agriculture news in marathi, gram procurment centers inadiqute, jalgaon, maharashtra | Agrowon

जळगावमध्ये हरभऱ्याची आवक अधिक; खरेदी केंद्रे मात्र अपुरीच
टीम अॅग्रोवन
शनिवार, 7 एप्रिल 2018
जळगाव   ः जिल्ह्यात हरभरा खरेदी रखडतच सुरू आहे. परिणामी सर्वच हरभरा उत्पादकांना या शासकीय खरेदीचा लाभ मिळत नसल्याचे चित्र आहे. जिल्ह्यात यंदा हरभरा पेरणीने उच्चांक गाठला. आवक अधिक आणि शासकीय खरेदी केंद्रांची अपुरी संख्या अशी स्थिती जिल्ह्यात आहे. 
 
तूर खरेदी जशी रखडत सुरू होती, तशीच स्थिती हरभरा खरेदीची असून, भडगाव व रावेर येथे खरेदी केंद्र सुरू झाले आहे. भडगावचे केंद्र सुरू होऊन सुमारे १५ दिवस झाले, तर रावेरचे केंद्र याच आठवड्यात सुरू झाले. एकूण ५०० क्विंटल हरभरा खरेदी झाली आहे.
 
जळगाव   ः जिल्ह्यात हरभरा खरेदी रखडतच सुरू आहे. परिणामी सर्वच हरभरा उत्पादकांना या शासकीय खरेदीचा लाभ मिळत नसल्याचे चित्र आहे. जिल्ह्यात यंदा हरभरा पेरणीने उच्चांक गाठला. आवक अधिक आणि शासकीय खरेदी केंद्रांची अपुरी संख्या अशी स्थिती जिल्ह्यात आहे. 
 
तूर खरेदी जशी रखडत सुरू होती, तशीच स्थिती हरभरा खरेदीची असून, भडगाव व रावेर येथे खरेदी केंद्र सुरू झाले आहे. भडगावचे केंद्र सुरू होऊन सुमारे १५ दिवस झाले, तर रावेरचे केंद्र याच आठवड्यात सुरू झाले. एकूण ५०० क्विंटल हरभरा खरेदी झाली आहे.
 
यंदा हरभऱ्याचे उत्पादन चांगले आले आहे. शासकीय यंत्रणांनी मात्र गोदामांची अपूर्ण संख्या व मार्चएंडची कामे यामुळे हरभरा खरेदीला वेगाने सुरवात झालेली नसल्याचे म्हटले आहे. 
 
तूर खरेदी सुरू आहे. नऊ केंद्रांत तूर खरेदी सुरू असून, ती आता अंतिम टप्प्यात आहे. या महिन्यात तूर खरेदी बंद होईल. ज्या नऊ केंद्रांमध्ये तूर खरेदी सुरू आहे, त्या केंद्रांव्यतिरिक्त भडगाव, पारोळा व यावल येथे हरभरा खरेदी केंद्र सुरू करायचे नियोजन होते. यातील भडगाव केंद्र सुरू झाले. उर्वरित ११ खरेदी केंद्रे सुरू झालेली नसल्याने संबंधित भागातील शेतकऱ्यांना खासगी बाजारात मिळेल त्या दरात हरभरा विक्री करावी लागत आहे.
 
खासगी बाजार किंवा बाजार समितीत हरभऱ्याला ३५०० रुपये प्रतिक्विंटलपर्यंत दर आहेत. जामनेर, मुक्ताईनगर, बोदवड, चाळीसगाव, पाचोरा, जळगाव, अमळनेर, यावल, चोपडा व पारोळा येथे हरभरा खरेदी सुरू झालेली नाही. नोंदणी व इतर तयारी झाली आहे. परंतु धान्य साठवायला
 
जळगाव नजीकच्या धुळे जिल्ह्यात जागा नसल्याने मागील १५ दिवसांपासून जी तूर व इतर धान्य खरेदी केले, ते साठवणुकीसाठी नवापूर (जि. नंदुरबार) येथे पाठविले जात आहे. सुमारे सहा हजार क्विंटल तूर व हरभरा नवापूर येथील शासकीय गोदामात साठविण्यात आल्याचे सांगण्यात आले. 

इतर ताज्या घडामोडी
पंचगंगा प्रदूषणप्रश्‍नी आयुक्तांना नोटीसकोल्हापूर - जयंती नाल्याचे सांडपाणी थेट...
पदोन्नतीत आरक्षणाचा मार्ग मोकळा;...नवी दिल्ली- अनुसुचित जाती जमातीच्या कर्मचाऱ्यांना...
मुलींना बारावीपर्यंत एसटीचा मोफत पासमुंबई - एसटी महामंडळामार्फत ग्रामीण भागातील...
असा होईल गोकुळ दूध संघ ‘मल्टिस्टेट'कोल्हापूर - जिल्हा सहकारी दूध उत्पादक सहकारी...
वयाच्या 86 वर्षीही सक्रीय राजकारणात डॉ...नवी दिल्ली - देशाचे माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन...
ड्रोनमुळे कृषी क्षेत्रात क्रांती घडेल...लातूर : वेगवेगळ्या कारणामुळे कृषी क्षेत्र...
लागवड लसूणघासाची...लागवडीसाठी मध्यम ते भारी, चांगला निचरा होणारी,...
जळगाव बाजार समितीत चवळी प्रतिक्विंटल...जळगाव ः येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
जलयुक्त शिवारातील जलसंचय सुद्धा आटलाजळगाव : जिल्ह्यात झालेल्या जलयुक्त शिवारच्या...
‘स्वाभिमानी’ची २७ ऑक्‍टोबरला जयसिंगपूर...कोल्हापूर  : यंदाच्या हंगामात ऊस उत्पादकांना...
इंधन दरवाढीच्या निषेधार्थ नगर येथे...नगर  : ``राफेल विमान खरेदीत एक हजार कोटींचा...
तूर, हरभऱ्याच्या चुकाऱ्यासाठी परभणी...परभणी  ः आधारभूत किंमत खरेदी योजनेअंतर्गत...
साताऱ्यातील सोयाबीन उत्पादक...सातारा  ः जिल्ह्यात सोयाबीनची काढणी सुरू...
पुणे विभागात पाणीटंचाई वाढलीपुणे  : पावसाने दडी मारल्याने पुणे विभागात...
पाऊस नसल्याने नगर जिल्ह्यात ऊस लागवडीवर...नगर   ः जिल्ह्यात यंदा आतापर्यंत ३३ हजार १२३...
वऱ्हाडात उडीद, मुगासाठी खरेदी केंद्रे...अकोला  ः या भागात सध्या मूग, उडदाचा हंगाम...
जळगाव जिल्ह्यात नवती केळीचे दर स्थिरजळगाव ः जिल्ह्यात नवती केळीचे दर मागील आठवड्यात...
कोल्हापुरात फळांची आवक मंदावली,...कोल्हापूर : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत या...
कळमणा बाजारात सोयाबीनच्या दरात वाढनागपूर ः सोयाबीनच्या दरात अल्पशी वाढ वगळता कळमणा...
नाशिकला टोमॅटोची आवक वाढली; कांदा,...नाशिक : नाशिक बाजार समितीत गतसप्ताहात टोमॅटोची...