agriculture news in marathi, gram procurment delayin jalgaon, maharashtra | Agrowon

जळगाव जिल्ह्यात हरभरा खरेदी केंद्र सुरू होण्यास विलंब
टीम अॅग्रोवन
शुक्रवार, 16 मार्च 2018
जिल्ह्यात ११ हरभरा खरेदी केंद्र सुरू केले जातील. काबुली हरभरा खरेदी करण्याबाबत स्पष्ट निर्देश नाहीत. काबुली हरभऱ्याला खासगी बाजारात शासनाने निश्‍चित केलेल्या दरांच्या तुलनेत अधिक दर आहेत. खरेदी केंद्र येत्या २२ मार्चपर्यंत सुरू होण्याची शक्‍यता आहे. 
- परिमल साळुंखे, पणन अधिकारी, मार्केटिंग फेडरेशन.
जळगाव  ः जिल्ह्यात नाफेडचे हरभरा खरेदी केंद्र अजूनही सुरू झालेले नाहीत. हे केंद्र या महिन्याच्या मध्यात सुरू होतील, असे जिल्हा प्रशासनाने म्हटले होते. परंतु वरिष्ठ कार्यालयाचे आदेश आलेले नसल्याने हे केंद्र सुरू होण्यास विलंब होत आहे. 
 
जिल्ह्यात यंदा सुमारे ९० हजार हेक्‍टरवर हरभऱ्याची पेरणी झाली होती. त्यात देशी प्रकारच्या हरभऱ्याची पेरणी अधिक होती. काबुली हरभऱ्याची पेरणी चोपडा, रावेर भागात अधिक झाली होती. हरभरा मळणी अंतिम टप्प्यात आहे. काही शेतकऱ्यांनी तर हरभरा विक्री केली आहे. काबुली हरभऱ्यास खासगी बाजारात किंवा बाजार समितीत ५५०० रुपये क्विंटल तर देशी हरभऱ्यास ३५०० रुपये क्विंटल दर आहे. परिणामी शेतकऱ्यांना कमी दरात हरभरा विक्री करावी लागत आहे. 
 
जिल्ह्यात हरभरा खरेदीसाठी ऑनलाइन नोंदणीचे आदेश दिले आहेत. नोंदणी मागील १५ दिवसांपासून सुरू आहे. परंतु फक्त दोन हजार शेतकऱ्यांची नोंदणी झाली आहे. नोंदणीला प्रतिसाद नसल्याने कुठे केंद्र सुरू करायचे व कुठे केंद्र सुरू करण्यास उशीर करायचा यासंदर्भात प्रशासन विचार करीत आहे. कारण नोंदणीला जेथे प्रतिसाद नसेल, तेथे केंद्र सुरू करणे योग्य होणार नाही. तर जेथे अधिक मागणी व प्रतिसाद आहे, त्या भागात पहिल्याच टप्प्यात खरेदी केंद्र सुरू होतील. 
 
जिल्ह्यात सुरवातीला भडगाव, रावेर, चोपडा, यावल, मुक्ताईनगर व जामनेर येथे हरभरा खरेदी केंद्र सुरू केले जातील. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार येत्या गुरुवारपर्यंत (ता. २२) किमान चार खरेदी केंद्र सुरू होतील. त्यानंतर पुढील आठ ते दहा दिवसांत सर्व ११ खरेदी केंद्र सुरू होतील. त्यात चाळीसगाव, पाचोरा, अमळनेर, बोदवड आणि जळगाव येथे खरेदी केंद्र सुरू होतील. 

इतर ताज्या घडामोडी
वीरगळचा इतिहास नव्या पिढीसमोरकोल्हापूर - या दगडी शिळा अनेक गावांत पाराखाली,...
सरकारच्या ताफ्यात एक हजार इलेक्‍ट्रिक...मुंबई - राज्य सरकारच्या ताफ्यात एक हजार इलेक्‍...
पाचल ठरले स्मार्ट ग्रामरत्नागिरी - शासनाच्या स्मार्ट ग्राम...
पंचगंगा प्रदूषणप्रश्‍नी आयुक्तांना नोटीसकोल्हापूर - जयंती नाल्याचे सांडपाणी थेट...
पदोन्नतीत आरक्षणाचा मार्ग मोकळा;...नवी दिल्ली- अनुसुचित जाती जमातीच्या कर्मचाऱ्यांना...
मुलींना बारावीपर्यंत एसटीचा मोफत पासमुंबई - एसटी महामंडळामार्फत ग्रामीण भागातील...
असा होईल गोकुळ दूध संघ ‘मल्टिस्टेट'कोल्हापूर - जिल्हा सहकारी दूध उत्पादक सहकारी...
वयाच्या 86 वर्षीही सक्रीय राजकारणात डॉ...नवी दिल्ली - देशाचे माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन...
ड्रोनमुळे कृषी क्षेत्रात क्रांती घडेल...लातूर : वेगवेगळ्या कारणामुळे कृषी क्षेत्र...
लागवड लसूणघासाची...लागवडीसाठी मध्यम ते भारी, चांगला निचरा होणारी,...
जळगाव बाजार समितीत चवळी प्रतिक्विंटल...जळगाव ः येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
जलयुक्त शिवारातील जलसंचय सुद्धा आटलाजळगाव : जिल्ह्यात झालेल्या जलयुक्त शिवारच्या...
‘स्वाभिमानी’ची २७ ऑक्‍टोबरला जयसिंगपूर...कोल्हापूर  : यंदाच्या हंगामात ऊस उत्पादकांना...
इंधन दरवाढीच्या निषेधार्थ नगर येथे...नगर  : ``राफेल विमान खरेदीत एक हजार कोटींचा...
तूर, हरभऱ्याच्या चुकाऱ्यासाठी परभणी...परभणी  ः आधारभूत किंमत खरेदी योजनेअंतर्गत...
साताऱ्यातील सोयाबीन उत्पादक...सातारा  ः जिल्ह्यात सोयाबीनची काढणी सुरू...
पुणे विभागात पाणीटंचाई वाढलीपुणे  : पावसाने दडी मारल्याने पुणे विभागात...
पाऊस नसल्याने नगर जिल्ह्यात ऊस लागवडीवर...नगर   ः जिल्ह्यात यंदा आतापर्यंत ३३ हजार १२३...
वऱ्हाडात उडीद, मुगासाठी खरेदी केंद्रे...अकोला  ः या भागात सध्या मूग, उडदाचा हंगाम...
जळगाव जिल्ह्यात नवती केळीचे दर स्थिरजळगाव ः जिल्ह्यात नवती केळीचे दर मागील आठवड्यात...