agriculture news in marathi, gram procurment center issue, marathwada, maharashtra | Agrowon

उत्पादकता जाहीर न केल्यामुळे हरभऱ्याची शासकीय खरेदी अडली
टीम अॅग्रोवन
शनिवार, 10 मार्च 2018
नांदेड : खुल्या बाजारातील दर कोसळल्यामुळे केंद्र शासनाच्या किंमत समर्थन मूल्य योजनेअंतर्गत हमीभावाने नाफेडतर्फे हरभरा खरेदीचा निर्णय घेण्यात आला आहे. परंतु प्रतिहेक्टरी उत्पादकता जाहीर न केल्यामुळे शासकीय खरेदी अद्याप अडलेली आहे. तूर्त आॅनलाइन नोंदणीवर भर दिला जाणार आहे. नाफेडच्या खरेदीस विलंब लागत आहे. त्यामुळे खुल्या बाजारातील दराच्या चढ-उताराचा फटका मराठवाड्यातील हरभरा उत्पादक शेतकऱ्यांना बसत आहे. 
 
नांदेड : खुल्या बाजारातील दर कोसळल्यामुळे केंद्र शासनाच्या किंमत समर्थन मूल्य योजनेअंतर्गत हमीभावाने नाफेडतर्फे हरभरा खरेदीचा निर्णय घेण्यात आला आहे. परंतु प्रतिहेक्टरी उत्पादकता जाहीर न केल्यामुळे शासकीय खरेदी अद्याप अडलेली आहे. तूर्त आॅनलाइन नोंदणीवर भर दिला जाणार आहे. नाफेडच्या खरेदीस विलंब लागत आहे. त्यामुळे खुल्या बाजारातील दराच्या चढ-उताराचा फटका मराठवाड्यातील हरभरा उत्पादक शेतकऱ्यांना बसत आहे. 
 
खरेदी सुरू झाली तरी चांगले उत्पादन मिळत असल्यामुळे वखार महामंडळाच्या गोदामात हरभरा साठविण्यासाठी जागा अपुरी पडणार आहे. मराठवाड्यातील औरंगाबाद कृषी विभागांतर्गंतच्या औरंगाबाद, जालना, बीड या जिल्ह्यांत हरभऱ्याचे सर्वसाधारण क्षेत्र १ लाख २० हजार ५८९ हेक्टर असताना, प्रत्यक्षात २ लाख ४४ हजार हेक्टवर तर लातूर कृषी विभागांतर्गतच्या लातूर, उस्मानाबाद, नांदेड, परभणी, हिंगोली या जिल्ह्यांत हरभऱ्याचे सर्वसाधारण क्षेत्र ३ लाख २४ हजार ४०४ हेक्टर असाताना, प्रत्यक्षात ६ लाख ६३ हजार ७७ हेक्टरवर पेरणी झाली आहे.
 
मराठवाड्यात हरभऱ्याचे सर्वसाधारण क्षेत्र ४ लाख ४४ हजार ६३५ हेक्टर असताना, यंदा ९ लाख ७ हजार ८० हेक्टवर पेरणी झाली आहे. यंदा अनेक जिल्ह्यांत हरभऱ्यास एकरी चांगला उतारा येत आहे. हरभऱ्याची आधारभूत किंमत प्रतिक्विंटल ४४०० रुपये असताना, खुल्या बाजारात मात्र ३२०० रुपये ते ३४०० रुपये दराने व्यापारी खरेदी करत आहेत.
 
या परिस्थितीत शासनाने आधारभूत किंमत दराने हरभरा खरेदीचा निर्णय घेतला आहे. सध्या तूर खरेदी सुरू असलेल्या ठिकाणी हरभऱ्याचीदेखील खरेदी केली जाणार आहे. परंतु शासकीय खरेदीसाठी आवश्यक प्रतिहेक्टरी उत्पादकता कृषी विभागाने जाहीर केलेली नाही. त्यामुळे हरभऱ्याची खरेदी सुरू करता येत नाही. तूर्त सध्या तूर खरेदी सुरू असलेल्या ठिकाणी हरभरा पीक पेऱ्यांची आॅनलाइन नोंदणी करून घेतली जाणार आहे.
 
नाफेड तसेच विदर्भ को आॅपरेटिव्ह फेडरेशनतर्फे तूर खरेदी केली जात आहे. अनेक ठिकाणी खरेदी केलेली तूर साठविण्यासाठी वखार महामंडळाच्या गोदामात जागा शिल्लक नसल्यामुळे खासगी गोदामे भाडेतत्त्वावर घ्यावी लागली आहेत. खासगी गोदामांची संख्या कमी आहे. हरभऱ्याचे यंदाचे वाढलेले उत्पादन लक्षात घेता खरेदी केलेला हरभरा साठविण्यासाठी गोदामे कमी पडणार आहेत.

इतर ताज्या घडामोडी
भाजीपाला पिकांची रोपवाटिका तयार करतानाभाजीपाला पिकांची रोपवाटिका करताना योग्य ती काळजी...
परभणीत फ्लाॅवर प्रतिक्विंटल २००० ते...परभणी ः येथील जुना मोंढा भागातील फळे भाजीपाला...
पुण्यात फुलांची ७ काेटींची उलाढालपुणे ः फूल उत्पादक शेतकऱ्यांची भिस्त असणाऱ्या...
योग्य प्रमाणातच वापरा युरियानत्र पानांच्या पेशीमध्ये हरित लवकाची निर्मिती...
वनस्पतीतील संजीवकांमुळे अवकाशातही...पोषक घटकांची कमतरता आणि गुरुत्वाकर्षण कमी असणे या...
राज्यातील काही भागात अंशतः ढगाळ वातावरणमहाराष्ट्राच्या पश्‍चिम किनारपट्टीवर म्हणजेच कोकण...
सांगली जिल्हा बॅंकेला कर्जमाफीसाठी...सांगली ः राज्य शासनाच्या छत्रपती शिवाजी महाराज...
गूळ, बेदाणा, काजू महोत्सवास पुणे येथे...पुणे : दिवाळीच्या निमित्ताने ग्राहकांना रास्त...
'सरकारला दुष्काळाची दाहकता लक्षात येईना'पुणे  : यंदा ऑक्टोबर महिन्यातच धरणांमधील...
कर्नाटकात दुष्काळ जाहीर, मग...मुंबई  : ग्रामीण महाराष्ट्र दुष्काळात...
ऊसतोड मजूर महामंडळाला शंभर कोटींचा निधी...बीड   : याआधीच्या सरकारने दहा वर्षांत अडीच...
हिवरेबाजारमध्ये मांडला पाण्याचा ताळेबंदनगर  ः आदर्श गाव हिवरेबाजारमध्ये...
माण, खटाव तालुक्यांत पाणीटंचाई वाढलीसातारा   ः रब्बी हंगामाच्या तोंडावर पाऊस...
पुणे जिल्ह्यात खरिपात ६९ टक्के पीक...पुणे ः यंदा पाऊस वेळेवर न झाल्याने शेतकऱ्यांकडून...
बुलडाणा जिल्ह्यात १ लाख ६५ हजार...बुलडाणा  ः या रब्बी हंगामात जिल्ह्यात एक लाख...
यवतमाळ जिल्ह्यात जिल्हा प्रशासन उभारणार...यवतमाळ  ः शेतीला पूरक व्यवसायाची जोड देत...
अकोल्याला रब्बीसाठी हरभऱ्याचे वाढीव...अकोला  ः जिल्ह्यात रब्बी हंगामासाठी...
दुष्काळाची व्यथा मांडताना महिला...निल्लोड, जि. औरंगाबाद : विहिरींनी तळ गाठला, मक्‍...
कोल्हापूर जिल्ह्यात खरीप पिकांच्या...कोल्हापूर  : खरीप पिकांची काढणी वेगात...
सोलापुरातील अडचणीतील शेतकऱ्यांसाठी आश्‍...सोलापूर  ः सोलापूर जिल्ह्यात दुष्काळाची...