा केली जात आहे.

ज्या शेतकऱ्यांनी शासकीय खरेदी केंद्रात हरभरा विक्रीसंबंधी नोंदणी केली आहे, त्यांना क्विंटलमागे एक हजार रुपये अनुदान देण्याचे शासनाने म्हटले आहे. परंतु हे अनुदान कसे, केव्हा, कुठल्या निकषांवर देणार यासंबंधीचा शासनादेश अजून आलेला नाही. परंतु या आदेशाची प्रतीक्षा न करता अनुदानास कोण शेतकरी पात्र आहेत, त्यांची माहिती संकलित करण्याची कार्यवाही सुरू झाल्याची माहिती मिळाली.

शासकीय खरेदी केंद्रात हरभऱ्याला ४४०० रुपये क्विंटल दर होता. बाजार समित्या व इतर खासगी बाजारांमध्ये हरभऱ्याला ३५०० रुपये क्विंटलपर्यंत दर आहेत. यात शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे. खरिपासाठी निधी आवश्‍यक असल्याने शेतकरी अधिकचे दिवस हरभरा घरात साठविण्याच्या मनःस्थितीत नाहीत. त्यामुळे शासनाने तातडीने खरेदी सुरू करावी किंवा अनुदानासंबंधी तातडीने कार्यवाही करावी, अशी मागणीही पुढे आली आहे.
 

इतर ताज्या घडामोडी
भाजीपाला पिकांची रोपवाटिका तयार करतानाभाजीपाला पिकांची रोपवाटिका करताना योग्य ती काळजी...
परभणीत फ्लाॅवर प्रतिक्विंटल २००० ते...परभणी ः येथील जुना मोंढा भागातील फळे भाजीपाला...
पुण्यात फुलांची ७ काेटींची उलाढालपुणे ः फूल उत्पादक शेतकऱ्यांची भिस्त असणाऱ्या...
योग्य प्रमाणातच वापरा युरियानत्र पानांच्या पेशीमध्ये हरित लवकाची निर्मिती...
वनस्पतीतील संजीवकांमुळे अवकाशातही...पोषक घटकांची कमतरता आणि गुरुत्वाकर्षण कमी असणे या...
राज्यातील काही भागात अंशतः ढगाळ वातावरणमहाराष्ट्राच्या पश्‍चिम किनारपट्टीवर म्हणजेच कोकण...
सांगली जिल्हा बॅंकेला कर्जमाफीसाठी...सांगली ः राज्य शासनाच्या छत्रपती शिवाजी महाराज...
गूळ, बेदाणा, काजू महोत्सवास पुणे येथे...पुणे : दिवाळीच्या निमित्ताने ग्राहकांना रास्त...
'सरकारला दुष्काळाची दाहकता लक्षात येईना'पुणे  : यंदा ऑक्टोबर महिन्यातच धरणांमधील...
कर्नाटकात दुष्काळ जाहीर, मग...मुंबई  : ग्रामीण महाराष्ट्र दुष्काळात...
ऊसतोड मजूर महामंडळाला शंभर कोटींचा निधी...बीड   : याआधीच्या सरकारने दहा वर्षांत अडीच...
हिवरेबाजारमध्ये मांडला पाण्याचा ताळेबंदनगर  ः आदर्श गाव हिवरेबाजारमध्ये...
माण, खटाव तालुक्यांत पाणीटंचाई वाढलीसातारा   ः रब्बी हंगामाच्या तोंडावर पाऊस...
पुणे जिल्ह्यात खरिपात ६९ टक्के पीक...पुणे ः यंदा पाऊस वेळेवर न झाल्याने शेतकऱ्यांकडून...
बुलडाणा जिल्ह्यात १ लाख ६५ हजार...बुलडाणा  ः या रब्बी हंगामात जिल्ह्यात एक लाख...
यवतमाळ जिल्ह्यात जिल्हा प्रशासन उभारणार...यवतमाळ  ः शेतीला पूरक व्यवसायाची जोड देत...
अकोल्याला रब्बीसाठी हरभऱ्याचे वाढीव...अकोला  ः जिल्ह्यात रब्बी हंगामासाठी...
दुष्काळाची व्यथा मांडताना महिला...निल्लोड, जि. औरंगाबाद : विहिरींनी तळ गाठला, मक्‍...
कोल्हापूर जिल्ह्यात खरीप पिकांच्या...कोल्हापूर  : खरीप पिकांची काढणी वेगात...
सोलापुरातील अडचणीतील शेतकऱ्यांसाठी आश्‍...सोलापूर  ः सोलापूर जिल्ह्यात दुष्काळाची...