agriculture news in marathi, gram procurment process not started, parbhani, maharashtra | Agrowon

उत्पादकता आदेश प्राप्त होऊनही हरभरा खरेदी ठप्पच
टीम अॅग्रोवन
सोमवार, 26 मार्च 2018
परभणी :  नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यातील शासकीय खरेदी केंद्रांवर किमान आधारभूत किंमत दराने हरभरा खरेदीसाठी उत्पादकतेनुसार प्रतिहेक्टरी १० क्विंटलची मर्यादा निश्चित करण्यात आली आहे. परंतु अनेक ठिकाणी गोदामात साठविण्यासाठी जागा अपुरी असल्यामुळे अजून हरभरा खरेदी सुरू झालेली नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना खुल्या बाजारात कमी दराने हरभरा विकावा लागत आहे.
 
परभणी :  नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यातील शासकीय खरेदी केंद्रांवर किमान आधारभूत किंमत दराने हरभरा खरेदीसाठी उत्पादकतेनुसार प्रतिहेक्टरी १० क्विंटलची मर्यादा निश्चित करण्यात आली आहे. परंतु अनेक ठिकाणी गोदामात साठविण्यासाठी जागा अपुरी असल्यामुळे अजून हरभरा खरेदी सुरू झालेली नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना खुल्या बाजारात कमी दराने हरभरा विकावा लागत आहे.
 
नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यात यंदा हरभऱ्याच्या क्षेत्रात जवळपास दुपटीने वाढ झाली आहे. नवीन हरभऱ्याची आवक बाजारात सुरू झाली आहे. किमान आधारभूत किंमत ४४०० रुपये क्विंटल असताना व्यापारी मात्र १२०० ते १६०० रुपये फरकाने खरेदी करत आहेत. सध्या तूर खरेदी सुरू असलेल्या ठिकाणी हरभऱ्याची खरेदी केली जाणार आहे. 
 
आजवर उत्पादकता आदेश नसल्यामुळे हरभरा खरेदी करता येत नसल्याचे सांगितले जात होते. शासनाने नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांसाठी प्रतिहेक्टरी १० क्विंटल हरभरा खरेदीची मर्यादा शासनाने ठरवून दिली आहे. हिंगोली जिल्ह्याची हरभऱ्याची सरासरी उत्पादकता प्रतिहेक्टरी ९.८४ क्विंटल आल्याची माहिती कृषी विभागाने जिल्हा मार्केटिंग अधिकारी कार्यालयास कळवली आहे. परभणी जिल्ह्याच्या उत्पादकतेची माहिती कृषी विभागाकडून अजून उपलब्ध झालेली नाही. पीक कापणी प्रयोगाच्या निष्कर्षानंतर उत्पादकतेत बदल होऊ शकतो.
 
सध्या प्रतिहेक्टरी १० क्विंटल हरभरा खरेदीचे निर्देश आहेत. परभणी, हिंगोली जिल्ह्यांत सोमवार (ता. २६) पासून हरभरा खरेदी सुरू करण्याचे आदेश दिले असल्याचे सूत्रांनी सांगितले.

इतर ताज्या घडामोडी
रविवार विशेष : दावणत्या दाव्यानं असे किती जीव ओढत नेले असतील...
केंद्रीय कृषी विद्यापीठे ही काळाची गरज...देशात वातावरणावर आधरित १५ झोन आहेत. या...
श्रीमंत रानातला ‘गरीब’ प्रतिभावंत !ठकाबाबांनी जगण्यावर, कलेवर भरभरून प्रेम केले. कला...
तूर, हरभरा अनुदान मिळण्यासाठी अचूक...मुंबई : शेतकऱ्यांचे आधार क्रमांक बँक खात्यास...
पाकिस्तानात घुसूनच सर्जिकल स्ट्राइक करा...नवी दिल्ली : दहशतवादाविरोधात सर्व राजकीय पक्षांनी...
शिवजयंतीला शिवनेरी किल्ल्यावर शिववंदनापुणे : छत्रपती श्री शिवाजी महाराज यांच्या...
हुतात्मा संजय राजपूत, नितीन राठोड यांना...बुलडाणा  ः काश्मीरमधील पुलवामा सेक्टरमध्ये...
जिवाणूंमुळे होतो फुफ्फुसाच्या...फुफ्फुसाच्या ट्यूमरच्या विकासामध्ये तेथील...
पाणीटंचाईची ऊस लागवडीला झळपुणे :ऑक्टोबरपासून सुरू झालेल्या...
नगर जिल्हा परिषदेचे उद्या अंदाजपत्रकनगर : जिल्हा परिषदेची अंदाजपत्रकीय विशेष सभा...
सौरपंपांपासून साडेचार हजार शेतकरी वंचितजळगाव : मुख्यमंत्री सौरकृषिपंप योजनेच्या लाभासाठी...
सौर कृषिपंप योजनेच्या लाभार्थ्यांचा...सोलापूर : शेतकऱ्यांना सौरऊर्जेद्वारे दिवसाही...
औरंगाबादेत द्राक्ष प्रतिक्विंटल ३५०० ते...औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
शिवसेना-भाजपचे युतीच्या दिशेने पुढचे...मुंबई: लोकसभा निवडणुकीतील युतीसाठी शिवसेना-...
किमान तापमानात वाढ, उन्हाळी हंगामास...महाराष्ट्रावर १०१४ हेप्टापास्कल इतका हवेचा दाब...
पुणे विभागात हरभऱ्याची ४९ टक्केच पेरणीपुणे : पावसाळ्यात कमी पावसामुळे जमिनीत पुरेशी ओल...
शाळांमधील ४९८ खोल्या धोकादायकपुणे : जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने...
मराठवाड्यात रब्बी पिकांची वाढ खुंटलीऔरंगाबाद : पाण्याचा ताण, तापमानातील चढउतार यामुळे...
अमरावतीत तूर, कापसाला मिळेना भावअमरावती : चीनकडून भारतीय सोयाबीनला वाढती...
गुलाब उत्पादकांच्या कष्टाला मिळाले फळ नाशिक : दुष्काळी परिस्थिती, कमी असलेला भाव,...