कळमणा बाजार समितीत हरभरा ४१०० रुपयांवर

कळमणा बाजार समितीत हरभरा ४१०० रुपयांवर
कळमणा बाजार समितीत हरभरा ४१०० रुपयांवर

नागपूर ः स्थानिक कळमणा बाजार समितीत हरभरा वगळता इतर शेतीमालाची आवक जेमतेम आहे. हरभरा आवक सरासरी एक हजार क्‍विंटलच्या घरात असल्याचे व्यापारी सूत्रांनी सांगितले. 

बाजारात गेल्या आठवड्यात हरभरा आवक १३६४ क्‍विंटलची होती. या आठवड्यात आवक १६०० क्‍विंटलपर्यंत पोचली. हरभरा दर ३२०० ते ४२०० रुपये क्‍विंटलचे होते. या आठवड्यात हे दर ३९०० ते ४१४२ रुपये क्‍विंटलवर पोचले. बाजारात तुरीची देखील नियमित आवक असून सरासरी ५०० क्‍विंटलची रोजची आवक आहे. ५००० ते ५८८० रुपये क्‍विंटलचे दर सुरवातीला होते. 

या आठवड्यात तुरीचे दर ४५०० ते ५५५६ रुपये क्‍विंटलपर्यंत खाली आल्याची माहिती देण्यात आली. मुगाचे दर ५००० ते ५३०० रुपये क्‍विंटलवर स्थिर तर आवक २० ते २२ क्‍विंटलची आहे. ४१०० ते ४३०० रुपये क्‍विंटल दर असलेल्या उडदाची आवक अवघी तीन क्‍विंटलची आहे. 

बाजारात जवसाची देखील तीन क्‍विंटलची आवक झाली. जवसाचे दर ४२०० ते ४४०० रुपये क्‍विंटल आहेत. सोयाबीनची आवक ४०० ते ४५५ क्‍विंटलची आहे. सोयाबीनचे दरात घसरण नोंदविण्यात आली. सोयाबीनचे दर या आठवड्यात ३२०० ते ३४८१ रुपये क्‍विंटलचे आहेत. बाजारात केळीचे दर ४५० ते ५५० रुपये क्‍विंटलवर स्थिर आहेत. केळीची आवक ४० ते ४५ क्‍विंटलची आहे. बाजारात आल्याची आवक ५३० क्‍विंटलची तर दर ४००० ते ८००० रुपये. वाळलेल्या मिरचीला ७००० ते १०००० रुपये क्‍विंटलचा दर आणि आवक ३०६२ क्‍विंटलची आहे. 

टोमॅटोची १५० क्‍विंटलची आवक आणि दर १५०० ते १८०० रुपयांचे आहेत. चवळी शेंगाचे दर ४२०० ते ४६०० रुपये क्‍विंटल आणि आवक ९० क्‍विंटलची होती. बाजारात भेंडीची देखील नियमित आवक असल्याचे सांगण्यात आले. १८०० ते २२०० रुपये क्‍विंटलचा दर भेंडीला होता. आवक २५० क्‍विंटलची आहे. गवार शेंगांचे दर या आठवड्यात २२०० ते २६०० रुपये क्‍विंटलवर होते. आवक १५३ क्‍विंटलची आहे. ३५०० ते ४००० रुपये क्‍विंटलचा दर हिरव्या मिरचीचा होता तर ढोबळ्या मिरचीचे व्यवहार २५०० ते ३००० रुपये क्‍विंटलने झाले.

मोसंबीची आवक घटली बाजारात मोठ्या आकाराच्या मोसंबी फळांची आवक २०० ते २५० क्‍विंटलची आहे. ३००० ते ४००० रुपये क्‍विंटलचा दर मोसंबीला असल्याची माहिती व्यापारी सूत्रांनी दिली. गेल्या आठवड्यात ही आवक अवघी ८० ते १०० क्‍विंटलची होती.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com