agriculture news in marathi, gram procurement status, satara, maharashtra | Agrowon

सातारा जिल्ह्यात १३५७ क्विंटल हरभरा खरेदी
टीम अॅग्रोवन
गुरुवार, 26 एप्रिल 2018
जिल्ह्यात हरभऱ्याची हमीभावाने खरेदी करण्यासाठी दोन केंद्रे सुरू आहेत. या केंद्रावर ४४०० रुपयांप्रमाणे दर दिला जात आहे. शेतकऱ्यांनी ऑनलाइन नोंदणी करून हरभरा खरेदी केंद्रावर आणावा. 
- अनिल देसाई, जिल्हा पणन अधिकारी, सातारा.
सातारा : जिल्हा पणन विभागाकडून कोरेगाव व फलटण येथे हमीभावाने हरभरा खरेदी केंद्र सुरू करण्यात आले असून, या केंद्रांवर आतापर्यंत १३५७.७० क्विंटल हरभरा खरेदी झाली आहे. खरेदी केंद्रावर येणाऱ्या हरभऱ्यास ४४०० रुपये क्विंटल असा हमीभाव दिला जात असून, जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी हरभऱ्याची खरेदी केंद्रावर विक्री करावी, असे आवाहन पणन विभागाकडून करण्यात आले आहे. 
 
जिल्ह्यात रब्बी हंगामात सुमारे २५ हजार हेक्‍टर क्षेत्रावर हरभऱ्याची लागवड झाली होती. हरभरा काढणीची कामे जवळपास उरकली आहेत. काढणीच्या काळात हरभरा दरात घसरण झाल्याने हमीभावापेक्षा कमीने दराने व्यापाऱ्यांकडून तो खरेदी केला जाण्याचा धोका निर्माण झाला होता.
 
हरभऱ्यास शासनाने जाहीर केलेला हमीभाव मिळावा, यासाठी जिल्हा पणन विभागाकडून कोरेगाव व फलटण येथे खरेदी केंद्रे सुरू करण्यात आली आहेत. या दोन्ही केंद्रावर सुमारे ४५० शेतकऱ्यांनी नोंदणी केली होती. यापैकी १५४ शेतकऱ्यांच्या १३५७.७० क्विंटल हरभऱ्याची खरेदी करण्यात आली आहे.
यात फलटण केंद्रावर ५९८.५० तर कोरेगाव केंद्रावर ७५९.२६ क्विंटल हरभरा खरेदी झाला आहे. 

हमीभावाने तूर खरेदी करण्यासाठी फलटण येथे केंद्र सुरू करण्यात आले होते. जिल्ह्यात तुरीचे क्षेत्र कमी असल्यामुळे उत्पादन कमी आहे. या केंद्रावर ऑनलाइन नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांकडून तूर खरेदी करण्यात आलेली आहे. मुदत वाढ होऊन नोंदणी होत नसल्यामुळे खरेदी केंद्र बंद करण्यात आले आहेत.

इतर ताज्या घडामोडी
पुण्यात आवक कमी झाल्याने भाजीपाल्यांची...पुणे ः राज्यातील दुष्काळी परिस्थितीच्या...
दुष्काळी तालुक्यांतून अकोले, कोपरगावला...नगर : अकोले तालुक्‍यात पाऊस पडण्याच्या प्रमाणात...
सोयाबीनने मोडले शेतकऱ्यांचे कंबरडेअमरावती  ः दिवाळीच्या मोसमात दोन पैसे...
शेतीमालाच्या साठवणुकीसाठी उभारणार गोदामेकऱ्हाड, जि. सातारा ः शेतकऱ्यांनी उत्पादित केलेला...
हापूसचा ‘अल्फोन्सो जीआय’ वादातपुणे   : केंद्र सरकारने हापूस आंब्याला ‘...
साखर निर्यातीसाठी कारखान्यांनी पुढे...मुंबई   : अडचणीतील साखर उद्योगाला...
दक्षिण कोकणात बुधवारपासून शक्यतापुणे  : कमाल तापमानात चढ-उतार होत असला तरी...
पंजाब, हरियानात पिकांचे अवशेष जाळण्यावर...गुडगाव : पिकांचे अवशेष जाळण्यावर असलेली बंदी...
शबरीमला मंदिर प्रवेशप्रकरणी केरळमध्ये...तिरुअनंतपुरम, केरळ : शबरीमला मंदिरात सर्व...
नैसर्गिक समतोलासह खाद्यसुरक्षेसाठी...२०५० मध्ये जगाची लोकसंख्या १० अब्जांपर्यंत पोचेल...
जळगावात डाळिंब प्रतिक्विंटल २००० ते...जळगाव ः येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
सातारी आल्याच्या बाजारभावात सुधारणासातारा ः आले पिकाच्या दरात सुधारणा झाली आहे....
सोलापूर जिल्ह्यातील ‘दुष्काळ`...सोलापूर : सोलापूर जिल्ह्यात यंदा सुरवातीपासून...
निवडणूक अायोगाच्या बोधचिन्हाची मानवी...बुलडाणा : येथील जिजामाता प्रेक्षागारात पाच हजार...
ऊसदर नियामक मंडळाची ‘आरएसएफ’प्रश्नी...पुणे : राज्यातील काही साखर कारखान्यांकडून महसुली...
राज्यात उन्हाचा चटका कायमपुणे   : कोरड्या व निरभ्र हवामानामुळे...
खानदेशात सूतगिरण्यांची वानवाजळगाव  ः खानदेशात कापूस हे प्रमुख पीक आहे....
दुष्काळ जाहीर करण्यासाठी मुहूर्त कशाला...औरंगाबाद  ः मराठवाड्यातील ७६ पैकी ५६ तालुक्‍...
सिंचन परिषदेतील विचार मंथनाची दिशा...सोयगाव, जि. औरंगाबाद   : केवळ चर्चा, प्रबोधन...
स्फुरद विरघळविणाऱ्या जिवाणू संवर्धकांचा...फळभाज्या तसेच फळांच्या वाढीसाठी स्फुरद हे...