नगर जिल्ह्यात ९४ हजार ८४९ क्विंटल हरभरा खरेदी

हरभरा खरेदी
हरभरा खरेदी
नगर  ः जिल्ह्यात नाफेडने सुरू केलेल्या १३ हरभरा खरेदी केंद्रांवर आतापर्यंत ९२५२ शेतकऱ्यांकडून ९४ हजार ८४९ क्विंटल हरभरा खरेदी झाला आहे. जिल्हाभरात १७ हजार २१९ शेतकऱ्यांनी हरभरा विक्रीसाठी ऑनलाइन नोंदणी केली आहे. खर्डा (ता. जामखेड) येथील खरेदी केंद्रावर आतापर्यंत सर्वाधिक म्हणजे ३८ हजार २७ क्विंटल हरभरा खरेदी झाली असून राहुरीत मात्र खरेदीचे प्रमाण अल्प आहे. 
 
जिल्ह्यात यंदा हरभऱ्याचे बऱ्यापैकी उत्पादन झाले आहे. मात्र बाजारात हमीभावापेक्षा कमी दराने हरभरा खरेदी होत असल्याने नाफेडमार्फत शासकीय खरेदी केंद्र सुरू करावे, अशी मागणी शेतकऱ्यांकडून केली जात होती. 
जिल्हा मार्केटिंग फेडरेशन कार्यालयानेही बाजार समितीत होत असलेल्या आवक आणि दरबाबत माहीत घेऊन चौदाही तालुक्‍यात खरेदी केंद्र सुरु करण्याबाबत कळवले होते. सध्या जिल्हाभरात सुमारे १३ केंद्रांवर खरेदी सुरु आहे. 
 
आतापर्यंत जिल्हाभरात ९२५२ शेतकऱ्यांकडून ९४ हजार ८४९ क्विंटल हरभरा खरेदी झालेला आहे तर १७ हजार २१९ शेतकऱ्यांनी विक्रीसाठी ऑनलाइन नोंदणी केली आहे, असे जिल्हा मार्केटींग फेडरेशन कार्यालयातून सांगण्यात आले. जिल्ह्यात साधारण दीड लाख क्विंटल हरभरा खरेदीचा अंदाज आहे.  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com