agriculture news in marathi, gram procurement ragistration, sangli, maharashtra | Agrowon

हरभरा खरेदीसाठी सांगलीतील केंद्रांवर करावी लागतेय प्रत्यक्ष नोंदणी
टीम अॅग्रोवन
शनिवार, 14 एप्रिल 2018
तासगाव येथे हरभरा खरेदी केंद्र सुरू केले आहे. नोंदणीसाठी तासगावमधील केंद्रात यावे लागते. पण आटपाडीत खरेदी केंद्र सुरू केले, तर आम्हाला सोईस्कर होईल.
- दीपक मोरे, शेतकरी, दिघंची, ता. आटपाडी, जि. सांगली.
सांगली : सांगली आणि तासगाव या दोन ठिकाणी हरभरा खरेदी केंद्र सुरू करण्यात आली आहेत. मात्र, हमीभावात हरभरा विक्री करायची असेल तर सांगली आणि तासगाव येथील केंद्रावर शेतकऱ्यांना प्रत्यक्ष नोंदणीसाठी यावे लागते. शेतकऱ्यांना ही दोन्ही केंद्रे लांब पडत असल्याने प्रत्येक तालुक्‍यात खरेदी केंद्र सुरू करण्याची मागणी शेतकरी करू लागले आहेत.
 
सांगली जिल्ह्यात हरभऱ्याचे क्षेत्र सुमारे २८ हजार ७३१ इतके आहे. मुळात हरभरा खरेदी केंद्र उशिरा सुरू झाल्याने शेतकऱ्यांना याचा फटका बसला आहे. हरभऱ्यास शासन ४४०० रुपये क्विंटल हमीभाव देत आहे.
 
मात्र, हरभऱ्याची हमीभावात विक्री करायची असल्यास शेतकऱ्यांनी नोंदणी करणे गरजेचे आहे.  हरभरा पिकाची सातबारा उताऱ्यावर नोंद आवश्‍यक आहे. हमीभावात हरभरा विक्रीसाठी सातबारा उतारा, आधार कार्ड आणि बॅंकेच्या बचत खात्याचे पासबूक या तिन्हींची झेरॉक्‍स लागते. ही सर्व कागपत्रे घेऊन शेतकरी नोंदणीसाठी पुढे येत आहेत.
 
परंतु, सांगली जिल्ह्यात केवळ दोनच खरेदी केंद्र सुरू असल्याने शिराळा तालुक्‍यातील शेतकऱ्याला हरभरा विक्रीसाठी सांगलीतील केंद्राचा आधार घ्यावा लागतो. नोंदणीसाठी शेतकऱ्यांना प्रत्यक्ष सांगलीतील केंद्रात यावे लागते. अर्थात नोंदणीसाठी हेलपाटा, त्यानंतर विक्रीसाठी पुन्हा सांगली गाठायची. म्हणजे दोन वेळा सांगलीच्या फेऱ्या माराव्या लागत आहेत. 
 
खरेदी केंद्रावर माल चांगला नसला, तर परत पाठवण्याच्या प्रकाराने शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान मोठ्या प्रमाणात होण्याची शक्‍यता आहे. त्यामुळे प्रत्येक तालुक्‍याच्या ठिकाणी हरभरा खरेदी केंद्र सुरू करावी, अशी मागणी शेतकऱ्यांमधून होते आहे.

इतर ताज्या घडामोडी
समुद्राच्या उधाणामुळे पीक नुकसान ...मुंबई  : समुद्र किनाऱ्यावरील शेतीचे तसेच...
‘मग्रारोहयो’त २८ नव्या कामांचा समावेशनागपूर : महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण...
पुणे जिल्ह्यात तीन लाख जमीन...पुणे   ः जमिनीतील विविध घटकांची माहिती...
पुणे जिल्हा परिषदेत दर रविवारी ‘...पुणे  : स्वयंसहायता समूहाच्या (बचत गट)...
गोदावरी कालव्यांचे लोकसहभागातून...कोपरगाव, जि. नगर ः शंभर वर्षांहुन अधिक आयुर्मांन...
सातारा जिल्ह्यात रब्बीत अवघे नऊ टक्के...सातारा  ः रब्बी हंगामात पीक कर्जाकडे...
महालक्ष्मी सरस प्रदर्शनामुळे  ग्रामीण...मुंबई   ः ॲमेझॉन, फ्लिपकार्टच्या...
सहकारमंत्र्यांनी राजीनामा द्यावा :...सोलापूर  ः उसाची एकरकमी एफआरपी देण्यात साखर...
काँग्रेसमध्ये नवचैतन्य; प्रियंका गांधी...नवी दिल्ली : काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी...
पीकनिहाय सेंद्रिय खत व्यवस्थापनपशुपालनातून जमिनीची सुपीकता हा विषय आता...
परोपजीवी मित्र-कीटकांची ओळखसध्या केवळ कीडनियंत्रणासाठी कीटकनाशकांच्या...
खोडवा उसाला द्या शिफारशीत खतमात्रापाण्याची उपलब्धता लक्षात घेऊन रासायनिक खतांचा...
परभणीत काकडी १००० ते १५०० रुपये क्विंटलपरभणी : येथील पाथरी रस्त्यावरील फळे,...
मागण्यांसाठी संग्रामपूर येथे...बुलडाणा  ः जनावरांसाठी चारा नाही, लोकांना...
शेतकऱ्यांनी पाडली तूर खरेदी बंदयवतमाळ : हमीभावापेक्षा ९०० ते १००० रुपये कमी...
कर्जमाफीसाठी पॉलिहाउस शेडनेटधारक...नगर  : पॉलिहाउस शेडनेटधारक शेतकऱ्यांचे...
विदर्भात पाच ठिकाणी होणार ब्रिज कम...अमरावती  ः भूजल पुनर्भरणाच्या उद्देशाने...
सोलापूर जिल्ह्यातील १६२ पाणंद...सोलापूर : सोलापूर जिल्ह्यात पालकमंत्री पाणंद...
खानदेशात मक्याची आवक नगण्यजळगाव : खानदेशातील प्रमुख बाजार समित्यांमध्ये मक्...
सातारा जिल्ह्यात ४६ लाख ३५ हजार टन ऊस...सातारा : जिल्ह्यातील ऊस गाळप हंगाम वेगात...