agriculture news in marathi, gram procurement status, sangli, maharashtra | Agrowon

सांगली जिल्ह्यात दोन हजार क्विंटल हरभरा खरेदी
टीम अॅग्रोवन
गुरुवार, 3 मे 2018
सांगली : जिल्ह्यातील तासगाव आणि सांगली या दोन खरेदी केंद्रांवर दोन हजार क्विंटल हरभरा खरेदी झाली आहे. तसेच आजअखेर १४ हजार क्विंटल तूर खरेदी झाली असून अजून ४०० क्विंटल तूर खरेदीची शक्‍यता आहे, अशी माहिती संबंधित विभागाच्या सूत्रांनी दिली.
 
सांगली : जिल्ह्यातील तासगाव आणि सांगली या दोन खरेदी केंद्रांवर दोन हजार क्विंटल हरभरा खरेदी झाली आहे. तसेच आजअखेर १४ हजार क्विंटल तूर खरेदी झाली असून अजून ४०० क्विंटल तूर खरेदीची शक्‍यता आहे, अशी माहिती संबंधित विभागाच्या सूत्रांनी दिली.
 
सांगली जिल्ह्यात तासगाव तालुका आणि सांगली अशी दोन हरभरा खरेदी केंद्र सुरू झाली आहेत. येथे हरभऱ्याला हमीभाव ४४०० रुपये क्विंटल आहे. आजअखेर यासाठी ६०० शेतकऱ्यांनी नोंदणी केली आहे. तासगाव आणि सांगली येथील खरेदी केंद्रांवर हरभरा विक्रीसाठी शेतकरी येत आहेत. मात्र, आटपाडी आणि कवठेमहांकाळ तालुक्‍यासह विटा तालुक्‍यात हरभरा खरेदी केंद्र सुरू करण्याची मागणी शेतकरी करू लागले आहेत.
 
जिल्ह्यात हमीभावाने १४ हजार क्विंटल तुरीची खरेदी झाली असून अजून सुमारे ४०० क्विंटल तूर खरेदी होईल असा अंदाज मार्केटिंग अधिकारी आर. एन. दानोळे यांनी व्यक्त केला आहे.
 
सांगली जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्‍यात खरेदी केंद्र सुरू व्हावे, अशी मागणी लोकप्रतिनिधींकडे केली होती. या दरम्यान गेल्या पंधरा दिवसांपूर्वी जिल्हाधिकारी कार्यालयात खरीप पूर्व आढावा बैठक झाली होती.
 
या बैठकीत आमदार अनिल बाबर यांनी प्रत्येक तालुक्‍यात कडधान्ये खरेदी करण्याची मागणी केली होती. त्या वेळी सहकारमंत्री तथा पालकमंत्री सुभाष देशमुख यांनी प्रत्येक तालुक्‍यात हमीभावाने कडधान्ये खरेदी केंद्र सुरू करण्याचे आश्‍वासन दिले होते.
 
मात्र, अद्यापही त्यावर कार्यवाही केली नसल्याची चर्चा शेतकऱ्यांमध्ये सुरू आहे. केवळ बैठकीत घोषणा केल्या जातात. पण प्रत्यक्षात त्यावर तोडगा काढला जात नसल्याने शेतकऱ्यांमधून नाराजी व्यक्त होते आहे.

इतर ताज्या घडामोडी
राष्ट्रीय महामार्गाचे चौपदरीकरण...जळगाव : जळगाव आणि धुळे जिल्ह्यांतून जाणाऱ्या...
अंजनीसह पाच गावांची पाण्याविना आबाळसांगली ः तासगाव तालुक्‍याचा पूर्वभागात भीषण...
सोलापुरात दुष्काळ जाहीर करण्याची मागणीसोलापूर : सोलापूर जिल्ह्यात अद्यापही दमदार पाऊस...
गोंदिया जिल्ह्यात गणेशोत्सवाद्वारे शेती...गोंदिया :गणेशोत्सवाच्या माध्यमातून कृषी...
सातारा जिल्ह्यात स्ट्रॉबेरी लागवडीस...सातारा   ः राज्यभरात गोडव्यासाठी प्रसिद्ध...
सोलापूर जिल्ह्यावर दुष्काळ अन हुमणीचे...सोलापूर   ः जिल्ह्यात यंदाच्या हंगामात...
पीकविमा योजनेतून कंपन्यांचे भले ः विखे...पुणे   ः शेतकऱ्यांच्या पिकांना संरक्षण...
कृषी सल्ला : ऊस, कापूस, सोयाबीन, मका,...ऊस हुमणी किडीच्या नियंत्रणासाठी, फिप्रोनील (०.३...
अार्थिक व्यवस्थापनात राज्य सरकार अपयशी...मुंबई  : काँग्रेसच्या कार्यकाळात राज्याची...
कृषी सल्ला : भात, नागली, आंबा, नारळ,...भात  अवस्था ः पोटरी ते लोंबी बाहेर...
अकोल्यात मूग प्रतिक्विंटल ३८०० ते ५३००...अकोला ः या हंगामात लागवड झालेल्या मुगाची काढणी...
सोयाबीन, मूग, उडदासाठी १९ खरेदी केंद्रे...नगर ः शेतकऱ्यांचा शेतमाल हमीदराने खरेदी करता यावा...
शेतीमाल तारण योजनेत शेतकरी उत्पादक...कोल्हापूर : राज्यात शेतीमाल तारण योजना बाजार...
जळगावात आले २५०० ते ६००० रुपये...जळगाव ः येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
सिंदखेडराजा दुष्काळग्रस्त जाहीर कराअकोला : जिल्ह्यात या मोसमात तेल्हारा व अकोट या...
खान्देशातील धरणांत अल्प पाणीसाठा जळगाव : खान्‍देशातील तापी व पांझरा नदीवरील...
कोल्हापूरात धरणे भरली; नद्यांची...कोल्हापूर : केवळ पंधरा दिवसांतच जिल्ह्यातील...
जळगाव जिल्हा परिषदेत विरोधक शांत;...जळगाव : पोषण आहार, शिक्षक बदल्या यावरून जिल्हा...
नगर जिल्ह्याच्या काही भागांत पावसाचे...नगर ः गेल्या अनेक दिवसांपासून गायब झालेला आणि...
भंडारा जिल्ह्यातील धान उत्पादनात घटीची...भंडारा : गेल्या वीस दिवसांपासून धानपट्ट्यात...