agriculture news in marathi, gram procurement starts,nanded, maharashtra | Agrowon

नांदेड, हिंगोली, परभणी जिल्ह्यात आजपासून हरभरा खरेदी
टीम अॅग्रोवन
सोमवार, 9 एप्रिल 2018

नांदेड : केंद्र शासनाच्या किंमत समर्थन योजनेअंतर्गत नांदेड जिल्ह्यातील दोन केंद्रांवर शनिवारपर्यंत (ता. ७) १२ शेतकऱ्यांचा २४४ क्विंटल हरभरा खरेदी झाला आहे. दरम्यान, हरभरा खरेदीसाठी ग्रेडरची नियुक्ती करण्यात आल्यामुळे नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यातील २० ठिकाणी ठप्प असलेली हरभरा खरेदी सोमवारपासून (ता. ९) सुरू होणार आहे. त्याअनुषंगाने संबंधितांना आदेश देण्यात आले असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

नांदेड : केंद्र शासनाच्या किंमत समर्थन योजनेअंतर्गत नांदेड जिल्ह्यातील दोन केंद्रांवर शनिवारपर्यंत (ता. ७) १२ शेतकऱ्यांचा २४४ क्विंटल हरभरा खरेदी झाला आहे. दरम्यान, हरभरा खरेदीसाठी ग्रेडरची नियुक्ती करण्यात आल्यामुळे नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यातील २० ठिकाणी ठप्प असलेली हरभरा खरेदी सोमवारपासून (ता. ९) सुरू होणार आहे. त्याअनुषंगाने संबंधितांना आदेश देण्यात आले असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

या तीन जिल्ह्यांत सध्या तूर खरेदी सुरू असलेल्या २२ ठिकाणी आधारभूत किंमत दराने हरभरा खरेदी केली जाणार आहे. हरभरा खरेदीचे आदेश दिल्यानंतर उत्पादकता आदेश नसल्यामुळे खरेदी सुरू झाली नव्हती. उत्पादकता आदेश प्राप्त झाल्यानंतर या केंद्रांवरील ग्रेडर हरभरा खरेदीसाठीच्या स्वंतत्र आदेशासाठी अडून बसले होते, त्यामुळे तीन जिल्ह्यांतील २० केंद्रांवर हरभरा खरेदी ठप्प होती.

मात्र, नांदेड जिल्ह्यातील नांदेड (अर्धापूर) येथे एका शेतकऱ्याची १०.५० क्विंटल आणि देगलूर येथे ११ शेतकऱ्यांची २३३.५० क्विंटल अशी दोन केंद्रांवर एकूण १२ शेतकऱ्यांची २४४ क्विंटल हरभरा खरेदी झाली आहे. हरभऱ्यासाठी तीन जिल्ह्यांत ३३०७ शेतकऱ्यांनी आॅनलाइन नोंदणी केली आहे.

दरम्यान, या केंद्रांवर ग्रेडरची नियुक्ती करण्यात आल्याने सोमवारपासून (ता. ९) हरभरा खरेदी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत, असे जिल्हा विपणन अधिकारी कार्यालयाच्या सूत्रांनी सांगितले. परंतु आता अनेक ठिकाणी गोदामात साठविण्यासाठी जागा नसल्यामुळे हरभरा खरेदी सुरू करण्यासाठी अडचणी येऊ शकतात. गोदाम उपलब्ध करून देण्यासाठी वखार महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी रविवारी (ता. ८) मानवत येथे पाहणी केली असल्याचे सूत्रांनी सांगितले. 

गोदामामध्ये जागा अपुरी पडत असल्यामुळे तूर खरेदी संथ गतीने सुरू आहे. गेल्या आठवडाभरात या तीन जिल्ह्यांत २३ हजार ५६९ क्विंटल तूर खरेदी करण्यात आली. शनिवारपर्यंत एकूण १७ हजार ६८८ शेतकऱ्यांची १ लाख ९४ हजार २९ क्विंटल तूर खरेदी करण्यात आली आहे.

इतर ताज्या घडामोडी
`जलयुक्त`ची कामे गतीने पूर्ण करा : डवलेबुलडाणा : जलयुक्‍त शिवार अभियानातंर्गत भूजल...
नगर जिल्ह्यात सव्वाचार लाख हेक्‍टर...नगर ः नगर जिल्ह्यामध्ये रब्बीच्या सरासरी...
सांगलीतील मध्यम, लघू प्रकल्पांत २३...सांगली ः जिल्ह्यातील ८४ मध्यम आणि लघू प्रकल्पांत...
नगर जिल्हा परिषदेत दलालांचा सुळसुळाटनगर ः जिल्हा परिषदेत आता पहिल्यासारखी स्थिती नाही...
सोलापुरात वांगी, ढोबळी मिरची, कोबी दरात...सोलापूर ः सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या...
रेशीम शेतकऱ्यांना सरकारचे अर्थसाह्य :...नागपूर : नव्याने रेशीम शेतीकडे वळणाऱ्या...
नाशिक जिल्हा बॅँकेच्या संचालकांच्या...नाशिक : आर्थिक अडचणीत सापडलेल्या जिल्हा मध्यवर्ती...
सोलापुरातील रस्त्याचे काम शेतकऱ्यांनी...सोलापूर : सोलापूर-विजापूर राष्ट्रीय...
योग्य वेळी करा मिरीची काढणीमिरी घोसामधील एक ते दोन मणी पिवळे अगर नारंगी...
नाशिकला वांगी, घेवडा, आले दर तेजीतनाशिक : गत सप्ताहात नाशिक बाजार समितीत बहुतांश...
बियांद्वारे मिळवता येतील भाताचे ‘क्लोन’ बियांद्वारे मिळवता येतील भाताचे ‘क्लोन’...
प्रथिनांद्वारे मिळवता येईल अधिक टिकाऊ...निसर्गातील कोळ्याच्या धाग्यापासून प्रेरणा घेत चीन...
ऊसतोडणी कामगारांच्या गावांत दुष्काळी...नगर ः जनावरे जगवण्यासाठी आणि रोजगाराच्या शोधात...
नामपूरात शेतमालाला दर, कर्जमाफीसाठी...नामपूर, जि. नाशिक : कांदा पिकासह शेतमालाचे...
वजनकाट्यात घोळ करणाऱ्यांनी लाज बाळगावीमाळेगाव, जि. पुणे ः ‘माळेगाव साखर कारखान्याचे...
कोल्हापूर जिल्ह्यास ३०० एकर तुती...कोल्हापूर : महारेशीम अभियानांतर्गत कोल्हापूर...
हमीभावाने साडेदहा हजार क्विंटल शेतीमाल...नांदेड ः नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांमध्ये...
पुणे बाजारात भाजीपाल्यांचे दर स्थिर;...पुणे ः गुलटेकडी येथील कृषी उत्पन्न बाजार...
केळी सल्लाकेळी पिकाची उत्तम वाढ व उत्पादनासाठी सरासरी किमान...
करडईवरील मावा किडीचे नियंत्रणकरडई हे रब्बी हंगामातील प्रमुख तेलबियापैकी...