agriculture news in marathi, gram procurment and storage issue, jalgaon, maharashtra | Agrowon

जळगाव जिल्ह्यात गोदामे उपलब्ध नसल्याने हरभरा खरेदी रखडली
टीम अॅग्रोवन
गुरुवार, 22 मार्च 2018
शासकीय हरभरा खरेदीची तयारी झाली आहे. आणखी एक खरेदी केंद्र मंजूर होईल, अशी अपेक्षा असून, १२ ठिकाणी खरेदी होईल. परंतु गोदामांची अडचण असल्याने खरेदीला सुरवात नाही. परंतु येत्या सोमवारपर्यंत (ता. २६) हरभरा खरेदी सुरू होईल. 
- परिमल साळुंखे, पणन अधिकारी, मार्केटिंग फेडरेशन
जळगाव : जिल्ह्यात शासकीय हरभरा खरेदी रखडली असून, गोदामे उपलब्ध नसल्याने नव्याने खरेदीला ब्रेक लागला आहे. तूर खरेदीवरही याचा परिणाम होऊ लागला असून, जिल्ह्यात खरेदी केलेले धान्य नवापूर (जि. नंदुरबार) येथील गोदामांमध्ये ठेवण्याच्या हालचाली सुरू आहेत. 
 
हरभरा खरेदी येत्या सोमवारपासून सुरू होईल, असे संकेत आहेत. सोमवारपर्यंत खरेदी केलेली तूर, उडीद, मूग व इतर धान्य इतरत्र हलविले जाईल. जिल्ह्यात पारोळा व भडगाव वगळता सर्व १३ तालुक्‍यांमध्ये वखार महामंडळाची गोदामे आहेत.
 
या गोदामांमध्ये मागील वर्षी खरेदी केलेली तूर व इतर कडधान्य, सोयाबीन व मका पडून आहे. त्यातच यंदा खरेदी केलेली तूरही पडून आहे. गोदामे भरली असून, नव्याने धान्य खरेदी करून ते कुठे साठवायचे, हा प्रश्‍न शासकीय यंत्रणांसमोर आहे. यामुळे हरभरा खरेदीचा मुहूर्तही लांबणीवर पडत आहे.
 
हरभरा खरेदीची तयारी १० दिवसांपूर्वीच सुरू झाली. तीन हजार शेतकऱ्यांचे ऑफलाइन अर्ज शेतकी संघांमध्ये स्वीकारले आहेत. तसेच १२ ठिकाणी खरेदी केंद्रे सुरू करण्याची तयारी जवळपास पूर्ण झाली आहे. त्यात पारोळा, भडगाव, यावल, चोपडा, रावेर, मुक्ताईनगर, बोदवड, जामनेर, जळगाव, पाचोरा, अमळनेर व चाळीसगाव येथे हरभरा खरेदी केंद्र सुरू करण्याचा प्रस्ताव आहे. यातील ११ केंद्रांना प्रशासनाने मंजुरी दिली असून, पारोळा येथील प्रस्तावित केंद्राला अजून मंजुरी मिळालेली नाही.
 
जिल्ह्यात यंदा हरभऱ्याचे चांगले उत्पादन आले असून, त्याचे दर मात्र बाजारात अतिशय कमी आहेत. २८०० ते ३४०० रुपये क्विंटल असे दर हरभऱ्याला बाजार समिती व इतर खासगी ठिकाणी आहेत. शासनाने ४४०० रुपये प्रतिक्विंटलचा दर खरेदीसाठी निश्‍चित केला असून, शेतकरी खरेदी केंद्रांच्या प्रतीक्षेत आहेत.

 

इतर ताज्या घडामोडी
परिषदेत पहिल्याच दिवशी राज्य सरकारची...मुंबई : विधान परिषदेचे पहिले विरोधी पक्षनेते...
जुन्नर तालुक्यात द्राक्ष बागांवर...नारायणगाव, जि. पुणे : जुन्नर तालुक्‍यातील द्राक्ष...
कर्जमुक्तीसह विविध मागण्यांसाठी...परभणी  : मानवत तालुक्यासह जिल्ह्यातील...
नाशिक जिल्ह्यात ३५०० द्राक्षप्लॉटची...नाशिक  : युरोपियन राष्ट्रांसह रशिया आणि अन्य...
शेतकऱ्यांनो, आत्महत्या करू नका ः आदित्य...बुलडाणा   ः तुम्ही संकटात असताना...
काकडी, दोडका, कारल्याच्या दरात सुधारणापुणे : गुलटेकडी येथील कृषी उत्पन्न बाजार...
‘गिरणा‘च्या पाण्यासाठी वाळूचा बंधाराजळगाव : गिरणा नदीतून पिण्यासह शेतीच्या पाण्याचे...
‘समृद्धी’च्या उभारणीसाठी रॉयल्टीत देणार...नाशिक   : मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गाच्या...
व्याजासह एफआरपी दिल्याशिवाय...पुणे  : राज्यातील साखर कारखान्यांनी थकीत...
कोल्हापुरात पहिल्या टप्प्यात गूळदरात वाढकोल्हापूर  ः यंदाच्या गूळ हंगामाला सुरवात...
सरुड येथील गुऱ्हाळघरमालक उसाला देणार...कोल्हापूर : गुऱ्हाळघर व्यवसायात व्यावसायिकपणा...
नगर जिल्ह्यात १७८ टॅंकरद्वारे पाणीपुरवठानगर   : जिल्ह्यात यंदा गंभीर पाणीटंचाई जाणवत...
पुणे बाजार समितीत हापूस आंब्यांची आवकपुणे  ः कोकणातील हापूस आंब्यांची या...
सातारा जिल्ह्यात पाणीटंचाई वाढलीसातारा   ः जिल्ह्याच्या पूर्व भागात...
नागपूर जिल्ह्यात रब्बीची २१ टक्के पेरणीनागपूर   ः पाणी उपलब्धतेची अडचण, जमिनीत...
राज्यकर्ते दूध भेसळ का थांबवत नाहीत :...पुणे : राज्यात राजरोस दुधात भेसळ सुरू असून, अन्न...
आर. आर. पाटील यांचे स्मारक युवकांना...सांगली   ः आर. आर. पाटील यांनी ग्रामविकास,...
जळगाव जिल्हा परिषद पाणी योजनांचे वीज...जळगाव : पाणी योजनांचे बिल भरण्यात आले नसल्याने...
जमीन सुपीकतेसाठी सेंद्रिय कर्बाचे...जमिनीच्या सुपीकतेमध्ये सेंद्रिय कर्ब हे अत्यंत...
खानदेशात कांदा लागवड निम्म्याने...जळगाव : खानदेशात यंदा उन्हाळ कांद्याची लागवड...