agriculture news in Marathi, Gram in Pune division, wheat harvesting will start fast | Agrowon

पुणे विभागात हरभरा, गव्हाची काढणी वेगाने सुरू
टीम अॅग्रोवन
बुधवार, 20 मार्च 2019

पुणे ः उन्हाचा चटका वाढल्याने रब्बी हंगामातील गहू, हरभरा काढणी वेगाने सुरू आहे. एप्रिलच्या १५ तारखेपर्यत पुणे विभागात ही काढणी अंतिम टप्प्यात येण्याची शक्यता आहे. रब्बी हंगामात पाणीटंचाईमुळे काही भागांत उत्पादनात जवळपास ४० ते ५० टक्क्यापर्यंत घट येण्याची शक्यता आहे. 

पुणे ः उन्हाचा चटका वाढल्याने रब्बी हंगामातील गहू, हरभरा काढणी वेगाने सुरू आहे. एप्रिलच्या १५ तारखेपर्यत पुणे विभागात ही काढणी अंतिम टप्प्यात येण्याची शक्यता आहे. रब्बी हंगामात पाणीटंचाईमुळे काही भागांत उत्पादनात जवळपास ४० ते ५० टक्क्यापर्यंत घट येण्याची शक्यता आहे. 

पुणे विभागात गव्हाचे सरासरी एक लाख ५४ हजार ८४२ हेक्टर क्षेत्र आहे. त्यापैकी ७५ हजार ६६४ हेक्टर म्हणजेच ४९ टक्के पेरणी झाली होती. यामध्ये शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात देशी वाणासह, संकरित यांसारख्या वाणाची पेरणी केली होती. हरभऱ्यांचे सरासरी २ लाख १७ हजार २२४ हेक्टर क्षेत्र आहे. त्यापैकी एक लाख सहा हजार ७५१ हेक्टर म्हणजेच ४९ टक्के पेरणी केली होती. यामध्ये शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात विजय, विशाल यांसारख्या वाणाच्या हरभऱ्यांची पेरणी केली होती. 

यंदा या शेतकऱ्यांनी आर्थिक परिस्थिती नसताना पीक कर्ज घेऊन रब्बीची तयारी केली होती. अनेकांनी खते, बियाण्यांची खरेदी केली होती. परंतु परतीचा पुरेसा पाऊस न झाल्याने मोठा परिणाम झाला आहे. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांना पेरणी करता आली नाही. परिणामी, विभागात मोठ्या प्रमाणात क्षेत्र पेरणीपासून दूर राहिले आहे.

रब्बी हंगामात पाण्याची सुविधा असलेल्या काही शेतकऱ्यांनी हरभरा, गव्हाची पेरणी केली. पुरेसा पाऊस न झाल्यामुळे विहिरी कोरड्या पडू लागल्याने पिकांना पाणी देण्यास अडचणी तयार झाल्या. त्यामुळे पिकांच्या वाढीवर मोठा परिणाम झाला असून, उत्पादनात मोठी घट होण्याची शक्यता आहे. याशिवाय पाणीटंचाईमुळे कोरडवाहू भागात पुरेशा प्रमाणात हरभरा, गव्हाच्या पेरण्या होऊ शकल्या नाहीत. त्याचा परिणामही उत्पादनावर होणार असल्याचे कृषी विभागाच्या सूत्रांमधून बोलले जात आहे.

सध्या हरभरा, गव्हाची काढणी वेगाने सुरू असली तरी त्याला मजूरटंचाईचा मोठा बसत आहे. त्यावर पर्याय म्हणून बहुतांशी शेतकरी यांत्रिकीकरणाद्वारे थेट काढणी करण्यास प्राधान्य देऊ लागला आहे. विभागातील अनेक भागांत गहू, हरभरा काढणीसाठी यंत्राचा (हार्वेस्टर) अवलंब करत असून, त्यासाठी शेतकऱ्यांना एकरी दीड ते दोन हजार रुपये मोजावे लागत आहे.

इतर बातम्या
विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीला चैत्री...सोलापूर : गेल्या आठवड्यात झालेल्या चैत्री...
अकोला जगात ‘हॉट’ शहरांच्या यादीतअकोला : मागील दोन दिवसांपासून या भागात उष्णतेचे...
दुष्काळी भागात दाहकता वाढलीसावळज, जि. सांगली : कायमस्वरूपी दुष्काळी भाग...
फळबाग वाचविण्यासाठी सलाइनद्वारे पाणी जिंतूर, जि. परभणी : जिल्ह्यात उद्भवलेल्या...
विकासासाठी पुन्हा एकदा संधी द्या :...नाशिक : लोकसभेची ही निवडणूक विकासाची, सामान्य...
राहुल गांधी यांची आज संगमनेरात सभानगर : शिर्डी लोकसभा मतदारसंघातील काॅँग्रेसचे...
सिन्नर तालुक्यात दुष्काळाने डाळिंब...नाशिक  : पाऊस कमी झाल्याने संपूर्ण सिन्नर...
रिसोड बाजार समितीच्या सभापतिपदी सुमन...वाशीम : जिल्ह्यातील रिसोड कृषी उत्पन्न बाजार...
निवडणूक संपली, आता तरी दुष्काळी...सांगली ः लोकसभेची आचारसंहिता एक महिन्यापासून सुरू...
विदर्भात उष्णतेची लाटपुणे ः मराठवाडा ते उत्तर तमिळनाडू आणि दक्षिण मध्य...
शेडनेटगृह अनुदानाचे राज्यस्तरीय दरपत्रक...पुणे : धोरणात्मक कामकाजापासून शेतकरी प्रतिनिधींना...
चौथ्या टप्प्यात १०९ कोट्यधीश उमेदवार...मुंबई ः राज्यातील चौथ्या टप्प्याची निवडणूक...
पुणे ः खरिपासाठी एक लाख ८५ हजार टन...पुणे ः पुणे जिल्ह्यात खरीप हंगामाची तयारी सुरू...
ढाकणी पाणी भरणा केंद्र अत्यवस्थदहिवडी, जि. सातारा : दुष्काळाची दाहकता गंभीर रूप...
राज्यातील काॅँग्रेस प्रायव्हेट लिमिटेड...नगर ः ‘‘राज्यातील काॅँग्रेस प्रायव्हेट लिमिटेड...
कपाशीच्या नांदेड ४४ बीटी बियाण्याची ५...परभणी ः महाबीज आणि वसंतराव नाईक मराठवाडा कृषी...
वनस्पतीच्या ताण स्थितीतील संदेश यंत्रणा...वनस्पतीतील ताणाच्या स्थितीमध्ये कार्यरत होणाऱ्या...
ऑस्ट्रेलियातील सुपरमार्केटची दुष्काळाशी...ऑस्ट्रेलियातील एका सुपर मार्केटने दुष्काळाशी...
गोदावरीत प्रदूषण केल्यास होणार कारवाईनाशिक : नाशिक शहरातून वाहणाऱ्या गोदावरी...
सोलापुरात टंचाई निवारणाचा भार...सोलापूर : सोलापूर जिल्ह्याचा ग्रामीण भाग...